माकुल रिंग्ज चिली.

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 October, 2014 - 06:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नळ (पाईप्) माखुल
आल, लसुण, पेस्ट १ चमचा
चिमुटभर हिंग
पाव चमचा हळद
१ ते दोन चमचे मसाला किंवा अर्धा चमचा मिरची पुड
२-३ पाकळ्या ठेचलेला लसुण
१ मोठा कांदा चिरुन
१ सिमला मिरची कापून तुकडे करून
थोडी चिरलेली कोथिंबीर
थोडिशी चिंच
चविनुसार मिठ
२ चमचे तेल.

क्रमवार पाककृती: 

नळ माखलीची मी आधी रेसिपी दिलेली आहे त्यावरून ती ओळखता येईल.
http://www.maayboli.com/node/25838

१. नळ माखळीच्या थोड्या रिंग्ज धुवून त्याला आल-लसुण पेस्ट लावून वेळ असल्यास थोडे मुरवुन किंवा डायरेक्ट कुकरला १० ते १५ मिनीटे शिजवून घ्या.

२. एका भांड्यात तेलावर लसणाची फोडणी देऊन त्यावर कांदा गुलाबी रंग येई पर्यंत शिजवा.

३. आता त्यात हिंग, हळद, मसाला हे जिन्नस घालून थोडे परतवा आणि लगेच त्यात शिजलेल्या माकुळच्या रिंग्ज आणि सिमला मिरची घालून, मिठ घालून चांगले परतवा.

४. लगेच थोडा चिंचेचा कोळ घाला आणि त्यावर कोथिंबीर घालून परतवा. २-३ मिनीटे परतवून लगेच गॅस बंद करा.

ही डिश स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता व मेन कोर्स म्हणूनही घेऊ शकता. Happy

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणांसाठि
अधिक टिपा: 

चिंचे ऐवजी लिंबू वापरू शकता.
आवडत असल्यास थोडा गरम मसाला वापरू शकता.

वरच्या रेसिपीला अजुन साजेस नाव सुचवलत तरी चालेल. Happy

माहितीचा स्रोत: 
माझाच प्रयोग.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माकुल म्हणजे स्क्वीड्स ना ? त्याला गोव्याला कलामारी असे म्हणतात बहुतेक.
या नुसत्या रिंग्ज बघून अनेकांना कळणार नाही. त्या माश्याचा फोटो टाकायला हवा.

मागे टाकला होता तेंव्हा बर्‍याच जणांना फोटो आवडला नव्हता म्हणून मी लिंक दिली आहे.
हो दिनेशदा माकुल म्हणजे स्क्वीड्स.

सही पाककृती, जागू. बशीत काढल्यावरचा फोटोपण आवडला.

माकुल म्हणायचं की माखुल?

बाय द वे, तुमची भरल्या खेकड्यांची पाककृती ओळखीच्यांना दिली. त्यांनी करून खाल्ली आणि आवडल्याचं तुम्हाला कळवायला सांगितलंय. धन्यवाद!

मी आधीच्या रेसिपीतल्या रिंग्स करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता मागे एक्दा. घेताना बहुतेक नळ माखुल न घेता त्या शॉर्ट माखुल असतात त्या घेतल्या गेल्या (कारण फोटोत खुप लांब दिसत होत्या पण मी घेतलेल्या १ इंची होत्या). कोळणीलाच साफ करायला सांगितल्या, तिने चक्क फाडुनच टाकले त्याना. मी रिंग्स हव्यात ओरडत राहिले पण तिने वाट लावली त्यांची. घरी आणुन उकडल्यावर चव एकदम याक वाटली आणि दिले सगळे टाकुन.

परत प्रयत्न करावा काय? जर लांबट माकुल कधी मिळाले तर नक्की करीन.

मागच्यावेळेस मी केलेल्या माकुलाच्या रिंगा शॅलो फ्राय केल्या तर दडसल्या होत्या. आता फिरून प्रयत्न करते

सायो, डीविनिता Happy
मृण्मयी धन्स ग इतक्या आवर्जुन सांगितल्याबद्दल. माखुल, माकुल दोन्ही म्हणतात.
साधना तू माझ्याकडे येशिल तेंव्हा शिकवून खिलवेन Happy

dakshe aata dusarya mashavar udi ghe. kiti divas tya suramaichya chavivar rengalnar aahes ? (hahaha....)

मस्त रेसिपी जागू. इथे कायम मिळतात पण कसे करायचे माहिती नसल्याने आणणे होत नव्हते. आता नक्की करीन.

कूकरमधे शिजवून घ्यायची आयडीया भारी आहे..