इतर देशातील नोकरीविषयी संधी

Submitted by श्रीनिका on 11 September, 2014 - 09:31

नमस्कार,

मला इतर देशात IT नोकरी संदर्भात माहिती हवी होती.
भारतातून कसं Apply करता येऊ शकेल?

माझ्या नवर्‍याला interest आहे आणि त्याचा Canada or Australia PR घ्यायचा विचार चालू आहे पण मला PR घेऊन मग Job search करणं risky वाटतयं.. मला प्लीज कुणी नीट माहिती द्या.

Profile : team lead, 6+ expr.
Skill set : Informatica, Oracle

धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहे त्या कंपनी च्या मार्फत onsite assignment का नाही घेत? त्यात risk कमी आहे.
long term project बघा २-२.५ वर्ष. परदेशात आल्या वर नोकरीच्या स्थानिक संधी पण बघता येतिल.

तुमच्या नवर्‍याला भारत सोडून बाहेरच्या विकसीत देशात आयटीत नोकरीत 'इंटरेस्ट' आहे हे कळलं. पण तुम्हाला बायको म्हणून काय वाटतं? तुम्ही भारत सोडून त्याच्याबरोबर कुठेही (कॅनडा/ऑस्ट्रेलिया वगैरे) जाउन रहायला तयार आहात का? की तुम्हाला त्याने इथच त्याने काहितरी भरीव करावं आणि जमल्यास थोडसं समाजकार्य करावं असं वाटतं? तुम्ही नोकरी करत आहात काय? नसाल तर प्रयत्न करत आहात का? त्याला 'डिस्परेटली' बाहेर जायची इच्छा असेल तर तुम्ही नोकरी करून थोडसं आर्थिक पाठबळ देउ शकणार आहात काय? अगदी नोकरी जरी मिळाली नाही तरी आजकाल लोकं नावापुरतं तिथं जाउन पोस्ट ग्रॅज्युएट करातात आणि नोकरी मिळवतात. अगदी एका वर्षाचा कोर्स युकेमध्ये वगैरे आहे. तुम्ही इथं नोकरी करून तेव्ह्डं (१० हजार पाउंड कमितकमी) आर्थिक पाठबळ त्याला देउ शकणार आहात काय? तुमच्या करिअरचे प्लॅन पुढे काय आहेत? तुम्हाला कोणते देश रहायला आवडतील?

नोकरीच्या साइट्स वर बायो अपलोड करायला हवा. मॉन्स्टर, नौकरी इत्यादि. तिथे ओपनिन्ग्स कळतील.
सहा महिन्यासाठी घर चालवू शकेल इतका बँक बॅलन्स बिल्ड करा म्हणजे सद्याची नोकरी सोडल्यावर त्रास कमी होईल.

धन्यवाद मंडळी,
@सीमंतिनी : हो ,सध्याची नोकरी सोडावी लागणार म्हणूनच रिस्की वाटतंय.म्हणूनच इथूनच मिळाल काही तर बर असं वाटतंय.
@श्रीयू : onsite assignment नाहीय मिळत कारण जो प्रोजेक्ट चालू आहे त्यात काहीही संधी नाहीय. आणि नवीन प्रोजेक्टसाठी Release पण नाही करत आहेत. Job Switch करायचा तर पुन्हा वेळ लागेल अस त्याला वाटत आहे.
@अमा : नोकरीच्या साइट्स वर बायो अपलोड केलेलाच आहे. पण मला हे माहिती हवं होत कि, मॉन्स्टर, नौकरी सोडून अजूनही काही special sites आहेत का?
@तुर्रमखान : PR चा जरी विचार असेल तरी काहीच वर्ष राहायचा विचार आहे. कायमचा नाही.नोकरी मीही करते पण मी नुकतीच Pass Out आहे.त्यामुळे माझा अनुभव Campus through Job इतकाच आहे.आर्थिक पाठबळ मी नाही दिलं तरी सासू सासरे देऊ शकतात. पण नाहीय पटत मनाला त्यांच्याकडून काही घेण.पण त्यालाही नावापुरता course वगैरे करण्यात interest नाहीय.

