Submitted by पिल्या on 2 October, 2014 - 04:24
आज २ ऑक्टोबर, गांधी जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'स्वच्छ भारत अभियानाची' सुरुवात केली आहे.
आणि त्यात ९ लोकांना nominate केले आहे. पाट्या न टाकता खरोखर जर काम झालं तर फारच उत्तम. (Ice bucket challenge कडून प्रेरणा घेतली गेली आहे असे म्हणत आहेत.)
पंतप्रधानांनी जागा स्वच्छ केल्यानंतर त्याचे video upload करायला सांगितले आहेत.
Nominate केलेली लोक-
Goa Governor Mridula Sinha
Cricket legend Sachin Tendulkar
Yoga guru Baba Ramdev
Congress lawmaker and former union minister Shashi Tharoor
Actor Kamal Hasan
Actor Priyanka Chopra
Actor Salman Khan
Industrialist Anil Ambani
Team of popular TV serial Tarak Mehta Ka Oolta Chashma
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
रावण मरत नाही म्हणुनच तर (
रावण मरत नाही म्हणुनच तर ( शाम्ता) रामाला मान मिळतो.
नाहीतर रामाच्या आस्तित्वाचं.प्रयोजनच संपुन जाईल .
इश्श बाइ नाही , शांताभाउ
इश्श बाइ नाही , शांताभाउ
मी फक्त माझ्यापुरते सांगू
मी फक्त माझ्यापुरते सांगू शकतो. महिन्या दीड महिन्यापूर्वी उरळी-कांचनकरांनी असहकार पुकारल्यानंतर पुण्यातील कचरा वाहून नेण्याची पद्धत बंद झाली. आमच्या घरी आम्ही ओला आणि कोरडा कचरा वेगळा करत होतो. कचरेवाला तो घेऊन जात होता; ते बंद झाले. मग मी ठरवले की आपल्या कचर्याचे निर्मूलन आपणच करायचे.
कंपोस्ट खतासाठी पिट तयार केले. मायबोलीवरच शोधून काढले आणि मॉडर्न कॉलनीतील श्यामा देसाई (1118 Shivaji Nagar,vishwa shobha Pune 411016. Land mark - Near Autoline petrol pump/Central bank
opp.lane of Amrut banglow Last house to the left is Vishwashobha. before kedar nath temple. मोबाईल : 9823459881) यांना संपर्क करून कॉम्पोस्ट करण्यासाठी माध्यम विकत आणले आणि कचरा निर्मूलन सुरू केले. माझे घर आणि ऑफिस एकाच ठिकाणी असल्याने, घरात केसाळ कुत्री (ग्रेस तिचे नाव) असल्याने आणि बाग असल्याने साधारणतः सहा प्रकारचा कचरा होतो . १. किचन वेस्ट (४०%). २. प्लॅस्टिकच्या पिशव्या (५ टक्के) , ३. ऑफिसची कागदपत्रे (४०%) , ४ बागेतील पाने फुले आणि निर्माल्य (१०%) ५. ग्रेसचे केस (३ टक्के) ६. इतर बाटल्या वगैरे. (२ टक्के)
यातील १, ४ आणि ५ कुजतात. कागद दर तीन दिवसांनी जाळतो आणि ती राख पण कॉम्पोस्ट मध्ये टाकतो. बाकीचे प्लास्टिक, बाटल्या वगैरे (कचराकुंडीत टाकावे,पण सध्या सर्व कचराकुंड्या काढून टाकल्या आहेत) एकत्र करून कचर्याच्या पिशवीत बांधून रस्त्यावर ठेवतो. रस्ता झाडणारी बाई उचलून नेते. तिच्याशी बोलणे झाले आहे. ग्रेसला फिरायला नेल्यावर तिची 'शी' कागदात गुंडाळून आणतो आणि संडासात फ्लश करून टाकतो. ही पूर्णतः पर्यावरण पोषक व्यवस्था नाही याची मला जाणीव आहे; पण सध्याच्या परिस्थितीत हाच उपाय मला बरा वाटतो.
तर मुद्दा असा की, वर्गीकरण करता आले तर ८०% प्रश्न सोडवता येईल.
तुझ्या बापाचा रस्ता आहे का? तुझ्या घरात टाकतो का? वगैरे प्रश्नांच्या उत्तरांवरून कुणाशी वाद घालण्याची माझी मानसिकता नसल्याने मी कुणाला थांबवत वगैरे नाही. हे चूक आहे याचीही मला जाणीव आहे. पण मी काही बोलायला गेलो तर शांतपणे बोलू शकत नाही; बोलण्याचे भांडणात, कदाचित मारामारीत सुद्धा रुपांतर होईल असे मला वाटते. मी मार नक्कीच खाणार नाही; समोरच्याला चार देऊनच येईन याची मला खात्री आहे. पण नकोच ते!
कागद दर तीन दिवसांनी जाळतो>>>
कागद दर तीन दिवसांनी जाळतो>>> शरद राव कागद जाळण्यापेक्षा तो पेपर श्रेडर मधुन काढुन रिसायकल करा.
बाकि जे करताहेत त्याबद्दल अभिनंदन. आणि शुभेच्छा.
battery recycle करायला आहे का
battery recycle करायला आहे का काही easy पर्याय ? लाखो batteries दर महिन्याला लोक कचरा मध्ये फेकत असतील . हा फार मोठा धोका आहे पर्यावरणाला .. पण त्याच्यावर काही उपाय नाही.
स्वच्छतेचा एवढा पुळका होता तर
स्वच्छतेचा एवढा पुळका होता तर गुजरातची झोपडपट्टी चिनच्या अध्यक्षांपासून लपवण्यासाठी काही किलोमीटर हिरवं कापड का लावलं होत. दहा वर्ष गुजरात कसला स्वच्छ आणि समृद्ध केलात मग?
