अभिप्राय

Submitted by संपादक on 23 October, 2014 - 21:05

वाचकहो,

आपणां सर्वांस दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २०१४बद्दल आपले अभिप्राय येथे वाचण्यास आम्ही उत्सुक आहोत. अनेक मायबोलीकरांच्या स्वयंस्फूर्त सहभागामुळेच या अंकाची निर्मिती होऊ शकली, याची आम्हांस विनम्र जाणीव आहे.

बहुविध साहित्याने नटलेली ही निर्मिती आपल्याला कशी वाटली, हे जरूर सांगा. अंकातील प्रत्येक लेखावर प्रतिसाद देण्याचीही सोय आहे. ते सर्व प्रतिसाद या दुव्यावर पाहू शकता: http://vishesh.maayboli.com/navinlekhan

हितगुज दिवाळी अंक २०१४

विषय: 

कंटेंट कमी आहे, परंतू आहे तो दर्जेदार आहे त्यामुळे दिवाळी अंक आवडला. संपादक मंडळाचे अभिनंदन आणि धन्यवाद.

अंक अतिशय देखणा दिसत आहे. विशेषतः हा इ-अंक आहे याची जाणीव ठेऊन सर्व उपलब्ध फीचर्स वापरून सुरेखसा अंक बांधला आहे. संपादक मंडळातील सर्व सदस्यांचे, कलाकारांचे आणि मदतनीसांचे अभिनंदन. गेले चार महिने केलेल्या कष्टांचे उत्तम फळ म्हणजे हा अंक आहे हे नक्कीच.

************************************************************************************************

शूम्पीनं एक अत्यंत महत्त्वाचं कार्य करून ठेवल्याबद्दल तिचे आभार. Proud

हितगूज दिवाळी अंकातील आवडलेल्या गोष्टी

* संपादक मंडळ, रेखाटनकार यांची फोटो/चित्रासकट थोडक्यात ओळख ही भन्नाट आयडिया आहे. खरेच अभिनव. + १
* कथा आणि काव्य वाचनाची कल्पना + १
* रेखाटने + १. अत्यंत सुरेख सुरेख आणि समर्पक रेखाटनं काढून साहित्याची मजा वाढवल्याबद्दल सर्व चित्रकारांसाठी ए.जो.टा. झा.पा. माझ्या 'गंध' कथेसाठी केश्वीनं जबरदस्त चित्रं काढलंय. थेट प्रोफेशनल! केश्वे त्याबद्दल मनःपूर्वक आभार.
* लेख/कविता/कथे च्या पानावर लेखकाचा/कविचा थोडक्यात परिचय + १
* बॅकग्राउंडवरची कोयरीच्या डिझाइनची नाजूक नक्षी + १
* मुखपृष्ठावरची कृष्णधवल चित्रे आणि संगीत +१
* त्या त्या लेखाखाली प्रतिसाद देण्याची सोय +१
* छोट्या जाहिराती +१
* मेंडकेची रेखाटने - आधी रेखाटनांचा उल्लेख केलेला आहेच पण मेंडकेची चित्रं डिजर्व स्पेशल मेन्शन + १. एजोटाझापा.
* त्या सोनेरी लखोट्यावर लिहिलेल्या सुरस इंफोबिट्स (हे कुठंय? )

काहीजणांनी ती हलती चित्रं आहेत म्हणून जरा त्रास होत आहे असं नमूद केलंय. माझं मत जरा वेगळं आहे. या फीचरमुळे अंक एकदम हटके आणि फेस्टीव दिसत आहे. नेहमीच्या छापील अंकाच्या तुलनेत इ-अंक वेगळा दिसायला काय हरकत आहे?

कथा मात्र खरंच कमी वाटल्या. कारण काय ते माहित नाही अर्थात.

अंक जसजसा वाचत जाईन तसतशी इथे टुमणी लावत जाईन हो संपादक.

* कलादालनात इतर रेखाटनांचेही संकलन करायला हवे असे वाटते. सर्व रेखाटने एकत्रित आणि चित्रकारांच्या नावानिशी दिसतील.

सकृत दर्शनी अंक आवडला.कष्ट दिसतात.संपादक आणि निर्मितीतील सर्वांचे अभिनंदन!हळूहळू वाचत आहे त्यानुसार त्यात्या ठिकाणी अभिप्राय दिले आहेत. देत आहे.

नमस्कार!

