Submitted by गंगी on 10 September, 2014 - 06:19
मी आताच पासपोर्ट रिनिव करुन घेतलाय... माझा आणि माझ्या दोन मुलीचा ... तर आता परदेशी जातांना मला जुना पासपोर्ट पन सोबत ठेवावा लागेल का... कारण मोठ्या मुलीचा हा तिसरा आणि धाकटीचा दुसरा आनि माझा पण दुसरा पासपोर्ट आहे... आणि एवढे पासपोर्ट बाळगायचे म्हण्जे फार कट्कटीचे काम वाट्ते.... कुणाला ह्याबद्द्ल माहीत आहे का ?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारतात अशी कामं सांगायला
भारतात अशी कामं सांगायला कोणीही नाही
मी इथलाच पत्ता दिला आहे
मी इथलाच पत्ता दिला आहे पासपोर्ट रिन्यु करताना. भारतातला पत्ता दिला तर एक चांगले होते कि आयडी प्रुफ रहाते एक.
शिवाय कधी पुढे जीसी साठी
शिवाय कधी पुढे जीसी साठी अप्लाय करणार असाल तर पासपोर्टवरील कुठल्याही बदलाचा अत्यंतिक त्रास होतो.....स्वानुभव
मी पनवेल चा जुना पत्ताच
मी पनवेल चा जुना पत्ताच ठेवायचा विचार करते आहे आता पासपोर्ट वर...उगाच अडचण नको
पण तिथले कॉन्टॅक्ट्स खरंच व्हेरिफाय करतात का? कारण आता तिथे काही संबंध राहिले नाहीत.
प्लीज हसू नका ..
प्रिती +१०० १) जिथले अॅड्रेस
प्रिती +१००
१) जिथले अॅड्रेस प्रूफ देता येते तो पत्ता द्यावा.
२) तिथे साशणाने (कुठल्याही देशाच्या) काही पत्र पाठवले तर ते तुम्हाला मिळण्याची सोय हवी. उदा: भाडेकरू असाल तर मालकाला सांगून पत्र तुमच्या भारतातील नातेवाईकाकडे पाठवण्याची सोय हवी. किंवा नातेवाईकाचा (आई-बाबा, सासूबाई-सासरे इ इ.) पत्ता द्यावा. बदलासाठी थोडा त्रास झाला तरी १० वर्षे मानसिक शांततेत जातात.
नंबर २ स्वानुभवाने अधोरेखित, बोल्ड.
म्हणजे थोडक्यात पत्ता बदलला
म्हणजे थोडक्यात पत्ता बदलला तरी त्रास, न बदलला तरी त्रास...हे म्हणजे choose your own pit
माझ्या पासपोर्टवर लग्नाच्या
माझ्या पासपोर्टवर लग्नाच्या आधिचे नाव आहे. रिन्यू करताना नाव बदलायला लागेल का?
मी ऑफिशियली नाव बदललेलं नाही. पण बँकेत अकाउंट ओपन करताना, घराची रजिस्ट्री करताना, जनगणनेच्या वेळी आणि इन जनरल जिथे नवरा आणि माझं दोघांचं नाव लिहिलं जातं तिथे लोक सासरचं अडनाव लाव असा आग्रह धरतात. मी काही ठिकाणी जास्त वाद घालत नाही, पण काही ठिकाणी माहेरचचं अडनाव लावा असं लावून धरलं की काय आजकालचं फ्याड असं तोंड करतात.
आता पासपोर्टसारख्या ऑफिशियल डॉक्युमेंटवर स्टेटस मॅरिड आणि अडनाव माहेरचं असा अर्ज स्विकारतील का? माझ्या ओळखीच्या सगळ्या मुलींनी लग्नानंतर नावं बदलून घेतली त्यामुळे कोणाचाच फर्स्ट हँड अनुभव नाही. पासपोर्ट एजंटला विचारले तर तो म्हणतो, की कशाला रिस्क घेता? त्यांनी तिथे अर्ज स्विकारलाच नाही तर?
इथे कोणी लग्नानंतर अडनाव आणि पत्ता न बदलता पासपोर्ट रिन्यू केला आहे का?
