दु:खद घटना - कड्यावरून पडून ट्रेकरचा मृत्यू

Submitted by prafullashimpi on 21 October, 2014 - 08:16

आत्ताच म.टा.वर ही बातमी वाचण्यात आलीये.

ट्रेक क्षितिज या संस्थेचे सदस्य असलेले नारायण चौधरी यांचा दु:खद अंत झाल्याचे समजले. त्यांच्या कुटूंबियां ना हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/trekker-killed...

गुमतारा किल्ला एव्हढा धोकादायक आहे क?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुदैवी घटना.
कड्यावर अरूंद पायवाटेवर या दिवसांत शेवेसारखे बारीक गवत पडलेले असते ते फारच फसवे असते. हे अनुभवी ट्रेकर असल्यामुळे तशी ते काळजी घेणारे असतील .माकडांचा हल्ला झाला असेल घाईत असतील{परवाचा वादळी पाऊस} अथवा साप पायात आला असेल.

.

या दिवसांत शेवेसारखे बारीक गवत पडलेले असते ते फारच फसवे असते >> म्ह्णजे नक्की काय? Uhoh

बाकी घटना दुर्दैवीच Sad

शेवेसारखे गवत: इर्शाळगड, चंदेरीला आहे एकप्रकारचे बारीक लांब पिवळे गवत पावसाळा संपल्यावर वाळून तिथेच खडकावर आडवे पडलेले असते त्यावर पाय ठेवला की सुसाट घसरते हेच दरीच्या कडेवरच्या पायवाटेवर अतिशय धोकादायक असते. अजून एक बारीक खडी (=scree) अशिच धोकादायक असते.पावसाळ्यात पायऱ्यांवरचे शेवाळे (सरसगड .जीवधन)धोकादायक असलेतरी यावेळी गडकरी अगोदरच सावध असतात किंवा जात नाहीत.