वाचकांचा वावर आणि अंकाचे वाचन हे सुलभ व्हावे, या हेतूने अंकात काही बदल केले आहेत -

१. स्मार्टफोनवरून मेन्यू दिसत नसल्याने अनुक्रमणिकेचे पान संपादकीय पानाच्या शेवटी दिले आहे.
२. अनुक्रमणिकेत लेखक/कवींची नावं साहित्यप्रकारासमोर दिली आहेत.
३. पानाच्या उजव्या बाजूस जी झलक आहे, तीत प्रत्येक साहित्याचे दुवे दिले आहेत.
४. मुख्य पानावरील अ‍ॅनिमेशन कमी केले आहे.
५. पानांच्या डोक्यावरील स्लायडरची उंची कमी केली आहे. तिथली चित्रे बदलून मोकळी जागा जास्त असणारी नवी चित्रे टाकली आहेत, जेणेकरून बदललेल्या चित्रांमुळे वाचनात व्यत्यय येऊ नये.
६. आधी असलेल्या स्लायडरमधली चित्रे 'कलादालन' या खास विभागात बघता येतील.
७. कवितांची आणि गझलांची ध्वनिमुद्रणे दृक्‌श्राव्य विभागात स्वतंत्र पानांवर दिली आहेत.

काही बदल तांत्रिक अडचणींमुळे करता आले नाहीत. ते पुढीलप्रमाणे -

१. दिवाळी अंकास पहिल्यांदा भेट दिली असता प्रतिसाद देण्यासाठी पुन्हा लॉगिन करावे लागते, याचे कारण म्हणजे दिवाळी अंक द्रुपल ७वर आधारित आहे, तर मायबोली अजूनही द्रुपल ६ वापरते.
२. प्रतिसाद संपादित केला असता तिथे देवनागरी लिहिता येत नाही. हा द्रुपल ७ इन्स्टॉल केल्यावर आलेला प्रश्न आहे ज्यावर मायबोली प्रशासन तोडगा शोधत आहे.
३. दिवाळी अंकातील नवीन लेखनाचे पान मुख्य मायबोलीत दिसत नाही, कारण दिवाळी अंक हा 'विशेष' डोमेनवर असतो, तर 'मायबोली' ही मायबोली डोमेनवर असते. त्यासाठीच 'अभिप्राय' हा धागा मुख्य मायबोलीत काढलेला असतो.
४. स्मार्ट फोनवर मेन्यू दिसत नाही, कारण तिथे मर्यादित मोबाइल आवृत्ती दिसते.
५. मेंडकेचा सल्ला आणि हास्यावली या दोन सदरांवर पानांना क्रमांक घालण्यासाठी जे तंत्र वापरले आहे त्यामुळे प्रतिसाद देण्याची सोय करता येत नाही. ही सुद्धा मायबोलीची तांत्रिक अडचण आहे.
६. अंकासाठी फाँटचा आकार अथवा वजन कमी-जास्त केलेले नाही. फाँट खूप लहान वाटत असल्यास ब्राउझरची फाँट साइझ वाढवून बघावी.

प्रतिसादावर प्रतिसाद देता येणे, प्रतिसादातले काही शब्द प्रतिसादाच्या वर मोठ्या आकारात दिसणे ही द्रुपल ७ची फीचर्स आहेत, तांत्रिक चुका नाहीत.

तुम्हां सर्वांच्या अभिप्रायांबद्दल आम्ही आभारी आहोत. आपल्या सोयीसाठी प्रकाशन झाल्यावर अंकाचे दृश्यस्वरूप शक्य तेवढ्या तत्परतेने बदलण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. सर्वच सूचनांची अंमलबजावणी करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य झाले नाही, त्याबद्दल दिलगीर आहोत. यापुढे मात्र आपण आपले म्हणणे 'हितगुज दिवाळी अंक, अनुभव, अपेक्षा, सूचना' या धाग्यावर अवश्य नोंदवून ठेवा.

...तर मंडळी, याबरोबरच आम्ही संपादकपदाचे झगे उतरवून ठेवत आहोत. मायबोलीवर आपली भेट होत राहीलच.

धन्यवाद!

संपादक मंडळ,
हितगुज दिवाळी अंक २०१४

संपादक मंडळ,
तुम्ही केलेलं शंकानिरसन आणि वाचक सभासदांच्या सूचनांनुसार केलेले बदल याबद्दल खूप धन्यवाद.

एक लॉजिकल अपेक्षा म्हणजे मुखपृष्ठावर क्लिक केले की पुढे डायरेक्ट अनुक्रमणिका (क्लिकेबल) उघडायला हवी ! संपादकीय वाचण्याची सक्ती का ? Happy ते आहेच अनुक्रमणिकेत. ज्यांना वाचायचे ते वाचतील तिथे क्लिक करून.

स्मार्टफोनवर अंकाची झलक पाहिली होती. काल डेस्कटॉपवर अंक चाळला. संपादक, रेखाटनकार यांची ओळख देण्याची कल्पना फार्फार आवडली. संपादक मंडळींनी लिहिलंयही छान.
प्रत्येक लेखासोबत त्या-त्या लेखकाची ओळख, ऑडिओ स्वरूपातलं साहित्य हे प्रयोग पण खूप आवडले. ऑनलाईन अंकाचे म्हणून हे पैलू असायलाच हवेत.