पीनी, नाव न बदलता पासपोर्ट
पीनी, नाव न बदलता पासपोर्ट रिन्यू करता येतो. तसेच पत्ता न बदलता पण, फक्त अॅड्रेस प्रूफ आधीच्या नावाने द्यावे लागेल. अाणि मॅरेज सर्टीफिकेट दिले तर स्पाऊस नेम अॅडवून घेता येईल. नाव बदलायची जबरदस्ती नसते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुलांच्या बर्थ सर्टीफिकेटवर तुमच्या पासपोर्टवर असलेलेच नाव टाका.
इथे कोणी लग्नानंतर अडनाव आणि
इथे कोणी लग्नानंतर अडनाव आणि पत्ता न बदलता पासपोर्ट रिन्यू केला आहे का? >>>> मी केला आहे. माझ्या नवर्याने पण केला आहे
माझा २०१२ मध्ये रिन्यु केला होता. मॅरिटल स्टेटस वगळता इतर काहीही बदल केला नाही. तेव्हा तरी काही प्रॉब्लेम आला नाही. स्पाउसचं नाव सुद्धा पासपोर्टमध्ये अॅड करायचं झाल्यास त्याच्या/तिच्या पासपोर्टची पानं, मॅरेज सर्टिफिकेट नोटराइज करून पाठवावं लागतं.
पासपोर्टसारख्या ऑफिशियल डॉक्युमेंटवर स्टेटस मॅरिड आणि अडनाव माहेरचं असा अर्ज स्विकारतील का? >>>> अर्थातच हो.
जिथले अॅड्रेस प्रूफ देता
जिथले अॅड्रेस प्रूफ देता येते तो पत्ता द्यावा >>>> हे ऑबव्हियसच आहे असं मला तरी वाटत होतं.
मनशांतीबद्द्ल सीमंतिनी + १
मनशांतीबद्द्ल सीमंतिनी + १

मनुराणी +१
स्नेहा तुमची काहितरी गफलत होतेय. अदर अॅड्रेससाठी प्रूफ नाही लागत. जो पत्ता पासपोर्टवर पाहिजे त्याचं प्रूफ पाहिजे.
भारतात मागच्या महिन्यात सासर्यांनी पत्ता बदलुन पासपोर्ट रिन्यु केला नागपूरला , २ दिवसात घरी आला
माझ्या आईने पुण्याला ६ महिन्यांनपुर्वी पत्ता बदलुन पासपोर्ट रिन्यु केला, एजंट न घेता. ऑनलाईन अॅप्लाय केलं. काहिही त्रास झाला नाही.
मनुराणी, सिंडरेला धन्यवाद.
मनुराणी, सिंडरेला धन्यवाद.
भारताबाहेर असाल आणि लग्नानंतर
भारताबाहेर असाल आणि लग्नानंतर नाव बदलायचे असेल आणि लग्न भारतात झाले असेल तर तो विचार मनातून झटकन काढून टाका. पतियाला हाउस दिल्ली मधल्या माणसाच्या हस्त स्पर्शाशिवाय पान हलत नाही आणि त्या उप्पर विसा इतर हजार डॉक्युमेंट मध्ये बदल करावा लागतो आणि दर वेळा नाव बदलले सांगाताना दरदरून घाम फुटतो.
सिंडरेला फॉर्मात.
>>मी केला आहे. माझ्या नवर्याने पण केला आहे >>
पीनी- नाव बद्ला किंवा नका
पीनी- नाव बद्ला किंवा नका बदलू. पण एकच नाव सगळीकडे लावा.
लग्न झाले म्हणून बद्लेले नाव वापरु शकत नाही त्यासाठी शासनाचे नाव बदलेल्याचे परिपत्र लागते.
अमितव, राजू७६ Thanks.
अमितव, राजू७६ Thanks.
लग्नानंतर नाव बदलणे ह्याचे
लग्नानंतर नाव बदलणे ह्याचे (भारतात) कायदेशीर प्रूफ म्हणजे सरकारी गॅझेट मध्ये नवे नाव छापून आलेले असावे लागते. त्याचीही अॅफिडॅव्हिट, जाहिरात, अर्ज अशी काही काही प्रोसेस असते. ते केले नसेल तर नवे नाव वापरू नये. कुणी बँक अधिकारी म्हणाला तरी त्या नावाने खाते काढू नये. काही कायद्याची भानगड निघाली तर तुम्ही तिच व्यक्ती आहे हे सिध्द करण्यात फार वेळ जातो त्यापेक्षा तासभर त्या अधिकार्याशी हुज्ज्त घालणे परवडले.
