कुठून हे बावळट ध्यान माझ्या गळ्यात पडल कोण जाणे ...कोण ?... म्हणून काय विचारताय अहो तुमच लाडक श्रीबाळ ...मी सहजच एकदा त्याला म्हंटले, “आठवणी विसरता येतात पण प्रेम नाही” झाल आता तेच वाक्य आठवून रोज रडत बसलेला असतो येडछाप कुठला आणि दिसेल त्या बाईला आई म्हणण्याची त्याची सवय पार डोक्यात जाते माझ्या ...तरी नशीब माझे मला ‘बायको आई’ म्हणत नाही...हे श्रीबाळ परवडल पण त्याच्या त्या सहा आयांनी डोक्याला वात आणला आहे नुसता..सहाजणींच्या सहा तरा...
सगळ्यात आधी श्रीची पदरआई म्हणजे आमच्या सासूबाई त्यांना तर कायम रड लागलेली असते पदर कायम तोंडाला लावलेला रडतानाही आणि हसतानाही... त्यांच्या त्या रडराडीला कंटाळूनच तर श्री चे बाबा घर सोडून गेलेले ते आता कुठे उगवले आहेत तरीही आपली ह्यांची रडारडी अजून सुरूच ते बहुतेक परत कल्टी मारतील....दुसऱ्या म्हणजे मोठी आई त्यांच्यासाठी कथालेखक संवाद लिहिण्याची तसदीच घेत नाही (त्या आपल्या ह्यांनी त्यांनी म्हंटलेले संवाद बोलून दिवस ढकलत आहेत) असो ते जावूदे ..तर माझ्या कृपेनेच त्याचं स्वतःच एक बुटिक आहे ...आता एवढ बुटिक आहे तर सुनेसाठी कधी काळी चार चांगले ड्रेस शिवावेत तर कसलं काय....मी आपले कळकटलेले मळकटलेले जुने ड्रेस घालून फिरत असते (माझी आई म्हणते ना गोखल्यांची कोणाला काही देण्याची दानत नाही तेच खरे )....आमच्या छोट्या आई तशा प्रेमळ आहेत पण विसराळू ...त्यांना गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या हे शिकवता शिकवता मी च सगळे विसरले आता त्यांना सगळ आठवतंय पण माझी मेमरी मात्र करप्ट..त्या सरू मावशी म्हणजे सगळा आनंदी आनंदच आहे अत्यानंद महाराजांच्या भक्तीत एवढ्या रममाण असतात की त्यांना कशाचाच भान नाहीएय ...आणि त्या बेबी आत्यानी स्वतःच घर सोडून इथेच कायमच बस्तान ठोकल आहे प्रत्येक गोष्ट ह्यांना सांगूनच करा नाहीतर ह्यांचे गाल रागाने फुगणार जरा म्हणून privacy नाही ह्या घरात ..आता राहिल्या आईआजी ..आमच्याकडे आई आजींचा एवढा दबदबा आहे की त्या म्हणतील तीच पूर्व दिशा ...पूर्वी त्यांना घरातल्या सगळ्या पुरुषांना घराबाहेर काढून घरात मातृसत्ताक पद्धत स्थापन करण्याचा नाद होता आता माझ्यामुळे सुधारल्या आहेत त्या ...हल्ली मी आईआजींच्या खोलीत राहते आता एवढा मोठा पलंग आहे तरीही मला मात्र जमिनीवर झोपवतात (मी ढिक म्हणेन मला जमिनीवर झोपायला आवडत पण ह्यांनी आग्रह करायला नको ??? )...वर घोरून घोरून माझी झोप उडवली आहे ती वेगळीच ,ह्याला म्हणतात सासुरवास ...काय सांगू तुम्हाला नुसता छळवाद मांडला आहे माझा ...हल्ली तर माझ्या पाच सासवा माझ्यासाठी पाच प्रकारचा नाश्ता करून तो खायला लावतात मला सुद्धा त्यांच्या सारख वजनदार करण्याचा कट आहे त्यांचा.. त्यामुळे मायबोलीवर आता लोक मला ढोली ढोली म्हणायला लागले आहेत .. काहीही हं असता हा त्याचं ..आता ह्यात माझा काय दोष ?? ...तुम्हीच सांगा एवढ खाल्ल्यावर माणूस चवळीच्या शेंगेसारख कस राहणार ??
