' रिती ओंजळ '

Submitted by कविता केयुर on 11 September, 2014 - 02:56

' रिती ओंजळ '

एका आयुष्यातून मुक्त झालों कि नवा एक जन्म मिळतो
अन् परत तोच जूना प्रवास अगदी पून्हा नव्याने घडतो...

मूठीत वाटत अगदी पकडून ठेवू , ते बालपण परत हरवून जातं
आणि आयुष्य पून्हा आपल्याला , त्याच वळणावर आणून सोडतं...

प्रेमाचा अर्थ समजेपर्यंत , गुलाबी धुकं विरून जातं
पहाटेच स्वप्न पून्हा , डोळ्यातून वाहून जातं...

एकट पडल्यावर परत जणू , जूनाच एक धडा मिळतो
मुखवट्यांनमागे लपलेला , चेहरा हळूच समोर येतो...

कित्येक रात्री नशिबाला , दोष देण्यात निघून जातात
डोळे मात्र अजूनही , स्वप्न तिचं पहात असतात...

कुठे काय चुकलं हे , मनं अजूनही शोधत रहातं
दोन टिप पूसायांला , वाटतं कोणी हवं असतं...

चालतांना त्याच वाटेवर , साथ परत नवी मिळते
बेधूंद होवून क्षण सारे , परत नवी उमेद मिळते...

सुखं दू :खाचा लपंडाव , असाच खेळ मांडत रहातो
अलगत मागच्या पानावरून , प्रवास पूढे चालत रहातो...

आई वडिलांची स्वप्नं आता , आपल्या डोळ्यात हसत असतात
त्याच जागेवर त्याच वाटेवर , पावले आपली उभी असतात

इवली इवली सोबतं आतां , आभाळाएवढी मोठी होते
तृप्त होवून जातां जातां , ओंजळ मात्र रीती होते …….

Group content visibility: 
Public - accessible to all site users