(असे गॅझेट असणारे लोक्स) पासपोर्ट वरील नाव बदलण्यात कुटूंबातील कुणालाच अडचणी आलेल्या नाहीत. (भारतात आणि परदेशात ही रिन्यू केले होते त्यांचे पासपोर्ट). जिने गॅझेट केलेले नाही अशी एक विवाहिता कुटूंबात आहे, तिला माहेरचे नाव, स्टॅटस मॅरिडला अडचण आली नाही. (पण अशी एकच व्यक्ती मला माहित आहे.)
अॅड्रेस प्रूफ असेल तर अॅड्रेस द्यावा हे इतक ऑब्व्हियस नाही कारण जुन्या अॅड्रेसला प्रूफ लागत नाही. जुना अॅड्रेस ठेवायचा की नवा द्यायचा हा मुद्दा चर्चेत होता. जुन्या अॅड्रेसचे ही प्रूफ आहे आणि नवीन अॅड्रेसचे ही प्रूफ आहे अशा परिस्थितीतच वरचा प्रश्न व्हॅलिड ठरतो एवढेच स्नेहा यांना निदर्शनास आणायचे होते.
अदर अॅड्रेस भारतातला जुना
अदर अॅड्रेस भारतातला जुना द्यावा तरी प्रॉब्लेम, नवीन द्यावा तरी प्रॉब्लेम

- जुनाच ठेवला तर मला पनवेल चे २ कॉन्टॅक्ट्स द्यावे लागतील nationality verification form मधे..पनवेल मधे
भाड्याचे घर होते आणि आता त्याला ८-९ वर्षे झाली...आता तिथे ओळखीचे कोणीही नाही..
-पुण्याचा नवीन द्यावा तर तो आताच्या पासपोर्ट मधील बदल होईल..आणि तिथले MSEB चे बिल आहे पण त्याच्यावर नवर्याचं नाव आहे, माझं नाही..बाकी पुण्याला कॉन्टॅक्ट्स द्यायला अडचण नाही
to be printed on passport address तसाही अमेरिकेचा द्यायचा असं वेब्साईट म्हणते :-))
इथे कोणी लग्नानंतर अडनाव आणि
इथे कोणी लग्नानंतर अडनाव आणि पत्ता न बदलता पासपोर्ट रिन्यू केला आहे का?
>>
मी नुकताच पासपोर्ट रिन्यु केला. आधीचा पासपोर्ट लग्नापुर्वी काढला होता. नव्या पासपोर्टमध्ये मी बदलून बायकोचे आडणाव लावले नाही. माझेच ठेवले. तसेच बायकोचे नाव 'पति/पत्निका नाम' या मथळ्याखाली अॅड केले.
पति/पत्निचे नाव पासपोर्टमध्ये अॅड करण्यासाठी भारतातले (जर भारतात लग्न झाले असेल तर) विवाह नोंदणी दाखल्याची प्रत काढून ती अटेस्ट करून घेतली. अटेस्टेशन बँकेत/युनिवर्सिटी अश्या ठिकाणी फुकटात करून देतात.
marriage certificate मिळते
marriage certificate मिळते भारतात ते भारतात ग्राह्य धरतात नाव बदलताना. बायकोचं नाव घालताना पुण्याला मला काही अडचण आली नाही. पण देशाबाहेरील कोन्स्युलेटला ते सर्टीफिकेट पतियाला हौउस मधून सही शिक्यानिशी साक्षांकित लागते. दिल्लीवाल्यांना मुंबईच्या मंत्रालयातून थ्मब्स अप लागतो. (फाको टाळून) प्रत्येकाच्या वेळा आणि चकरा मारण्याइतका वेळ आणि पेशन्स गाठीशी हवा.
सरकारी गॅझेट मध्ये छापून आणले असेल तर उत्तमच.
