उशीर

Submitted by गण्या. on 21 September, 2014 - 00:25

हल्ली बहुतेक कार्यालयातून लेट लतिफीचे प्रमाण वाढले आहे. काही लोक आजही वेळेत येउ शकत असल्याने उशिरा येणा-यांना कारणे देता येत नाहीत. कार्यालयाच्या वेळेप्रमाणेच समारंभ, उत्सव, सार्वजनिक उपक्रम अशा सर्व ठिकाणी ठरलेल्या वेळी उपस्थितीचे प्रमाण खूप कमी असते. या उशिराबद्दल, त्याचा कारणांबद्दल आणि उपायांबद्दलचे हितगूज येथे करूयात.
.
उशीर होणा-यांनी उशिराची कारणे काय असतात याची कल्पना द्यावी. वक्तशीर असलेल्यांनी आपले अनुभव शेअर करावेत. तसंच नेहमी उशीरा येणा-यांबद्दल आणि त्यांनी सांगितलेल्या कारणांबद्दल काय वाटते हे ही नमूद करावे .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हमखास उशीर करनारे सिनेमा, नाटकं अशा कार्यक्रमांना मात्र वेळेत पोहोचतात. असं का ?
( इथेही उशिरा पोहोचणारे महाभाग असतातच म्हणा.. )

हो दोन गट असावेत बहुधा. एक म्हणजे ऑफिस व इतर नावडीच्या ठिकाणी पाय ओढत ओढत उशीरा कसेबसे जाणारे पण आवडीच्या ठिकाणी बरोब्बर वेळेत जाणारे, तर दुसरा गट सगळीकडेच उशीरा जाणारे - वेळेचे नियोजन अजिबात न जमणारे व त्यामुळे आवडीच्या गोष्टीला सुद्धा वेळेवर कसे पोहोचायचे हे न कळणारे Happy

मात्र अगदी वेळेवर येणार्‍या लोकांचे मला नेहमी आश्चर्य वाटते. वेळेआधी येणारे समजू शकतो, पण परफेक्ट वेळेवर येणे हे महा-अवघड. हे लोक बहुधा वेळेआधी पोहोचून पाच दहा मिनीटे जवळपास इतरत्र काढून मग येत असावेत. मुंबईत लोकल इंडिकेटर वर 'लावायच्या' आधी पुलावर थांबून मग ऐन वेळेस त्या प्लॅटफॉर्म वर धावत उतरतात तसे Happy

दोन प्रश्न पडले -

१) लग्नाचा जो मुहुर्त असतो तो नक्की एकमेकांना हार घालायचा असतो की मंगलाष्टके सुरु करायचा असतो?
आणि तो मुहुर्त अचूक साधला जाण्यासाठी योग्य आणि अचूक वेळ दाखवणारे घड्याळ लग्न लावणार्‍या गुर्जींकडून फॉलो केले जाते का? तसेही लग्नाचा मुहुर्त टळतोय की मिळतोय याचे सर्वात जास्त टेंशन त्यांनाच असते.

२) असे म्हणतात की जन्माच्या वेळी डिलीव्हरीची तारीख जी दिली आहे ती टळून गेल्यावर या जगात प्रवेश करणारे प्रत्यक्ष आयुष्यात मात्र वेळेच्या आधी पोहोचणारे असतात,
याउलट जे जगात ९ महिने ९ दिवस भरायच्या आधी येतात ते मात्र प्रत्यक्ष आयुष्यात लेट लतीफ म्हणून ओळखले जातात.
तर तिसरा आणि दुर्मिळ गट जो डॉक्टरने सोनोग्राफीनुसार दिलेली तारीख पाळून या जगात प्रवेशतात ते मात्र आपला हा लौवकिक टिकवण्यासाठी कायम धडपडत असतात. आणि ते नेहमी ना आधी ना उशीरा अशी पर्रफे़क्ट वेळ पाळतात.
हे खरे आहे का? का मिथ आहे?

पण परफेक्ट वेळेवर येणे हे महा-अवघड. >> +१.

उशिरा येणा-यांची कारणं ठरलेली असतात. ट्रेन मिळाली नाही, गर्दी होती, बस आलीच नाही, बस उशिरा आली, बस फुल्ल होती इ. बरं लेटलतिफ लोकांना उशिराबद्दल काढूनही टाकता येत नाही कारण त्याच्या जागी येणारा वेळेत येईल याची खात्री नाही. यावर उपाय म्हणून ऑफीसच्या वेळेच्या नंतर काही मिनिटं टॉलरन्स म्हणून ठेवली जातात. पण नंतर तीच वेळ गाठायचीय असं समजून त्यानंतर उगवणारे लोक असतात.