आता हळूहळू अंक वाचायला सुरूवात करणार. त्या-त्या ठिकाणी प्रतिसाद देईनच. Happy

अंक प्रकाशित केल्यानंतर! वाचकांच्या समस्या आणि सूचनांचा विचार करुन अंकात आवश्यक ते बदल करणारे, त्रुटींवर (मान्य करुन!!) त्यात बदल करणारे हे बहुधा पहिलेच संपादक मंडळ असेल. यासाठी संपादक मंडळाचे खास कौतुक आणि अभिनंदन! Happy

दिवाळी अंक मस्त देखणा जमला आहे.
संपादक मंडळाची ओळख करुन देण्याची अनोखी पध्द्त आवडली Happy
मेंडकेचा सल्ला आणि संपादकांची चित्रे मस्त जमली आहेत.

दिवाळी अंक खुपच छान झाला आहे. एकदम 'टेकी' अंक आहे यावेळचा,
सर्व संपादक मंडळाचं अभिनंदन! यामागे प्रचंड मेहनत केलेली जाणवत आहे त्याबद्दल

hats off.jpg

अभिप्राय बर्‍याच उशीरा दिल्याबद्दल क्षमस्व! वाचून मग अभिप्राय देत आहे.

अर्ध्याहून अधिक दिवाळी अंक वाचून झालाय आणि त्या त्या लेखनावर प्रतिसाद दिलेच आहेत. उरलेलाही लवकरच वाचून संपवेन.
अनेकांनी लिहिल्याप्रमाणे या अंकात साधलेल्या नवीन गोष्टी जसे संपादक मंडळ व अन्य चमूची ओळख, सजावट, पानपूरके, ऑडियो लिंक्स इत्यादी गोष्टी आवडल्याच. संकल्पना आणि तंत्राचा वापर या दोन्हीत एक मोठा पल्ला या अंकाने गाठला. या सगळ्यामागे संपादक-निर्मिती चमूने केलेल्या प्रचंड मेहनतीचे कौतुक करायलाच हवे.

दिवाळी अंकातल्या साहित्याचा एकंदर दर्जाही चांगलाच वाटला. सगळ्या कथा शेवटपर्यंत वाचाव्याश्या वाटल्या आणि त्यातले काही ना काही मागे रेंगाळत राहिले. (अगदी छापील दिवाळी अंकांतही अलीकडे माझा कल कथांपेक्षा लेखांकडेच असतो. कथा वाचल्यावर अनेकदा वेळ फुकट गेल्याचे फीलिंग येते.)
विचारमंथनातल्या 'सामर्थ्य आहे चळवळीचे' या सदरातील प्रत्येक लेख उत्तम आहे. त्या त्या विषयाला आणि एकंदर या कल्पनेला न्याय मिळालाय. संपादक मंडळाने हे लेख लिहून घेतले असल्याची शक्यता असल्याने त्यांचे विशेष कौतुक.
देशोदेशीची खाद्यसंस्कृती मात्र माझ्या पचनी पडली नाही. हा माझ्याच पोटाचा आणि जिभेचा दोष असेल कदाचित.
पद्य विभागानेही निराशा केली (नेहमीप्रमाणेच).
सध्या इतकेच.

संपादक मंडळी आणि सर्व मदतनीसांचं मनःपूर्वक अभिनंदन!

दिवाळी अंकाची मांडणी आणि तांत्रिक गोष्टीबद्दल वर जे कौतुकाचे प्रतिसाद आहेत त्या सगळ्या प्रतिसादांना +१००. खूप छान अंक सादर केला आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून. अनेक नवीन कल्पना तुम्ही यंदा मांडल्यात, तडीला नेल्यात आणि वाचकांना त्या आवडल्यात हे इथल्या प्रतिसादांवरून स्पष्ट होतं आहेच. तुम्ही अहोरात्र घेतलेल्या कष्टांचे मनापासून कौतुक वाटतेय.
अंकाचा फाँट थोऽडा मोठा असता तर वाचन सुलभ झालं असतं.

कथाविभाग पूर्ण वाचून झालाय. तिथे प्रतिसाद दिलेला आहेच. बाकी अंकाचं वाचन जमेल त्या वेगाने चालू आहे. प्रतिसाद लिहिनच.
इथले अनेक प्रतिसाद 'केवळ झोडून काढायचं' म्हणून लिहिलेले दिसतात. त्याबद्दल खेद वाटतो. न आवडलेल्या, खटकलेल्या गोष्टी संयमित शब्दांत मांडता येतात. नकारात्मक प्रतिसाद लिहिताना कोणीतरी हे आपल्यासमोर आणण्यासाठी अपार मेहनत (विनामोबदला) घेतली आहे याची जाणीव असावी.

Pages