बाकी मात्र सगळे फर्स्ट क्लास आहे .....!!!

Submitted by मंदार खरे on 23 September, 2014 - 07:10

बाकी मात्र सगळे फर्स्ट क्लास आहे

मी सहसा कधी मत मांडत नसतो
मात्र माझ्या मतासाठी मी भांडत असतो
तेवढीच आमच्यात थोडी कुरबुर आहे
बाकी मात्र सगळे फर्स्ट क्लास आहे

मला आवडतो चहा आणि तिला कॉफी
माझा आवडता किशोर तर तीचा रफी
तीचे जग मंडई पलिकडे फार नसते
मला कुठेतरी लांबवर जायचे असते

मला आवडायचे तिचे केस लांब छान
तिला वाटते मोकळे कापून केस लहान
मला हवी असते सकाळची शांत झोप
तीचा दिवस उगवतो पहाटेच खूप

माझा स्वभाव आहे तसा थोडा खर्चिक
तीला हवा असतो हिशोब प्रत्येक बारीक
आम्ही म्ह्णजे ढांग्यावरसुद्धा रीक्षाने फिरु
तीचे म्हणजे सगळे शॉपिंग पायी पायी करु

माझ्या शांत झोपेसाठी ती जेव्हा लवकर उठते
मला खर्च करता यावा म्ह्णून ती काट्कसर करते
तेव्हा कळते शेवटी प्रेम म्हणजे काय असते
थोडे घ्यायचे आणि खुप द्‍यायचे असते

आता तिचे लहान केस मला मॉडर्न वाटतात
मंडाईतून भाजी आणायचे थ्रील कळतात
एक एक वाचवलेल्या पैशाचा बंगला दिसतो
कॉफि पिताना रफिच्या गाण्याचा कैफ चढतो

अजूनही मात्र मी माझे मत मांडतो
मनातल्या मनात स्वत:शीच भांडत असतो
तेवढीच आमच्यात थोडी कुरबुर आहे
बाकी मात्र सगळे फर्स्ट क्लास आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

nice

वा...

आता तिचे लहान केस मला मॉडर्न वाटतात
मंडाईतून भाजी आणायचे थ्रील कळतात
एक एक वाचवलेल्या पैशाचा बंगला दिसतो
कॉफि पिताना रफिच्या गाण्याचा कैफ चढतो

मस्त्त.....