तरी बर माझे ते दोन सासरे फारसे त्रासदायक नाहीएय्त काकांना सारख्या कुकीज कुक करण्याचा नाद लागला आहे आणि बाबांना सोफ्यावर बसून चहा ढोसण्याशिवाय दुसरा काही उद्योग नाहीएय सध्या ... पण ह्या बाबांनी आधीच एक उद्योग करून ठेवला आहे त्याच काय ..तिकडे अमेरिकेत श्रीबाळा साठी एक बहिण दत्तक घेवून ठेवली आहे..ती ही येईल काही दिवसांनी श्रीबाळाची ‘ताई आई’ बनून माझ्या डोक्यावर मिरा वाटण्यासाठी..ह्या सहा जणी कमी होत्या कि काय म्हणून ही आणखी एक 'ताई आई' आय मिन माझी नणंद बाई
कधी कधी मला त्या सायलीच्या नशिबाचा हेवा वाटतो सुटली बाई ती ह्या सगळ्यांच्या तावडीतून आणि मी मात्र अडकले ..तो अपघात झाला आणि माझा एक आटा सैल झाला( तसाही आधीही तो सैलच होता ) ..वाटल आता तरी हे सगळे पिछा सोडतील पण कसलं काय आल ना ते श्रीबाळ परत बस स्टॉप वर ...आता पुन्हा पहिले पाढे पंचावन्न...
अशोकमामा, माया करु??????? नो
अशोकमामा,
माया करु??????? नो वे....जे अधुनमधुन डोकावते ते सोडून देऊ शकते मी जास्तीत जास्त..म्हणजे छळ पण नाही (माझा ;)) अन मायाही नाही
अरेरे....इश्श मुलीच मुलींच्या
अरेरे....इश्श
मुलीच मुलींच्या दु:खाकडे असं दुर्लक्ष करू लागल्या तर कशी होणार प्रगती या देशाची ? देव करो आणि तो दिवस लवकर येतो, ज्यावेळी तुला, रीयाला, श्रद्धाला आमची जान्हवी तुमच्या घरातीलच वाटू लागेल.
अन्जू... थॅन्क्स....मला माहीत आहे तू डोम्बिवलीची असल्यामुळे सुरुवातीला जान्हवीविषयी तुला माया होती. पण आता मी तरी काय करू....? तिच्या नशीबाचे चक्र उलटे फिरले असल्याने तुमची माया आटत चालली आहे तिच्याबाबतीत....ती लवकर तिला परत मिळो...इतकेच मी म्हणू शकतो ना.
रीया प्लीज ‘तुम्ही’ वैगरे
रीया प्लीज ‘तुम्ही’ वैगरे म्हणू नकोस.. ..खूप दिवसांनी मायबोलीवर आल्यामुळे ह्या स्पर्धेबद्दल आधी माहित नव्हते नाहीतर स्पर्धेसाठी दिला असता हा लेख असो पण हि ‘कोतबो’ थीम मात्र छान आहे
अशोकमामा,
मला सुद्धा जान्हवी ढोली वाटत नाहीएय (अजूनतरी ) म्हणूनच तर तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे ना पण आगाऊ आणि अतिशहाणी मात्र नक्की वाटतेय
आगाऊ आणि अतिशहाणी मात्र नक्की
आगाऊ आणि अतिशहाणी मात्र नक्की वाटतेय
>>>
आता तू पण गेलीस
मामा लगे रहो
श्रद्धा आता मामा येणार धाऊन,
श्रद्धा आता मामा येणार धाऊन, (आगाऊ आणि अतिशाहणी म्हटल्यावर).
नो, नो....अन्जू....! म्हणू
नो, नो....अन्जू....! म्हणू दे....!
अगं तिला (श्रद्धाला) हक्क दिला आहे आपल्या घटनेने तिचे मत उघड मांडण्याचा..... आज ती जान्हवीला आगाऊ आणि अतिशहाणी म्हणाली तर उद्या ती आपले मत बदलूही शकतेच....बदलेलही.
मामा एवढे उदारमतवादी कधी
मामा एवढे उदारमतवादी कधी झालात, जानुच्या बाबतीत.
मुलीच मुलींच्या दु:खाकडे असं
मुलीच मुलींच्या दु:खाकडे असं दुर्लक्ष करू लागल्या तर कशी होणार प्रगती या देशाची ?>>>>>>>>>>>. त्या जानीचा आणि देशाच्या प्रगतीचा काय संबंध???
