एण्ड ऑफ इझम्स

Submitted by गण्या. on 15 September, 2014 - 10:06

फ्रांसिस फुकुयामा (Francis Fukuyama) यांनी १९८९ ला लिहीलेल्या निबंधाचा (The National Interest
, Summer 1989 ) विस्तार पुस्तकरूपाने प्रकाशित झाला होता. त्यांनी त्या वेळी एण्ड ऑफ हिस्टरी अशी एक त्यावेळी आचरट वाटावी अशी कल्पना मांडली. गोर्बाचेव्ह यांच्या ग्लासनोस्त आणि पेरेस्नोईका या दोन शब्दांनी कम्युनिस्ट रशियात नवं वारं वाहू लागलं. त्याचा परिणाम म्हणून कम्युनिझम चा पाडाव झाला.

ही घटना अतिशय महत्वाची असल्याचं फुकुयामा सारख्यांना वाटलं. अ‍ॅलेक्झांडर स्त्रोमेस ( Alexander Shtromas) या राजकीय पंडीत कम प्राध्यापकाने या विषयावर एक ग्रंथ (The End of Isms?: Reflections on the Fate of Ideological Politics After Communism's Collapse (Political Studies Special Issues)) लिहून संपादीत केला. त्याने एक पाऊल पुढे टाकत एण्ड ऑफ इझम्स अशी कल्पना मांडली. सामान्य माणसाला सुतावरून स्वर्गाला जाण्यासारखं वाटणं आहे हे. पण हल्ली एण्ड ऑफ इझम्स हा परवलीचा शब्द असल्याप्रमाणे सर्वत्र ऐकू येऊ लागला आहे. १९९१ साली जागतिक पातलीवर झालेल्या घडामोडींची चाहूल तेव्हां अनेकांना लागली नव्हती. आर्थिक परिणाम काय होतील याचे ठराविक लोकांचे अंदाज बरोबर आले. पण सामाजिक आणि सांस्कृतिक बदल काय होतील यावर फारसं मंथन झालेलं दिसत नव्हतं. त्यामुळे माझ्यासारख्यांना गंधवार्ताही नसलेल्या या संज्ञा जेव्हां वरच्या वर्तुळातून झिरपत तळाशी माझ्यापर्यंत आल्यात तेव्हां ही काय भानगड आहे याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. अर्थातच नेहमीप्रमाणे वेळ निघून गेलेली असेल (इंस्ग्लीश वाचता येत नसल्याने) किंवा उशीर झालेला असेल. जे काय असेल ते असो, पण इथं शंका मांडली तर ही काय भानगड आहे याबद्दल थोडाफार डोक्यात प्रकाश पडेल म्हणून हा प्र्स्ताव ठेवला असे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक राहीलंच विचारायचं.

हे जे काही चाललय " एण्ड ऑफ इझम" वगैरे, ते खरं असेल तर इझम रहीत जगाचं भवितव्य ([फ्युचरालॉजी) काय असेल ? इझम शिवाय जग कसं असू शकेल ? की ग्लोबयाझेशन चा परिणाम म्हणून जागतिक व्यापारात प्रभावी ठरणारा इझम हाच एक इझम शिल्लक उरेल का ?. शायरन चं भविष्य खरं होईल का ( टाटा समूहाचे सर्वेसर्वा सायरस हे नाव चुकून शायरन म्हनून लिहीले गेले असावे का ? अवांतर या पोस्टपासूनच सुरू झालं नेहमीप्रमाणे .)

गण्या,
आपला पश्नच इतका ज्ञानपरिप्लुत आहे की त्याचे उत्तर त्या प्रश्नातच लुप्त आहे.
सापडते का पहा पाहू!

ग्लासनोस्त आणि प्रेस्नोईका हे शब्द माहीत असायला हवेत असं वाटणारा काळ असताना त्या संबंधीचं लिखाण आवर्जून वाचलं जायचं. त्यातून कुठेतरी एण्ड ऑफ हिस्टरी आणि एण्ड ऑफ इझम बद्दल वाचलं गेलं होतं. यापेक्षा जास्त माहीती नसल्याने सध्या ही संज्ञा कुठल्या संदर्भात वापरण्यात येते याचं पूर्ण आकलन नसल्याने ज्यांना माहीत आहे त्यांनी लिहा असं नम्र आवाहन केलं होतं.

अंदाजाने लिहीण्यात मजा नाही. कॅपिटलझिमच्या मा-याखाली, ग्लोबल व्हिलेज चं एक्स्पान्शन होत जाईल तसं इतर सर्व इझम मागे पडतील असं काहीसं असावं असा माझा समज झाला आहे. तो किती बरोबर आहे हे माहीत नाही. गुगळून पाहण्यापेक्षा संबंधितांशी चर्चा हा केव्हांही उत्तर पर्याय आहे असं अजूनही वाटतंय.

जर माझा समज बरोबर असेल तर आजच्या माहीतीच्या युगात इझम नष्ट होणे हे शक्य आहे का याबद्दल शंका वाटते. की इझमच्या आहारी जाणे मागे पडेल अशी कल्पना यामागे आहे ?

सुंदर लेख . माझा प्रतिसाद या धाग्यावर relevant आहे कि नाही याची खात्री नाही तरी पण टंकत आहे ( लेखकाची माफी मागून ). मुळात या खंडप्राय देशाला सरसकट असा एक 'ism ' लागू पडू शकतो का ? मग तो समाजवाद असो , हिंदुत्व वाद असो , साम्यवाद असो का भांडवल वाद असो . मुळात कुठला तरी एक 'ism ' अंगीकारून धोरण आखण या खंडप्राय आणि वैविध्य असणार्या देशाला परवडणार आहे का ? या कारणामुळेच 'घोंगडी ' (सर्व प्रकारच्या 'ism ' चे समर्थक ज्या पक्षात आहेत असा पक्ष ) असणारा कॉंग्रेस पक्ष इतकी वर्ष या देशात टिकला का ? वाजपेयी सरकार ने पण कुठलाही एक 'ism ' न अंगीकारता हाच कॉंग्रेस pattern अंगिकारला होता .

बाम धन्यवाद. तुमची प्रतिक्रिया रिलेव्हण्ट आहे. तुम्ही ग्लोबल व्हिलेज ऐवजी देशापुरता विचार करून आणखी एक अँगल मांडलात. भारताचे प्रश्न उर्वरीत जगापेक्षा नेहमीच निराळे राहीलेत.

मायबोलीवर चांगले धागे काढले की हमखास अनुल्लेख करणारे लोक, जरा कुठे टीपी सुरू झाला की यामुळेच चांगले धागे मागे जातात असे गळे काढू लागतात. रजत शर्मा रूलने या सर्वांना माबोरत्न मिळायला हवं ..

मायबोलीवर चांगले धागे काढले की हमखास अनुल्लेख करणारे लोक, जरा कुठे टीपी सुरू झाला की यामुळेच चांगले धागे मागे जातात असे गळे काढू लागतात >>> +१.
रुदाली ग्रुपकडून अशा धाग्यांकडे अंमळ दुर्लक्ष होते हे निरीक्षण योग्य आहे.