“ वेगळा विचार करणारी माणसे”

Submitted by निमू on 26 September, 2014 - 04:40

“ वेगळा विचार करणारी माणसे”

नुकतीच दिव्य मराठी मध्ये एक बातमी वाचनास मिळाली.एका साई भक्ताने शिर्डी मध्ये सव्वा कोटीच्या खोल्या बांधून साई संस्थानाला दान केल्या ही ती बातमी. ९००० साई भक्त या खोल्यान मध्ये राहू शकतात . अधिक उत्सुकता म्हणून पूर्ण बातमी वाचली तेव्हा कळले हि व्यक्ती म्हणजे के व्ही रमणी. हा माणूस मुळात एक software व्यावसायिक. १५ वर्ष विविध software कंपन्या मधे काम केल्यावर रमणी साहेबांनी स्व त: च्या दोन कंपन्या उभ्या केल्या आणि ११ वर्षात ते भरभराटीच्या शिखरावर उभे राहीले.पण मनातील साई भक्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ११ वर्षांनी दोनी कंपन्या मधील स्वत: चे भाग भांडवल विकून रमणी साहेब २३५ कोटी चे मालक झाले. साईं च्या नावाने रमणी साहेबांनी एक trust उभा केला,स्वत: साठी केवळ १५ कोटी ठेऊन त्यांनी उर्वरीत सर्व संपत्ती या trust ला दान केली. मागील १० वर्षां पासून या trust च्या माध्यमातून त्यांनी समाजसेवा व साई सेवेचे कार्य उभे केले आहे. ही बातमी वाचून मी थक्कच झालो ,तुमच्या माझ्या सारख्या सामान्य माणसाला इतकी संपत्ती मिळाली असती तर आपण उर्वरित आयुष्य ऐश आरामात काढायचे स्वप्न पहिले असते आणि एखाद्या उदयोजकाला इतकी संपत्ती मिळाली असती तर त्याने ती वाढवण्याचे स्वप्न पहिले असते पण या माणसाने विचार केला तो वेगळाच आणि त्यातून एक महान कार्य उभे केले.त्यांच्या वेब साइट चा पत्ता खाली दिला आहे.
१) http://www.kvramani.com/

हरीश हांडे हि एक अशीच आफलातून व्यक्ती .IIT मधून पद्वी आणि अमेरिकेतून उच्च शिक्षण असा strong कॅरीअर ग्राफ असलेल्या या माणसाने स्वप्न पहिले ते भारतातल्या ग्रामीण भागाला प्रकाश देण्याचे तेसुद्धा समाज कार्यातून नव्हे तर एका कंपनी च्या माध्यमातून आणि जन्माला घातली सेल्को हि सोशिअल enterprize. व्यावसायिक आणि सामाजिक दृष्टीकोन एकाच छता खाली नांदू शकतो हा वेगळा विचार या माणसाने केला.आज भारताच्या ग्रामीण भागात पसरलेले सेलको चे एक लाख ग्राहक आहेत आणि हांडे ना मागेसेसे पुरस्काराने गौरवले गेले आहे.हांडे च्या वेगळ्या विचाराची करामत भारताच्या ग्रामीण भागाला प्रकाशीत करत आहे. काही लोक खरोखर वेगळा विचार करतात हेच खरे.काही महत्वाचे दुवे खाली दिले आहेत.
management_pic-jpg.gif
सेल्को च्या सोलर लाइट ने प्रकाशित झालेली हि एक झोपडी .

२) http://businesstoday.intoday.in/story/innovation-energy-selco-solar-lamp...
३) http://businesstoday.intoday.in/story/solar-crusader--harish-hande.html/...
४) http://forbesindia.com/article/work-in-progress/selcos-harish-hande-want...
५) http://en.wikipedia.org/wiki/Harish_Hande

माझ्या वडिलांचे एक परिचित बांधकाम कंपनी चालवतात. रस्ते पूल बांधणी अश्या प्रोजेक्ट मध्ये या माणसाने एक वेगळाच विचार केला. हि कंपनी बांधकाम मजुरां साठी आचारी बाळगते आणि कंपनी तर्फे या मजूरांना जेवण देते(व्वा!!! काय अभिनव विचार आहे ). यातून या मजूरांचा वेळ तर वाचतोच पण मालक हा अन्नदाता आहे हि भावना या लोकां मध्ये वाढीस लागते याचा परिणाम म्हणजे विक्रमी वेळेत पूर्ण केलेली बांधकामे.