मुलीच मुलींच्या दु:खाकडे असं
मुलीच मुलींच्या दु:खाकडे असं दुर्लक्ष करू लागल्या तर कशी होणार प्रगती या देशाची ? >>> देशाची प्रगती त्या मंदबुद्धीच्या आय.क्यू वर असती तर आपण पुन्हा वल्कलं नेसायच्या युगात पोहोचलो असतो.
देशाची प्रगती त्या
देशाची प्रगती त्या मंदबुद्धीच्या आय.क्यू वर असती तर आपण पुन्हा वल्कलं नेसायच्या युगात पोहोचलो असतो.>>>>>> हाहाहाहाहा
(No subject)
अनिश्का....आणि
अनिश्का....आणि स्पार्टा....
अरे बाबानू.....माझ्या पॉईंटाकडे लक्ष द्या.....मुलींनी मुलींची बाजू घ्यावी असे मी जे उदारमतवादी विचार प्रकटले आहेत त्यामागील भूमिका अशी की, ती पोरगी ठेचकाळत असेल तर तिला प्रथम आजुबाजूच्या मुलींनी मलमपट्टी केली तर पीडिताला किमान काहीतरी सुख मिळेल ना.
देश अशीच प्रगती करीत राहो.
अहो मामा, तुमच्या गरीब
अहो मामा, तुमच्या गरीब बिचार्या, अश्राप पोरीला सगळ्या पोरी मदत करत बसल्या तर सगळ्यांचा मिळून एकत्रं किती वेळ फुकट जाईल? देशाची प्रगती बोंबलणारच ना? त्यातून इतक्या सगळ्यांनी सांगून तिच्या टाळक्यात प्रकाश पडत नसेल तर वेळ कशाला फुकट घालवायचा?
मान्य.....देशाची प्रगती
मान्य.....देशाची प्रगती जान्हवीच्या संसारावर अवलंबून नक्कीच असणार नाही.....ते एक प्रातिनिधीक वाक्य होते. आता तिच्या टाळक्यात प्रकाश पडत नाही, हे खरे, पण तिची ती स्थिती अपघाताने झाली आहे ना.....होईल असाच एखादा सप्लीमेन्टरी अॅक्सिडेंट पुढे केव्हातरी (२०१६ मध्ये) त्यावेळी ब्रेन रीअॅडजस्टमेन्ट पुन्हा होईल.....रीसायकलिंग झाले की मग ही पोरटी पुन्हा नाचूगाऊ लागेल.....अशी आशा आहे.
मामा....किती आशावादी आहात
मामा....किती आशावादी आहात तुम्ही
(अर्थात जान्हवीच्या बाबतीत)
तिचं रिअॅडजेस्टमेंट
तिचं रिअॅडजेस्टमेंट होईपर्यंत बाकीच्यांचे फ्यूज ती उडवते आहे त्याचं काय मामा?
इश्श......हो ना पोरी....लंगडी
इश्श......हो ना पोरी....लंगडी पांगळी मोडकी असली तरी ती शेवटी भाचीच आहे ना....मामाला भाचीविषयी खास अशी माया असतेच.
स्पार्टाकस.....नाही रे, तिने कधी कुणाचे फ्यूज उडविलेले नाहीत....उलटपक्षी जान्हवीनेच कावेरी, इंद्रायणी, सरस्वती, शरयू.....ह्या घरात ठाण मारून बसलेल्या नद्यांना वाहते केले ना ?
श्रद्धा आता मामा येणार धाऊन,
श्रद्धा आता मामा येणार धाऊन, (आगाऊ आणि अतिशाहणी म्हटल्यावर)>>

उलटपक्षी जान्हवीनेच कावेरी, इंद्रायणी, सरस्वती, शरयू.....ह्या घरात ठाण मारून बसलेल्या नद्यांना वाहते केले ना ?>>> हे मात्र खरे आहे .....पण त्या नर्मदेच काय ती कधी वाहणार ?? ....नाही नाही ती तशीही वाहतच असते कायम.. त्यामुळे तिला वेगळ वाहण्याची गरज नाही ,कदाचित असा विचार केला असेल त्या हुशार जानू ने
"....त्या हुशार जानू
"....त्या हुशार जानू ने...."
