प्रत्येक वादळ मोसमी होते

Submitted by सुप्रिया जाधव. on 7 November, 2014 - 08:35

नात्यातली सलगी कमी होते
माझ्यासवे हे नेहमी होते

आयुष्य म्हणजे डांव पत्त्यांचा
ती हारते त्याची रमी होते

प्रत्यक्ष कोठे बोलतो आपण
शेरातला आशय हमी होते

ज्यांनी मनाचे दार ठोठवले
प्रत्येक वादळ मोसमी होते

आकाश मढु दे लाख रंगांनी
तो भेटला की पंचमी होते

हातातुनी निसटून गेलेले
कित्येक क्षण ते रेशमी होते

त्याच्या गुन्ह्यांची नोंदही नाही
ती शिंकली की बातमी होते

चुकला जरासा नेम मृत्यूचा
त्याचे खरेतर लक्ष्य मी होते

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहुतही बढिया !!
खूप आवडली . जमीनच इतकी सुंदर आहे की बस !!
ती शिंकली की बातमी होते<< एकदम खास मिसरा !! तसे बरेच मिसरे अतीशय उत्तमैत .
अभिनंदन तै !!

एक शेर सुचला

डोळ्यातले आभाळ ओढाळे
मग दु:ख माझे मौसमी होते

धन्यवाद .

धन्यवाद वैवकु,

मौसमीवर विचार करतच होते, तुमचा शेर खासच !

जमिन सुचल्यावर १० व्या मिनिटाला गझल संपली.

Happy

छान.

चुकला जरासा नेम मृत्यूचा
त्याचे खरेतर लक्ष्य मी होते

ख़ास.

- दिलीप बिरुटे

ज्यांनी मनाचे दार ठोठवले
प्रत्येक वादळ मोसमी होते

चुकला जरासा नेम मृत्यूचा
त्याचे खरेतर लक्ष्य मी होते<<< वा वा

वा..!

त्याच्या गुन्ह्यांची नोंदही नाही
ती शिंकली ही बातमी होते....वा व्वा !े

चुकला जरासा नेम मृत्यूचा
त्याचे खरेतर लक्ष्य मी होते...निशःब्द केलंत !

Happy

ज्यांनी मनाचे दार ठोठवले
प्रत्येक वादळ मोसमी होते

आकाश सजते लाख रंगांनी
तो भेटला की पंचमी होते

चांगल्या आहेत वरील द्विपदी.

ठळक केलेला शब्द 'ज्याने' असा करावयाची आवश्यकता आहे कारण आपण खाली 'प्रत्येक वादळ' असा एका वादळाकरीताचा शब्दसमूह वापरला आहात.

अवांतरः (ह्याबद्दल कवयित्रीची आधीच क्षमा मागतो _/\_ )
इथे असलेले तथाकथित जाणकार अशा गोष्टी स्पष्टपणे सांगत का नाहीत हे एक कोडेच आहे.

लिहिणार्‍याला भ्रमात ठेवून अशा चुका होऊ द्यायच्या म्हणजे हे आयुष्यभर तज्ञपणाची शेखी मिरवायला मोकळे! हे धोरण फार काळ टिकणार नाही!