आखातात नोकरी शोधण्यासाठी http://www.golfjobs.com/ www.bayt.com/en ही चांगली संकेतस्थळे आहेत. http://www.timesjobs.com/ http://www.monsterindia.com/ www.naukri.com यांची ही आखाता करता वेगळी संकेतस्थळे आहेत. एक चांगला सी व्ही बनवणे हे पहिल काम, मग या संकेतस्थळांवर माहीती भरणे , साधारण तीन एक महिन्यात रिझल्ट दिसायला लागतो इण्टरव्ह्यू कॉल्स येवू लागतात तोवर स्वतः या संकेत स्थळांवर तुम्हाला ज्या प्रदेशात ज्या गावी ज्या कंपनीत नोकरी हवी ते शोधायच. कंपन्यांची स्वतः ची ही संकेतस्थळे असतात त्यावर ही आपला सी वी अपलोड करावा. शुभेच्छा !!

Australia PR घ्यायचा विचार चालू आहे पण मला PR घेऊन मग Job search करणं risky वाटतयं.. >>>> इथे तरी पी आर ला ऑप्शन नाही. फक्त तुम्ही प्रोजेक्ट वर आलात तरच जॉब घेऊन येऊ शकता किंवा तुमचे प्रोफेशन एखाद्या स्किल चे असल्यास. www.immi.gov.au या वेब साईट वर अधिक माहिती मिळेल. शुभेच्छा!

पिआर असेल तरच फायद्याचे आहे ऑस्ट्रेलियात येणे. रिस्कतर आहे पण तेही आजकाल नॉर्मलच आहे. www.seek.com.au वर जॉब्स बघता येतील पण व्हिसा असल्याशिवाय शक्यतो नुसतेच जॉबला अप्लाय करु नका.

एम्प्लोयर स्पोन्सरशिप घेउन येउ शकता पण एम्प्लोयर मिळणे फारच अवघड आहे. शेवटी कोणताही विसा घेउन येणारे पिआर साठीच झटतात.

ऑस्ट्रेलियन PR नुकतेच १-१.५ वर्षांपुर्वी घेतलेले ३-४ लोक माहित आहेत. त्यांना तिथे ओपनिंग्स असुनही जॉब मिळवणे अवघड जात आहे. एक जण तर चार-सहा महिन्यांने तिथे राहून नोकरी न मिळाल्याने परत आला.
त्यांनी सांगितलेल्या कारणांनुसार -
१. niche skill (मराठी?) नसेल तर एम्ल्पॉयरर्स यांना भाव देत नाहीत. म्हणजे जावा, टेस्टींग, डॉट नेट, डेटाबेस इ.चे खूप लोक तिथे आहेत. या skill ना डिमांड नाही.
२. नोकरी देताना ऑस्ट्रेलियात नोकरीचा किती अनुभव आहे हे बघतात.

त्यांच्या सल्ल्यानुसार PR जरी मिळवला तरी एखाद्या कंपनीमधून ऑस्ट्रेलियाला ऑन-साईट जाउन, १-१.५ वर्ष तिथे त्याच कंपनीत राहिले तर ऑस्ट्रेलियातच दुसरीकडे नोकरी मिळू शकते.

अर्थात हा माझ्या ओळखीच्यांचा सल्ला आहे. इतरंचा अनुभव वेगळा असू शकतो. इथे कोणाला (किंवा ओळखीच्यांना) ऑस्ट्रेलियन PR घेतल्यानंतर लगेच तिथे नोकरी मिळाली आहे का?

पहिला जॉब मिळणे अवघड जाते पण एकदा एन्ट्री मिळाली कि ठिक होते.
आयटी बद्द्ल म्हणत असाल तर एक जण आहेत आयटीतले, सिडनीत आल्यावर एक दोन महिन्यात जॉब मिळाला.

