केवढी मोठ्ठी फसवणुक वाटते

Submitted by मयुरेश साने on 16 October, 2014 - 02:26

लोकशाहीची छळवणुक वाटते
ही निवडणुक तर पिळवणुक वाटते

वचननामा घोषणा आश्वासने
केवढी मोठ्ठी फसवणुक वाटते

ह्या प्रचाराच्या सभा ही भाषणे
फार आकर्षक करमणुक वाटते

कोणता निवडून नेता द्यायचा
जीवजाइस्तो दमवणुक वाटते

निवडुनी येतो कसा गुंडा इथे
(कायद्याची ही हसवणुक वाटते)

लोकतंत्राची निघाली लक्तरे
राज्यकर्त्यांची मिरवणुक वाटते

...मयुरेश साने

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा मयुरेश !! प्रत्येक शेर खणखणीत !!
संपूर्ण गझल आवडली

तुझ्या स्पेशल सादरीकरणासोबत अनुभवायला खूप मजा येइल असे वाटते Happy

ठिक