स्वप्न काय सांगतात- भविष्य, भूतकाळ की गतजन्म?

Submitted by हर्ट on 21 September, 2014 - 11:42

स्वप्न ह्या विषयाबद्दल मला खूप उत्सुक्ता आहे. जर मला एखाद्या विषयावर रिचर्स करायची संधी मिळाली तर मी स्वप्न हाच विषय निवडीन.

माझ्या लहानपणी मला खूप स्वप्न पडायची. आत्ता मला माझ्या भावना खूप चांगल्या कळतात. मला असे वाटते की माझी ती सगळी स्वप्ने कदाचित माझ्या पुर्व जन्मातील गोष्टी मला दाखवत असतील.

माणसाला जेंव्हा स्वप्न पडते तेंव्हा ते स्वप्ना एखादा प्रसंग दाखवते. जसे की कुणीतरी ओळखीच्याला काहीतरी होत आहे. अशा वेळेस खूपदा एकतर त्या व्यक्तिला खरेच काहीतरी झाले असते वा होणार असते. अर्थात काय तर, स्वप्न माणसाचे भविष्य किंवा भुतकाळ दाखवतात.

एखादे स्वप्न असे असते की एखादी न पाहिलेली जागा आपल्याला दिसते. तिथे काहीतरी होत आहे हे दिसत असते. पण आपल्या त्या जागेशी काही एक संबंध नसतो म्हणून ती स्वप्ने आपल्याला कळत नाही.

बहुतेक लोकांचा असा अनुभव आहे की पहाटेची स्वप्ने खरी होतात. दचकून जागी करणारी स्वप्ने खरी असतात.

मला असे वाटते की आपण आपल्या स्वप्नांवर थोडा तरी विचार करावा. नक्कीच स्वप्नांचे पडणे काहीतरी सुचित करत असते.

स्वप्न ह्या विषयावर तुमचे अनुभव वा विचार वाचायला आवडतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला स्वप्नात स्वप्ने पडतात. बरेचदा स्वप्नातल्या स्वप्नातही मी स्वप्नेच बघत असतो. हे नॉर्मल आहे की अ‍ॅबनॉर्मल पता नही, पण त्याचा विशेष असा शारीरीक किंवा मानसिक त्रास नाही, फक्त स्वप्नातून बाहेरही असेच स्टेप बाय स्टेप यावे लागते आणि त्या नादात अलार्म वारंवार चुकतो, भारंभार लेटमार्क होतात, आणि तीनाच्या वर गेल्यास सुट्ट्या कटतात Sad

अवांतर - मायबोलीवर स्वप्नांचा धागा असावा. मागे मी चौकशी केली असता मला तसे सांगण्यात आले होते, पण तेव्हा मी नवीन असल्याने मला शोध कसा घ्यायचा हे गणित माहीत नव्हते.

ऋन्मेऽऽष , ऑफिसला लेट का झाले ह्याच्या कारणांच्या लिस्ट मधे हे पण अ‍ॅड करता येइल. Happy
स्वप्न नेहमी घडणार्‍या वा भविष्यकाळात घडणार असणार्‍या गोष्टीचेच पडते असे नाही. इतरही काही गोस्वप्न
उदा. कधी कधी एखाद्या गोष्टीचे टेन्शन असेल तर ती स्वप्नात दिसते. शाळेत असतांना रिझल्टच्या काळात हमखास कमी मार्कस पडल्याचे स्वप्न पाडायचे. जे लकीली कधी झाले नाही आणि आता शाळा संपल्यामुळे होणार नाही.

स्वप्नात मला हार्डडिस्कमधला डाटा दिसतो. त्याच्यावर आयडल मोड मधे होत असलेल्या प्रोसेसेस, झिरो वन ची बायस मधली मेमरी हे दिसत राहतं. फक्त हार्ड डिस्क स्लीप मोड मधे गेलेली असल्याने स्क्रीन ब्लँक असते. काही कारणाने हार्ड डिस्क फॉर्मॅट केली तर मग कुठल्याच प्रोसेसेस होत नाहीत.

ही हार्ड डिस्क म्हणजे मेंदू समजा.

हा तो धागा बहुतेक.
http://www.maayboli.com/node/27589

बाकी एका मराठी वाहिनीवर "स्वप्नांच्या पलीकडे" नावाची डेली सोप कार्यक्रम आहे. Wink

अदिती,
आमच्याकडे कारणे एंटरटेन केली जात नाहीत. सारेच प्रकरण कॉप्म्युटराईजड असल्याने कटायचे ते कटतेच. अगदीच काही आपल्यावाचून काम अडत नसेल तर उशीरा का आलास हे कोणी विचारायला येत नाही, ना आपण कोणाला सांगायला जायचे असते .. सो, आपले स्वप्ने आपल्याच मनात ठेवायची Happy