गजरा

Submitted by kavita gore on 24 September, 2014 - 05:52

गजरा म्हणजे फुलाचं पुन्हा एकत्र येणे ,
आपल्या प्रिय व्यक्तीच्या सोबतीने राहायचा संदेश ते आपल्याला देतात.
एक प्रियकर - नवरा बायकोला भेटवस्तू म्हणून गजरा देतो.
अन हा गजरा जोडीदाराचा राग-रुसवा काढून पुन्हा नव्याने प्रेम करायला शिकवतो
गजरा सगळ्याच मराठी मुलींना गजरा आवडायचा
पण अत्ताच्या Fashionble जगात या गज-याकडे दुर्लक्ष्य होत जातंय
सगळ्यांना हवाहवासा वाटणारा तो मंद कोवळ्या फुलांचा सुवास हरवला जातोय.
गजरा सणांच्या वेळी काही मुलींना घालावासा वाटतो पण आपल्याला कुणी "गावठी" म्हणून चिडवेल
या भीतीने गजरा घालण्याची हौस मनातल्या-मनातच मारली जातेय. आत्ताची मराठी पोर आणि पोरीनो
जगाकडे बघून स्वत:ची हौस मोडू नका. आणि अशाच लहान-सहान गोष्टीतून आपली संस्कृती जपायला शिका
-कविता गोरे
Gajra.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ताची मराठी पोर आणि पोरीनो
जगाकडे बघून स्वत:ची हौस मोडू नका. आणि अशाच लहान-सहान गोष्टीतून आपली संस्कृती जपायला शिका<<< बरोबर आहे, आजकाल मनगटावर गजरे बांधून माडी चढण्याची संस्कृती पूर्णपणे विस्मरणात गेली आहे. ती संस्कृती जपायलाच हवी आहे ना? Light 1

गजरा म्हणजे फुलाचं पुन्हा एकत्र येणे ....... हे सहिये !

अजूनही आठवतोय माझा पहिला पगार. श्रावणबाळासारखे आईसाठी साडी घ्यायची होती आणि वडिलांसाठी शर्ट. साडी खरेदीतले मला काही समजत नाही म्हणून ऑफिसमधील मैत्रीणीला बरोबर घेतले. खरे तर जॉबच्या पहिल्याच महिन्यात आपल्याबरोबर खरेदीला येणारी मैत्रीण मिळाली याचेच जास्त कौतुक होते. साडी घेऊन दुकानातून बाहेर पडलो ते माझ्या मैत्रीणीची नजर गजरा विकणार्‍या एका महिलेवर पडली. तिनेच मला मग आईसाठी गजरा विकत घ्यायला लावला. अर्थात, तुझी आई गजरा घालते का वा तिला कधी गजरा घातलेले पाहिले आहे का हे मला विचारूनच. सोबतीला मिठाईचा डबा. हे देखील मी ऐनवेळी विसरून गेलेलो. घरी ते आईच्या हातात ठेवले, ते मला अजून आठवतेय, साडीपेक्षा जास्त कौतुक तिला गजर्‍याचे वाटले होते. साडीचा रंग कोणता हे बघायच्या आधी ती फुले ओंजळीत धरून तिने त्यांचा सुवास घेतला होता...

....... आणि ती मैत्रीण,
ती आज माझी गर्लफ्रेंड आहे !

गजरा म्हणजे फुलाचं पुन्हा एकत्र येणे ....... आणि मनांचेही Happy

गजरा म्हणजे फुलाचं पुन्हा एकत्र येणे ,
आपल्या प्रिय व्यक्तीच्या सोबतीने राहायचा संदेश ते आपल्याला देतात. >>>> व्वा क्या बात है

आवडले Happy

मला गजरा आवडतो, विशेषतः मोगर्‍याचा आणी अबोली+ जाई वगैरे. पूर्वी जयाप्रदासारखे केस होते आता, उन्दराची शेपटी होत आल्याने बॉबकट करणारे.

मधेच उन्हाळ्यात नवरा मोगर्याचा गजरा आणतो!
आम्ही तो तसाच वाटीत ठेउन देतो खिडकीशी!
मस्त वाटतं!

तमीळ कामवाली आहे, ती रोज जाई, कधी जुई. कधी कुंदा, मोगरा चा गजरा लावुन येते!!
दार उघडताच कसलं फ्रेश वाटतं म्हणुन सांगु!!
Happy

अताची मराठी पोर आणि पोरीनोजगाकडे बघून स्वत:ची हौस मोडू नका. आणि अशाच लहान-सहान गोष्टीतून आपली संस्कृती जपायला शिका++++ १००% अनुमोदन...

मला पण आवडत खुप गजरा घालायला आणि मी तो घालतेच कोन नाक वैगेरे मुरड्तय हे नाहि पाहत् अर्थात ऑफीस वैगेरे पाहुनच हो...
पण मला ही संस्कुती मागे चाललीये वैगेरे पटलं नाहि...आजही सगळ्या मुली विशेष वेळप्रसंगी तरि गजरा घालतातच्..तसेपण आपन साउथ ईंडियन नाहि रोज कंम्प्लसरी गजरा माळायला...जुलै मध्ये साउथम्ध्ये ८ दिवस राहण्याचा योग आला तेव्हा मी माझी गजरा माळायची हौस पुरेपुर भागवुन घेतली...तीकडे ओटी भरताना पन गजरा देतात..शिवाय तिकडे गजरे खुप स्वस्त असतात आनि एकदम दाट मोगर्याचे खुप मस्त ...