~ चला, या निमित्ताने का होईना तुला जान्हवी हुशार आहे हे पटले आहे. आशा आहे रीया तुझा हा प्रतिसाद वाचेल.
भारी लिहिलय...
मामा कशाला जानुची बाजू घेऊन
मामा कशाला जानुची बाजू घेऊन एवढा आटापिटा करताय, ती मस्त बंगले बांधतेय ह्या शिरेलीवर.
अन्जू ...अगदी अगदी. मामा...पण
अन्जू ...अगदी अगदी.
मामा...पण शशांक मात्र आवडतो आपल्याला. एकदम eye tonic
mi kahi vachalel nahi
mi kahi vachalel nahi
री
री
मामा, आमच्या घरात जानु परत
मामा, आमच्या घरात जानु परत सुरु झाली.
रोज रोज रेकॉर्ड करून बघणे सुरु झाले आहे.
अन्जू.....अगं ती जर बंगला
अन्जू.....अगं ती जर बंगला बांधीत असेल तर एक डोम्बिवलीकर म्हणून उलट तुला आनंदच झाला पाहिजे ना ?
रीया....तू काही वाचलेले नाही असे म्हणतेस....म्हणजेच तुझे वाचन झाले आहे, पण त्यातील सत्यता तुला नको आहे.
इश्श... रीयाला अनुमोदन देत आहेस...ठीक आहे....मग आम्हाला तो शशांक पसंत नाही. त्याच्या पाठीला कणाच नाही.
मृणाल....तुझ्या घरातील समस्तांना मामाचा नमस्कार पोच कर.....रेकॉर्ड करून पाहतात म्हणजे त्यांचे जान्हवीवरील प्रेम शाबीत होते.
मामा एरवी बंगले बांधुदे पण
मामा एरवी बंगले बांधुदे पण प्रेक्षकांना त्रास देऊन, वेठीला बांधून मजा करतेय त्याचं काय? ही काय एक डोंबिवलीकर म्हणून अभिमानाने सांगायची गोष्ट आहे का?
इश्श... रीयाला अनुमोदन देत
इश्श... रीयाला अनुमोदन देत आहेस...ठीक आहे....मग आम्हाला तो शशांक पसंत नाही. त्याच्या पाठीला कणाच नाही.
>>>>>>
मामा, असं कसं बरं....रील आणि रीअल लाईफ मधील नवरा आहे ना तो तुमच्या जानूचा मग पसंत नाही का म्हणताय?
इश्श.....सत्यस्थितीत तोच
इश्श.....सत्यस्थितीत तोच तिच्या कुंकवाचा धनी आहे हे मान्यच असल्याने तो जावई म्हणून चांगलाच आहे, म्हणजे पसंतही आहे. पण श्री भूमिकेत तो इतका बालीश दाखविला आहे की एक मोठा गृहउद्योग चालविणारा कर्तबगार तरुण वाटतच नाही. बापाला बाप न म्हणणारा....काकाला जवळ न येऊ देणारा....प्रसंगी सर्वात थोरल्या आईआजीशी मुद्यावरून भांडण काढून घर सोडून जाणारा हा एक्झिक्युटिव्ह असलेला श्रीरंग गोखले आजकाल बायकोच्या स्मृतिपीडा आजारामुळे पोरकट का वागत आहे ते समजत नाही. १५ दिवस होऊन गेले तिला सासरी येऊन, पण या दरम्यान तो एकदाही तिला घेऊन डॉक्टरांकडे गेल्याचे दाखविलेले नाही. प्रगतीचा फॉलोअप घेतला जात नाही....बेबीआत्या फाडफाड बोलत आहे दोघांना उशीरा आल्याबद्दल....तेही बकरीगत खाली मान घालून का म्हणून ऐकावे याने ? "ए आत्या, तुला काही कळते का ? काय बोलतीस तू हे ? तुम्ही फोन करायला हवा होता ना." निदान इतके तर बोलावे याने कणखरपणे !
म्हणजेच सद्यस्थितीतील याचे वर्णन याच्या पडद्यावरील नवरा भूमिकेला न पटणारे असेच आहे.
<< (मी ढिक म्हणेन मला जमिनीवर
<< (मी ढिक म्हणेन मला जमिनीवर झोपायला आवडत पण ह्यांनी आग्रह करायला नको ??? )>>
Pages