माझ्या माहितीतले आयटीतले तिघे जण ह्या वर्षीच PR घेऊन Australia ला गेले. दोन/तीन महिन्यात तिघानाही जॉब मिळाला (वेगवेगळ्या कम्पन्यामधे). पण फार struggle करावे लागले. आता व्यवस्थित सुरू आहे.

नोकरीच्या साइट्स वर बायो अपलोड केलेलाच आहे. पण मला हे माहिती हवं होत कि, मॉन्स्टर, नौकरी सोडून अजूनही काही special sites आहेत का? >>> एकदा www.naukri.com च्या पेड सर्विसेसचा पण विचार करा, त्याचा फायदा होतो. ५/७ हजार फी असते पण ते तुमचा रेझ्युमे बिल्ड करतात अन तो स्पेसिफिक ठिकाणी फ्लॅशही करतात. फक्त naukri.com या एकाच साईट च्या सरविसेस घ्या मात्र. बाकी शाईन वगैरे फार चांगल्या नाहीत. बेस्ट ऑफ लक!

मदतीसाठी धन्यवाद मंडळी ,
सध्या PR विषय बाजूला ठेवतो आहोत

@योकु : Naukri च्या पेड सर्विसेसचा पण विचार चालू आहे.

अजूनही कुणाला काही अधिक माहिती असेल तर please सांगा.आम्हाला निर्णय घेताना मदत होईलच.

find a company (new job) that can give u an onsite opportunity......u can specify as there is nothing wrong is having a career aspiration of working overseas....

नमस्कार,

मला Singapore . ची ऑफर .लिंकीडिन वरुन आली, तसच तुम्ही .jobs.db.com (for Singapore) वर पण जॉब्स सर्च करू शकतात. PR ऑप्षन ऑस्ट्रेलिया किंवा Newzeland साठी छान आहे पण तिथे तिथला अनुभव जास्ती लागतो.

श्रीनिका,

परदेशातल्या जॉब साठी खुप उत्सुक असलात तरी सरसकट कोणत्याही जॉब पोर्टलवर आपला सी.व्ही रजीस्टर करु नका. अनेक बोगस कंपन्या अस्तित्वात आहेत. त्यांच्या वेबसाईटही बोगस आहेत. या कंपन्यांचे कर्मचारी लिक्डइन सारख्या साईटवर दिसत नाहीत. मिळाले तरी रिस्पॉन्स देत नाहीत. खात्री करणे अवघड जाते.

भारतात परदेशी कंपन्यांचे रिकृटींग करणारे बरेच फ्री लान्सर्स सुध्दा आहेत. यातले खरे कोणते आणि कोण पैसे उकळते याबाबत सावधगिरी बाळगा.

कोणत्याही एजंट/ फ्रीलान्सरला आपली ओरीजीनल डॉक्युमेंटस/ पैसे देऊ नका. मुळ कंपनीबरोबर इंटरव्ह्यु होताना एजंट/ फ्री लान्सर आणि तो मागत असल्यास त्याची फी याबाबत चौकशी करा.

९०% कंपन्या एजंटला/ फ्री लान्सरला त्यांच्याकडुन कन्सलटंन्सी चार्जेस देत असतात. अस असताना आपण ही चौकशी करायला हवी. एजंट पैसे मागत असल्यास तो रिलायबल नाही अथवा कंपनी मला काहीच देत नाही अस तो म्हणत असेल तर ती कंपनी रेप्युटेड नाही असा तर्क करायला जागा आहे.

अगदी १०० रुपये रजिस्ट्रेशन चार्जेस म्हणुन कोणी एजंट मागत असेल तर पैसे ई-ट्रान्स्फर करु नका. चेक ने पाठवा. बोगस एजंट आपले क्रेडीट कार्ड नंबर कॉपी मारुन लुबाडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इथे नोकरीच्या संधींचा दुसरा धागा होता ना? सापडला नाही.
माझ्या कंपनीत खालील पोझिशन्स आहेत, कुणाला इंटरेस्ट असल्यास विपू करा. स्थळः टेक्सास.
• Incident Detection
• Wireless Security Engineer
• Security Project Manager (Japanese bilingual)