खूप चांगला उपक्रम आहे. बघू
खूप चांगला उपक्रम आहे. बघू या काय होतंय!
अभि१ , बॅटर्याच काय? ट्युब
अभि१ ,
बॅटर्याच काय? ट्युब लाईट, FCL Compact Light, वैगेरे साठीही लँप क्रशर आणि रिसायकलींग उ पकरणे
विकसित देशात वापरली जातात. आपल्या ईथे ते सर्व कचर्यात फेकलेच जातात.
खूप चांगला उपक्रम आहे. बघू या
खूप चांगला उपक्रम आहे. बघू या काय होतंय! >> +१
भाऊ, चांगली पोस्ट.
शरद, तुमचं अभिनंदन!
======दहा वर्ष गुजरात कसला
======दहा वर्ष गुजरात कसला स्वच्छ आणि समृद्ध केलात मग? ========
गेली ६५ वर्षे काँग्रेस ने काय दिवे लावले ते जरा सांगाल ?
तुमच्या सारखी शो शायनिंग मारत
तुमच्या सारखी शो शायनिंग मारत नव्हती ती
उत्तर द्यायचे सोडुन दुसरा प्रश्नच उचलायचा हे गोबेल्स निती आहे तुमची
बरोबर आता इतर गोष्टींवरुन
बरोबर आता इतर गोष्टींवरुन जनतेचे लक्ष उडवण्यासाठी हे चालु आहे
नेमके हेच काँग्रेसच्या लोकांना जमले नाही.
रेल्वे भाडे वाढवले , औषधांच्या किंमती वाढवण्याचे निश्चित केले, अमेरिकेतुन काहीच ठोस न घेउन येणे, पाकिस्तानचे वाढती गोळाबारी, चीनची घुसखोरी. इत्यादी बाबींवरुन लोकांचे लक्ष कसे उडवायचे याचे प्रशिक्षण कुठे घेउन आले हे सांगावे लागत नाहीत
आता देश भोगणारच आहे त्यांच्या
आता देश भोगणारच आहे त्यांच्या कर्माची फळे,
ज्याला रस्त्यावर टाकल तर भिकारीही उचलत नाही , चोर चोरुन नेत नाही अश्या कोळश्यावर ही ह्या लोकांनी भयंकर घोटाळा करुन ठेवलाय. कोर्टाने चांगलीच बुच मारलीय.
आता ह्या सरकारला दरवर्षी फक्त पॉवर प्लांट चालवायला २ मिलीयन टन कोळसा आयात करावा लागणार आहे. आणि कोणताही देश स्वताचा कोळसा कमी किंमतीत देणार आहे थोडाच ?
वाजपेयींच्या काळात देखील चालु
वाजपेयींच्या काळात देखील चालु झालेल्या खाणींना "बुच्च" मारली आहे
काँग्रेसच्या लोकांना काय जमते
काँग्रेसच्या लोकांना काय जमते ?
कोंणत्याही गोष्टीचा घोटाळा करणे जमते की !!
फायली गायब करायला मंत्रालयाला आग लावता येते की !!
१ ० वर्षात देशाला न्युनतम पातळी वर आणुन ठेवता येत की !!!
काँग्रेस्चेच ६० वर्षाचे
काँग्रेस्चेच ६० वर्षाचे गुणगाण मोदींनी युनो मधे गायले आहे
२ जी घोटाळा ? कॉमन वेल्थ
२ जी घोटाळा ?
कॉमन वेल्थ घोटाळा ?
देशाची तिजोरीच साफ करायच
देशाची तिजोरीच साफ करायच मनावर घेतल मग रस्ते कोण साफ करणार ?
मोदी नागरिकांना सांगुन काही
मोदी
नागरिकांना सांगुन काही उपयोग नाही मग शेवटी त्यांनाच घ्यावा लागला झाडु हाती
अजुन तरी लोक सुधरली नाहीत
तुम्ही घ्याच उपचार करुन !!
तुम्ही घ्याच उपचार करुन !! यु आर सिक !!
तुमच्यावर यशस्वी पणे झाले
तुमच्यावर यशस्वी पणे झाले आहेत का उपचार दुसर्यांना अनुभवातुन सांगत आहात ?
स्वछतेसाठी जे मनापासुन
स्वछतेसाठी जे मनापासुन प्रयत्न करताहेत त्यांना शुभेच्छा !
स्वछतेसाठी जे मनापासुन
स्वछतेसाठी जे मनापासुन प्रयत्न करताहेत त्यांना शुभेच्छा ! >>+१
शांताराम०१ आणि विनित दवे
शांताराम०१ आणि विनित दवे यांचे सदयत्व स्थगीत केले आहे.
सर्वांना पुन्हा एकदा ताकीद (सूचना नाही): सर्व धाग्यांवर जाऊन त्याच त्याच विषयांवर वाद/वैयक्तिक टोमणे केलेले दिसले तर सदयत्व स्थगीत करण्यात येईल.
अतिशय स्तुत्य उपक्रम ...!
अतिशय स्तुत्य उपक्रम ...!
शा रा भौ ना श्रद्धांजली
शा रा भौ ना श्रद्धांजली
दसर्याच्या मुहुर्तावर
दसर्याच्या मुहुर्तावर रामाचाच वध केला
video कोणत्या site वर अपलोड
video कोणत्या site वर अपलोड करायचे आहे? official site ची लि॓क मिळेल का?
http://www.thehindu.com/today
http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-propertyplus/erasing...
http://www.theuglyindian.com/about_us.html