वर उल्लेख केलेली माणसे एका वेगळ्या जमातीत मोडतात. या जमातीत मोडणारी माणसे प्रत्येक गोष्टीत काही तरी वेगळाच विचार करतात. तुमच्या माझ्या सारखे चाकोरीबद्ध विचार करणे या लोकाना जमत नाही या जमातीने आजवर आपल्या समाजाला भरपूर काही दिले आहे. तोत्तोचान च्या शिक्षकांनी शाळे विषयी जो काही वेगळा विचार केला त्यातून अनेक चिमुरड्यांचे बालपण सुंदर झाले.

डोळस पणे पाहू गेल तर तुमच्या माझ्या आसपास असे अनेक वेगळा विचार करणारे माणसं असतात,शोधण्याची दृष्टी आणि कौतुक करण्याचा दिलदार पणा फक्त पाहिजे. ह्या माणसांना फार मोठ यश मिळाल असेलच अस नाही.पण यश मिळाल नाही म्हणून या विचारांचे महत्व कमी होत नाही . रोजच्या जीवनासाठी संघर्ष करणारी माणसे सुद्धा कधीतरी फार वेगळा विचार करतात.हे विचार जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रातील असू शकतात. या धाग्यावर अशा लोकांविषयी आणि त्यांच्या विचारान विषयी लिहिणे अपेक्षित आहे.चला तर मा. बो. करानो तुमच्या आसपासच्या अशा वेगळ्या विचारां बद्दल सर्वांनाच कळू द्या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या माणसांना फार मोठ यश मिळाल असेलच अस नाही.पण यश मिळाल नाही म्हणून या विचारांचे महत्व कमी होत नाही .
>>>>>>
अगदी प्लस वन वन

छान धागा, छान ओळख

छान धागा .
तुमच्या माझ्या आसपास असे अनेक वेगळा विचार करणारे माणसं असतात,शोधण्याची दृष्टी आणि कौतुक करण्याचा दिलदार पणा फक्त पाहिजे
>>>>>>> +१००

सुरेख.
रोजच्या जीवनासाठी संघर्ष करणारी माणसे सुद्धा कधीतरी फार वेगळा विचार करतात >> अनुमोदन +१

जामखेड (जि. अहमदनगर) येथील डॉ. रजनीकांत आणि डॉ. मेबल आरोळे हे असंच एक समाजसेवक दांपत्य.
ग्रामीण भागातील उल्लेखनीय कार्यासाठी शासनाने त्यांना मानाचा मॅगसेसे पुरस्कार देऊन गौरविले.
अधिक माहितीसाठी http://www.jamkhed.org/ ही वेबसाईट.

दुर्दैवाने हे दांपत्य आता हयात नाही. पण त्यांच्या मुलांनी त्यांचा वारसा समर्थपणे पुढे चालवलाय.

छान् धागा. हांडेंबद्दल वाचलं होतं. त्यांचा वॉक द टॉक हा इंटरव्ह्यु पाहिला होता. ते केजरीवालांसोबतच आयआयटीत होते.

hats ऑफ .

समाजाप्रती आपले काहीतरी कर्तव्य आहे आणि त्याची परतफेड करण्याच्या इच्छेतूनच मग अशी इतरांच्या नजरेत भरणारी कार्ये करण्याची उर्मी लेखातील तिघे आणि अन्य अनेक ज्ञातअज्ञातांत उमटते.....असे मोठे कार्य घडून जाते. चार पैसे मिळाले आणि त्यातील एक पैसा जरी अशा कार्यासाठी देवू केला तर तो योग्य ठिकाणी आणि योग्य कारणासाठी जात असतो याची प्रचिती वरील लेखात उल्लेख केलेल्या कार्यावरून येते.

@ धनवन्ती:तुम्ही दिलेली लिंक सुंदरच आहे.
@इश्श :हो मी वाचला होत पूर्वी अंकात आरोळे दाम्पत्या बद्दल त्यांचे कार्य ग्रेट च आहे

प्रोत्साहन पर प्रतिसाद बद्दल सर्वांना धन्यवाद !!!!!!!!