उत्तम ब्लॉग बनवायचा आहे - माहिती हवी आहे.

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 October, 2014 - 03:51

मायबोलीवर रुळून मला बरेपैकी कालावधी झालाय. इथेतिथे शेव-कुरमुरे सारख्या माझ्या पोस्ट आणि चणे-फुटाणे सारखे धागे तुम्ही बघत असालच. पण त्यातच एखादा काजू-बदाम निघतो. म्हणजेच अनपेक्षितपणे चांगले वा ठिकठाक लिहीले जाते. बस्स असलेच काही लिखाण एका जागी सेव्ह करून ठेवावे म्हणून मला एक ब्लॉग बनवायचा आहे.

=> ब्लॉग बनवायचा हेतू -

१) आवडीचे आणि निवडक लिखाण एका जागी सुरक्षित राहावे, अन्यथा एके दिवशी उठायचो आणि समजायचे मायबोलीला टाळे लागलेय, कि झाले कल्याण, गेले सारे लिखाण ढगात.
२) माझ्या मित्र-मैत्रीणींना ते निवडक लिखाण एकाच लिंक मध्ये वाचायला देता यावे. मायबोलीच्या लिंक द्यायला भितीच वाटते कारण देवा कधी कधी त्या खालचे प्रतिसाद फारच डेंजरस असतात. (याच कारणास्तव आजपर्यंत मी माझ्या गर्लफ्रेंडला देखील माझे काहीच वाचायला दिलेले नाही :()

=> ब्लॉगकडून माझ्या अपेक्षा आणि ब्लॉग बनवण्यासाठी अपेक्षित असलेली मदत

१) चांगली आणि विश्वासार्ह वेबसाईट -- मी गूगाळले असता ब्लॉगस्पॉट, वर्डप्रेस वगैरे दोन-तीन प्रामुख्याने सापडल्या.
२) आकर्षक तसेच उपयुक्त थीम -- दूरद्रुष्टीचा विचार करता जर त्यावर ३००-४०० लेख पडले तर विभागवार आणि तारखेनुसार रेकॉर्ड ठेवायला आणि शोधायला सोपे.
३) चांगला मराठी फॉंट -- हे सर्वात महत्वाचे. वाचकांच्या सोयीचा फॉंट असायलाच हवा. (हा थीमनुसार असतो? बदलतो? कि फॉंट डाऊनलोड करावे लागतात? कोणता आणि काय कसे वगैरे.)
४) हे सारे फुकट हवे! ब्लॉगनिर्मितीचा खर्च शून्य हवा! Happy

=> मला ब्लॉगजगताचा काहीच अनुभव नसल्याने या अपेक्षांमध्ये मी काही मिसतोय असे वाटल्यास स्वत:तर्फे भर टाकू शकता.

येथील माहितीचा फायदा सर्वच ब्लॉग बनवण्यास उत्सुक उमेदवारांना व्हावा. तसेच ज्यांनी आधीच ब्लॉग बनवले आहेत त्यांनाही सुधारणा करता येईल. ज्यांनी हल्लीच ब्लॉग बनवलेत अश्यांनीही आपल्याकडचे ज्ञान नक्कीच शेअर करावे. कदाचित त्यांच्याकडे काही लेटेस्ट इन्फॉर्मेशन असावी जी जुन्या ब्लॉगधारकांनाही माहीत नसावी.

ईन अ‍ॅडव्हान्स आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

Group content visibility: 
Public - accessible to all site users

mahesh.png

महेश +१०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००.

I am not your fan. I have better people to be fan of.

But I am Runmesh's fan.>> Made for each other Proud

<< उत्तम ब्लॉग बनवायचा आहे >>

उत्तम???

फक्त सजावट की मजकूर देखील?

यावर विचार व्हायला हवा.

उत्तम व कसदार लेखनाकरिता शुभेच्छा.

धन्यवाद, बेफिकिर, सिनी आणि चेतनजी..

चेतनजी,
उत्तम कसदार वगैरे लिहिणे हे गॉड गिफ्ट असते. जर मला ते जमत नसेल तर बुरा मै नही, बुरा तो वोह है .. (दिल तो पागल है ;))
काही लोक प्रतिसाद टंकून आनंद घेतात तर काही वाचून, हे ही नसे थोडके, भाजीत भाजी दोडके Happy

स्पार्टाकस, त्यात काही लोक लिहिले आहे, आपण बहुधा हम लोक वाचत आहात, बाकी अंदाज अपना अपना, डुक्कर एका धर्मात निषिद्ध असते तर दुसर्‍या धर्मात ते अन्न असते, जग आपल्या नियमांवर नाही चालत, आपण मात्र स्वतःच्या नियमांवर चालायचे का जगाच्या हे ठरवायचा अधिकार राखून असतो ..

स्पार्टाकस, त्यात काही लोक लिहिले आहे, आपण बहुधा हम लोक वाचत आहात, बाकी अंदाज अपना अपना, डुक्कर एका धर्मात निषिद्ध असते तर दुसर्‍या धर्मात ते अन्न असते, जग आपल्या नियमांवर नाही चालत, आपण मात्र स्वतःच्या नियमांवर चालायचे का जगाच्या हे ठरवायचा अधिकार राखून असतो ..

--->

काहीही म्हणा ... या lines जमल्या आहेत ... वेरी गुड ...

नमस्कार,

तुम्हाला जर वर्डप्रेस विषयी मराठीतून अधिक जाणून घ्यायचे असल्यास माझ्या https://www.onlinetushar.com/ या ब्लॉगला नक्की भेट द्या. यात तुम्हाला वर्डप्रेसवर ब्लॉग कसा सुरु करावा यापासून पुढील सर्व माहिती अतिशय सोप्या मराठी भाषेत वाचायला मिळेल. वर्डप्रेस विषयी कशी शंका असल्यास तुम्हला मला माझ्या ब्लॉगवरच संपर्क साधू शकता. धन्यवाद!

नक्षत्रप्रकाश हा ज्योतिषविषयक दिवाळी २०१९ अंक तुम्ही खालील लिंकवर/फोटोवर क्लिक करून वाचू शकाल किंवा PDF copy नाममात्र शुल्क देऊन download करू शकाल.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

ज्योतिषशास्री नितीन जोगळेकर
https://www.instamojo.com/joglekar_nitin/bd1806dcdd5c8635b7de501c6097c25b/

चार पाच क्लाउड वेबसर्वर्स सबस्क्राईब करायचे, १० GPBS नेट स्पीड सहीत. त्यावर फ्री ब्लॉगिंग सर्व्हिस सुरू करायची, आणि टिव्ही, सोमीवर जाहिरात विभागात(च) भरपूर जाहिरात करायची.

नाव ठेवायचं: उत्तम ब्लॉग.

Pages