अभिनव विचार संग्रह - (१)

Submitted by निमिष_सोनार on 1 October, 2014 - 03:10

(१) एकवेळ एकरंगी "शत्रू/विरोधक/परके-माणसं" चालतील पण सतत रंग बदलणारे "मित्र/समर्थक/आपले-माणसं" धोकादायक!

(२) एखादी व्यक्ती जेव्हा आजारी असते तेव्हा कोणत्याही औषधापेक्षासुद्धा सहानुभूतीचे दोन शब्द आणि लवकर बरे होण्यासाठीच्या शुभेच्छा या जास्त परिणामकारक ठरतात.

(3) आई वडील सर्व ब्रम्ह!! आई श्रेष्ठ देवा पेक्षा!! वडील श्रेष्ठ गुरु पेक्षा!!
आई वडिलांना देवत्व आणि गुरुत्व देतांना त्यांचे माणूसपण विसरू नका.
त्याना माणूस म्हणून समजून घेणे सुद्धा जास्त महत्वाचे आहे, नाही का?

(४) पत्नी/सून ही गृहलक्ष्मी असते. मान्य! पण तीला देवत्व देताना तीला माणूस म्हणून समजुन घेणे आणि स्वीकारणे जास्त महत्वाचे आहे, नाही का?

(५) स्त्रीच्या अस्तित्वामुळेच पुरुषाच्या पुरुषत्वाला अर्थ प्राप्त होतो.
आणि पुरुषाच्या अस्तित्वामुळेच स्त्रीच्या स्त्रित्वाला अर्थ प्राप्त होतो.
दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण आणि निरर्थक.
दोन्ही एकमेकांचे नाही स्पर्धक.
दोन्ही एकमेकांना आहे पूरक.

(६) नेहेमीची वाट:
बऱ्याच तथाकथित आणि स्वयंघोषित बंडखोराना वाटते की जन्म, बालपण, शिक्षण, नोकरी/व्यवसाय, लग्न, मुले, त्याना मोठे करणे वगैरे गृहस्थाश्रम ही नेहेमीची आणि सोपी वाटचाल आहे. त्यात काय मोठे?
मग हे बंडखोर वेगळी वाट चोखाळतात: कुणी लग्न करायचे नाही म्हणतो तर कुणाला मुले नको असतात. कुणी हा "सरळ" रस्ता सोडून देतात आणि बंडखोरीचा आव आणत स्वत: ला हिम्मतवान म्हणवतात. त्याना वाटते की आपण ही नेहेमीची सोपी वाट तोडली, समाजाचे नियम तोडले आणि "हिम्मत" केली.... बाकी त्या वाटेवर चालणारे भित्रे आहेत!! पण तसे नसते!!
ही नेहेमीची वाटणारी वाटच बिकट वाट असते. त्यातच जास्त कसोटी असते. ही नेहेमीची वाट चालणे कधीच सोपे नसते. हे या बंडखोरांना माहित असते. म्हणून ते या वाटेला जात नाहीत कारण त्यांच्यात हिम्मत नसते. मग कुणी सन्यास घेतो आणि या वाटेपासून बचाव करतो तर कुणी काही दुसरे करतो आणि बचाव करतो.... या "सरळ" वाटणाऱ्या पण "कठीण" असणाऱ्या वाटेवर हिमतीने चालणाऱ्या सर्वांना माझा प्रणाम!!

(७) || निंदकांचे घर असावे शेजारी || स्तुतकांची फौज असावी बाजारी ||
|| निंदकांना बसवावे शेजारी || स्तुतकांना वळवावे माघारी ||

(८) समोरचा मनुष्य तलवार असेल तर तुम्ही तलवार किंवा ढाल बनू नका तर म्यान बना.
तलवार बनलात तर वार होईल.
ढाल बनलात तरी वार होईल.
म्यान बनलात तर तो मनुष्य तुमच्यात सामावून जाईल.

(९) जाता जाता -
आज ज्येष्ठ नागरिक दिन:
अनुभवांचा चालता बोलता खजिना असलेल्या सर्व ज्येष्ठ (आणि अर्थातच श्रेष्ठ) नागरिकांना शुभेच्छा!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users