सहकारी सोसायटी मधील भाडेकरूंसाठी पार्कींगचे नियम

Submitted by मेधावि on 20 September, 2014 - 10:32

आम्ही ज्या सहकारी सो. मधे रहातो तिथे पार्कींगसाठीची जागा अपुरी आहे. काही घरमालकांचे स्वतःच्या मालकीचे पार्कींग आहे. पण पार्कींगमधे स्वतःची गाडी व स्वतःच्या गाडीच्या बाहेर काढायच्या वाटेतच सोसायटीच्या रस्त्यावर स्वतःची दुसरी गाडी त्यांनी लावल्यामुळे बरीच सार्वजनिक जागा आधिच बुक झालेली आहे. रहाता रहिलेली थोडीफार जागा ही गाड्या व माणसांना ये-जा करावयास लागते. ज्या मालकांचे स्वतःचे फ्लॅट आहेत पण पार्कींग मालकीचे नाही त्यांनी पण मोकळ्या जागांवर रुमाल टाकले आहेत. व वहिवाटीचा हक्क असल्यप्रमाणे, बाकी कोणास तिथे गाड्या लावू देत नाहीत. आता अश्या परिस्थितीत सोसायटीतील भाडेकरु, ज्यांच्या फ्लॅटला पार्कींग नाहीये, ते पण पार्कींगसाठी सार्वजनिक भागातील रुमाल टाकलेल्या पार्कींगच्या जागांमधे ह्क्क मागत आहेत व त्यावरुन वादावादी होते.

तर, सोसायटीतील अश्या मोकळ्या जागांमधे मालक व भाडेकरु ह्यांच्यासाठी असलेल्या कायद्यांबद्दल कोणांस खात्रिशीर माहीती आहे का? ( गाड्या = चार चाकी )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोकळ्या कागेवर वहीवाटे प्रमाणे हक्क सांगता येत नाही. कायद्याप्रमाणे बिल्डरला पार्किंग विकता येत नसे. नव्या कायद्यात सुधारणा झाली असेल तर कल्पना नाही. बिल्डरला अ‍ॅमेनिटीजची कुठलीही जागा विकता येत नाही असं महाराष्ट्र सदनिका अधिनियम १९७३ चा कायदा सांगतो. आणखी एक कायदा आहे त्याबद्दल गुगळून घ्यावे.

कायदा बाजूला ठेवा, भाडेकरू हा ज्याच्या फ्लॅटमधे राहतो तो स्वतःच तिथे राहत असता तर त्याला पार्किंगसाठी जागा द्यावीच लागली असती ना ?

पार्किंग अपुरे पडत असेल तर इमारतीचे नियोजन चुकीचे आहे हे मात्र नक्की. आता यावर समन्वयानेच तोडगा काढायला पाहीजे.त्यासाठी सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत विषय अजेण्ड्यावर घेऊन बहुमताने जो काही निर्णय होईल तो सर्वांवर बंधनकारक असेल. कायद्यात सुधारणा झालेली नसल्यास विकत घेतलेल्या पार्किंगसंबंधी निर्णय करता येऊ शकेल.

कायद्याप्रमाणे बिल्डरला पार्किंग विकता येत नसे. नव्या कायद्यात सुधारणा झाली असेल तर कल्पना नाही. बिल्डरला अ‍ॅमेनिटीजची कुठलीही जागा विकता येत नाही असं महाराष्ट्र सदनिका अधिनियम १९७३ चा कायदा सांगतो>>>>> आतापर्यंत हेच वाचनात आले आहे.पण पुणे-चिंचवड परिसरात, बिल्डर सर्रास पार्किंग लॉट विकतात.मुंबईतही काही ठिकाणी पार्किंग लॉट विकण्यात आले आहेत.

माझ्या मते open parking विकता येत नाही. Covered parking मात्र विकु शकतात. पण काही builder दोन्ही प्रकारचे parking विकतात

महाराष्ट्र हाऊसिंग अ‍ॅक्ट हा २०१२ चा कायदा सध्या अस्तित्वात आहे.
http://www.indialaw.in/maharashtra-housing-regulation-development-act-20...

महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स (रेग्युलेशन अ‍ॅन्ड प्रमोशन) अ‍ॅक्ट हा १९६३ चा कायदा यापूर्वी होता.
http://www.indialaw.in/maharashtra-housing-regulation-development-act-20...

माझ्या मते २०१२ च्या आधीच्या व्यवहारांना १९६३ चा कायदा लागू होतो. दोन्ही कायद्याच्या लिंका संदर्भासाठी हातासरशी दिल्या आहेत. (आत्ता वाचलेल्या नाहीत, आधी लागेल असं वाचलं होतं).

काही सोसायट्यांमधे ओपन स्पेस मधील पार्कींगसाठी मालकांना प्राधान्य देऊन मग जर जागा उरली तर ती भाडेकरूंना देतात. ते कायद्यानुसार बरोबर आहे का चूक ते माहीत नाही.

माझ्याकडे गाडी नाही दोन फ्लॅटसाठीचे पार्किन्ग आहे तिथे मालकाचा भाउ ज्याचे कार रिपेरिन्ग चे दुकान आहे तो कधी मधी गाड्या लावतो मग आमच्याक्डे त्या गाड्या आहेत असे समजून कारपुशे विचारायला येतात. Happy पण आमच्या सोसायटीत खूप स्ट्रिक्ट मॅनेजमेंट आहे. पार्किंग ही पण ओनरचीच जागा आहे असेच मानतात व कागदो पत्री आहे. ती पब्लिक स्पेस समजली जात नाही.

सुप्रीम कोर्टाने २-३ वर्षांपूर्वी दिलेल्या निर्णयानुसार, पार्किंग मूलभूत सुविधा असल्याने ती विकता येणार नाही, ती मोफत द्यावी लागेल असा निर्णय आहे. तरीही लबाड बिल्डर आता पार्किंग अ‍ॅग्रीमेन्टमध्ये दाखवीत नाहीत तर मोफत देतात पण ब्लॅकमध्ये पैसे घेतात. पुण्यात पार्किन्गचे ३-४ लाख वगळे बिन पावतीचे घेऊ लागले आहेत.त्यावर पार्किंग फुकट !! नाहीतर पार्किंगची रक्कम फ्लॅटच्या चटई क्ष्त्रावर लोड करतात ... ४००० रु च्या ऐवजी ४५०० पर स्क्वे. फू. हाकानाका... जिथे इछा आणि हुरळलेल्या मेंढ्या आहेत तिथे मार्ग आहे.

पार्किंग कमी पडत असेल तर नियोजन चुकले आहे हे खरे नाही हल्ली प्रत्येकाच्या किमान दोन गाड्या असताच. दुचाकी अथवा चारचाकी. पार्किंग ठरवताना एकच पार्किंग गृहीत धरले जाते ना... अगदी लोअर मिडल क्लासकडे ही दोन दुचा क्या असतातच ..

माहितीसाठी ...

http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Cant-charge-flat-buyer-ex...