शोध सत्पुरुषांच्या कार्यांचा

Submitted by विनायक. दि.पत्की. on 18 October, 2014 - 10:52

गुरु ब्रम्हा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्हः तस्मै श्री गुरुवेनमः

सद्गुरु श्री सदानंद बुवा उर्फ श्री गोविंद रामराव पत्की
shri harihar.jpg

कलावधी .........ई.स.१८८४ ते १९४०

समस्त मायबोली करांना सप्रेम नमस्कार व दिपावली च्या हार्दीक शुभेच्छा

श्री सद्गुरु सदानंद बुवा हे आमच्या पत्की घराण्यात होउन गेलेले थोर सत्पुरुष होते यांचा मठ आज कर्नाटकातील श्री क्षेत्र हरीहर येथे आहे परंतु यांची बहुतांश कारकिर्द कर्नाटकातील कारवार येथे गेली . मुळात श्री सदानंद बुवांना अध्यात्म व संन्यास वृत्ती शिवाय कुठ्ल्याही गोष्टीत रस नव्ह्ता त्यामुळे त्यांच्या विषयी आज माझ्या जवळ असलेली महिती फारच त्रोटक स्वरुपात आहे .

||चेतो भृंग भृम चिमुदा
भव हर भुममु ईरसाया
भज भज लक्ष्मी नरसिहा
नगपद सरसिज मकरंदम ||

हे भजन ते हमेशा म्हणत असत. तेव्हा हे भजन ज्यांना महिती आहे किंवा म्हणत असतील त्यांना हि यांच्या बद्द्ल काही माहिती उपलब्ध असल्यास हि कृपया मला कळवावे

तेव्हा समस्त मायबोली करांना मी या व्दारे विनंती करु ईच्छीतो कि आपल्या पैकी कोणी कारवार या गावाशी संबंधीत असतील आणी श्री सदानंद बुवां विषयी माहिती देउ ईच्छीत असतील ,किंवा त्यांनी केलेली साहित्य निर्मीती (मराठी मोडी भाषेत केली होती ) उपलब्ध असेल तर कृपया मला कळवले तर त्याव्दारे मला त्यांच्या विषयी येथे विस्तृत लिखाण करण्याची संधी मिळेल .कृपया आपले बहुमुल्य सहकार्याची अपेक्षा असलेला

.................विनायक.दि.पत्की

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

" गुरु ब्रम्हा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मये श्री गुरुवेनम:"