तुला..मला..

Submitted by रमा. on 26 October, 2014 - 22:36

तू मला अन मी तुला पाहिले मला तुला
नेमके न बोलले कधीच मी सख्या तुला..

आपल्यात आडवी अनेक आली अंतरे
डोकवून अंतरात काय लाभले तुला..

बोलण्यास नेहमीच शब्द का हवेत रे
कोठली भाषांतरे कळणार रे प्रिया तुला..

Group content visibility: 
Public - accessible to all site users