देवांचे जुने फोटो, धार्मिक पुस्तकांचे काय करायचे?

Submitted by टोच्या on 21 October, 2014 - 11:01

प्रत्येकाच्याच घरात देवांचे फोटो असतात. दरवर्षी त्यात एक-दोन फोटोंची भर पडतच असते. घरात देवा-धर्माची अनेक पुस्तकेही असतात. मग त्यात अगदी महालक्ष्मीच्या पुस्तकांपासून ते गीता, महाभारत, रामायणासारख्या महान ग्रंथांपर्यंत. वर्षानुवर्षे घरात असलेले फोटो कुजतात, फुटतात किंवा अस्पष्ट होतात. धार्मिक पुस्तके आपण कचराकुंडीत फेकून देऊ शकत नाही. धार्मिक साहित्य नदीत सोडावे अशी एक धारणा आहे. मात्र, नदीत सोडले तर त्यावर गाळ साचून, लोकांचे पाय लागून त्याची अधिकच विटंबना होऊ शकते. अशी पुस्तके, फोटो जाळूनही टाकता येत नाही. मग अशा साहित्याचे करायचे काय, याबाबत आपल्या सूचनांचे स्वागत आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Purchase good quality paper shredder and shred those papers. Once shredded, it will be just like any other recyclable material.

देवांचे जुने फोटो, धार्मिक पुस्तकांचे काय करायचे? हा जो अनमोल ठेवा आहे तो जपूनच ठेवावा लागणार. पाण्यात सोडणे, जाळणे हे प्रकार देवांचे जुने फोटो, धार्मिक पुस्तकांचे बाबतीत योग्य नाहीत.

ज्याप्रमाणे घरात सोने असले तर आपण वापरो न वापरो त्याची आपल्याला अडचण होत नाही त्याचप्रमाणे हा अध्यात्मिक खजिना आहे त्याची विल्हेवाट लावणे हे योग्य नाही.

अति आणि शेवटचं अवांतर -

इब्लिसदा, मी त्यांच्या पोस्ट्स इग्नोर करत होते इतके दिवस... आज पहिद्यांदा वाचली आणि खुलासा झाला Proud

मुंबईमध्ये कुठे सोडणार?

बांद्रा खाडी - वास तरी घेववतो का त्या पाण्याचा? मी अस ऐकलंय गाडी त्या पुलावारुन जाताना वास सहन न झाल्यामुळे लोक एकमेकांच्या पाठीला नाक लाऊन असतात.

कल्याण/मुंब्रा खाडी - सर्व म्लेंछ लोकांचे प्रातर्विधी याच खाडीत होतात. Happy
वरळी/दादर - मुंबईची गटार इथे सोडलेली आहेत.

या विषयावर उपयुक्त मते मान्डणार्‍या काही "आयड्या" पाहून आश्चर्याचा धक्का बसला मला Proud
असो.
मी कुठेच काही टाकायला जात नाही. नकोशा/खराब तसबिरी सरळ बाहेर मागल्या अंगणात झाडाखाली झाकून ठेवून देतो. एका पावसाळ्यात त्यास कसर/ओल याने पंचमहाभूतात विलिनत्व मिळते.
(आज ना उद्या आपल्यालाही त्याच पंचमहाभूतांत विलिन व्हायच आहे याची खूणगाठ मनाशी असली म्हणजे झाले)

Pages