पर-राज्यात सामान शिफ्टींग

Submitted by मेधावि on 25 October, 2014 - 03:28

नवीन नोकरीसाठी बेंगलोरात जायचंय एक वर्षासाठी. सामान शिफ्टींगसाठी मुव्हर्स व पॅकर्स खेरीज काही इतर पर्याय आहेत का? मु. आ पॅ. फार महाग आहे. तसेच साधारण खर्च किती असतो अश्या वाहतुकीसाठी?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या पिंपरी-चिंचवड नवनगर परिसरात राहणार्‍या एकाने हैद्राबाद शहरात स्थलांतर केले. त्याचे सर्व घरसामान फक्त रुपये ६,०००/- इतक्या कमी वाहतूक खर्चात हलविले गेले. हे शक्य झाले कारण ओम लॉजिस्टीक्स या वाहतूक संस्थेत व्यवस्थापक पदावर काम करणारे एक गृहस्थ जवळच राहतात. त्यांनी हैद्राबाद येथून सामान घेऊन आलेली व पुन्हा रिकामा हौदा घेऊन तिथे जाणार एक मालमोटार त्यांना मिळवून दिली.

आपल्याही ओळखीत असे कुणी वाहतूक संस्थेत काम करणारे असतील तर त्यांच्या ओळखीचा जरूर लाभ घ्यावा.

स्वतःच सामान पॅक केलं आणि मूव्हिंगसाठी टेम्पो ठरवला तर बरंच स्वस्त पडतं. पण नाजुक काच सामान, ईलेक्ट्रॉणिक्स वस्तू, व्हाईट गूड्स यांचे पॅकिंग काळजीपूर्वक करावे लागते. दुकानदारांकडून मोठाले खोके आणून त्यामध्ये सामान भरून पॅकिंग व्यवस्थित करता येतं. आम्ही दरवेळी (आणी दर दोन तीन वर्षांनी तेच करतो)

तुम्ही एकाच वर्षासाठी जाणार असल्यानं नक्की किती सामान गरजेचं आहे त्याचा विचार करा आणि त्यानुसार पॅकिंग करून रेल्वेमध्ये सामानाची खोकी टाकू शकता. ते जास्त सोपं पडेल. बंगलोर बर्‍यापैकी मोठं शहर असल्यानं ज्याची अगदीच आवश्यकता असेल ते तिथं विकत घेता येऊ शकतं.

Are you coming alone or with family? Your luggage could exponentially increase or reduce depending on this. Either way please make a list of mandatory items must be shifted. Earlier inquired about shifting of your car also, you can load your luggage in car and drive here. You could have a nice road trip, if you're into such things. Please check expenditure on moving vis-a-vis purchasing new things. While calculating moving expenditure please don't forget to add cost of broken items as well as your peace of mind. Options of service apartment is also there if company is paying for accommodation. The rent of serviced apartments varies from locality and community. Options of PG is also available if coming alone. Since you're coming here for only one year, I suggested options like serviced apt or PG. Please don't hesitate to drop an email if any specific question about locality, community, shopping etc. Bring sufficient kala masala and thalipith bhajni, they are not available here. Now a days good sabudana is available.

Search for decent packers and movers on google, its a blore no. I once shifted my omni for 3.5k from blore to pune when everyone one else was asking for 7k onwards. It reached on time and in proper condition. Same mover We used for our local shifting but he sent smaĺl tempo instead of truck and had to do two rounds. But again cost was 50% less. Luggage came alright.

सुमेधा ताई: हल्ली बर्याच IT कंपन्यांचा movers and packersशी टाय-अप असतो. आपण एकदा आपल्या HRला विचारुन पहा. रिएम्बर्समेंटचा त्रासही थोडासा कमी होईल!

सुमेधा ताई: हल्ली बर्याच IT कंपन्यांचा movers and packersशी टाय-अप असतो. आपण एकदा आपल्या HRला विचारुन पहा. रिएम्बर्समेंटचा त्रासही थोडासा कमी होईल!
>>

हो खरेय, माझ्या एका मैत्रीणीने असेच शिफ्टिंग केले, तिचा नवरा बहुधा टीसीई मध्ये होता, खर्च कंपनीनेच उचललेला. movers and packers सर्विसच्या सफाईदारपणाचे तोंड फाटेस्तोवर कौतुक चालू होते. असो, जर आपल्या कंपनीचे त्यांच्याशी किंवा इतर कोणाशी टायअप असल्यास कन्सेशन मिळाले तर कदाचित परवडेबल होऊ शकते. अन्यथा टेंपोच झिंदाबाद, त्यातही घरगुती सामान हलवाहलवीचा अनुभव असलेलाच बघणे.

मी पण आताच शिफ्ट झालोय पुण्यात, ठाण्याहून. कंपनीनेच करून दिलं. एकाही सामानाला हात लावावा लागला नाही. नवीन घर मात्र आपल्यालाच लावावं लागतं. ते लोक सामान अनलोड करून फ्लॅट्मध्ये आणून देतात.

चांगला मूव्हर्स अ‍ॅन्ड पॅकर्स पाहा. आपल्याला शांतता असते. थोडे पैसे लागलेत तरीही, डोर टू डोर सर्वीस मिळेल. सामान लोड-अनलोड करण्याकरता जी मॅनपॉवर लागते तीही तेच लोक मॅनेज करतात.
तुम्ही स्वतः करायचं म्हटलं तर बराच वेळही लागेल if you are doing it for the first time.