भारतिय दुतावास, सिंगपुर च्या
भारतिय दुतावास, सिंगपुर च्या साईट वर दिलेल्या माहितीनुसार दोघाचे पासपोर्ट, लग्न पत्रिका किवा फोटो, affidavit दिले की marriage certificate मिळते. ते घेउन पासपोर्ट वर नाव बदलु शकतो किंवा नवरा / बायकोचे नाव घालु शकतो. .
https://www.hcisingapore.gov.in/pages.php?id=34
पत्ता बदलण्यासाठी submit copy of Aadhar card, PAN card, Telephone bill, bank statement etc.
https://www.hcisingapore.gov.in/pages.php?id=25
एकदम सोपी पध्धत आहे आणि VFS चे दुकान ह्या कामासाठी ३६५ दिवस २४ तास उघडे असते. मी त्याची सोय १० वेळा तरी वापरली असेल आणि कधीच त्रास झाला नाही. माझे आणि मुलाचे birth certificate (जे मी एकाच वेळी बनवले
) , marriage certificate हे सगळे तिकडेच बनवले आहे. ( १०० रु च्या कागदावर भारतातुन एक affidavit बनवुन घेतले होते )
साहिल नाव बदलणे साठी वेगळी
साहिल नाव बदलणे साठी वेगळी लिंक आहे. गॅझेट लागते. सिंगापूरातही.
https://www.hcisingapore.gov.in/pages.php?id=25
धन्यवाद, माझ्या केस मध्ये
धन्यवाद,
माझ्या केस मध्ये नाव बदल्याचे न्हवते त्यामुळे हे लक्षात नाही आले.
भारतात , लग्नानंतर पूर्ण नाव
भारतात , लग्नानंतर पूर्ण नाव बदलून पासपोर्ट रीन्यु करू इच्छीणार्या तायानो , :
मी वेबसाईट चेक करून सर्व अपेक्षित डॉक्युमेंटस घेउन गेले होते.
पण काउंटरवरच्या महोदयानी 'नविन नावाच्या आयडी प्रूफ'ची मागणी केली.
म्हटलं , "नाही आहे , आणि साईटवरती पण लिहिल नाही आहे . "
त्याने अगदी " कुठुन कुठुन येतात लोक " असा चेहरा केला . "आता हे पण साईट वर कस लिहिणार , सगळचं लिहायच काय ? "
"लग्नाला किती वर्श झाली , पॅन कार्ड , ड्रायव्हिन्ग लायसेन्स ,आधार कार्ड काहीतरी असेल ना"
खरतरं आधार कार्ड होतं , पण त्यावर सासरच्या जुन्या घराचा पत्ता असल्याने नेलं नव्हते.
म्हटलं नाही आहे .पण जुना पासपोर्ट आणि marriage certificate आहे . ,अॅफिदेविट आहे .
" तुम्हाला आयडी प्रूफ चा अर्थ कळतो ना "
नवर्याने विचारले मी आणखी दूसर्या कुठल्या अधिकार्याशी बोलु शकतो का ? "हां ,हां बोला , मला काय ?"
आम्ही १०-१५ मि. वाद घातला . मग जरा नरमाई ने घेतलं .
बाकीचे चेक करा,काय राहीले असेल तर एकदाच सांगा, आता पूढच्या वेळेला नक्की काय आणू वगैरे बाबापूता केलं.
शेवटी , बँक पासबूक वर फोटो लावा आणि त्यांचा स्टॅम्प आणा ,गेलाबाजार , जुना पत्ता असला तरी आधार कार्ड ही चालेल असे सांगितले .
.
आणखी एक दिवस वाया जाणार म्हणून खरतर माझी चिड्चिड झाली
सुदैवाने नवर्याचे सगळे डॉक्युमेन्ट्स बरोबर होते . तो आतमध्ये प्रोसेस्सिन्ग ला गेला आणि मी बाहेरच वाट बघत बसले.५ मि. बाहेर आला . "चल ईकडे ये, होईल काम . " आणि काउंटरवर घेउन गेला .
त्याने आत जाउन एका ऑफिसरकडे चौकशी केली होती. सुदैवाने त्या मॅडमनी " काही गरज नाही " सांगितले आणि बाहेर काउंटरवर फोन करून मला टोकन द्यायला सांगितले.
आतमध्ये वेरिफिकेशनमध्ये एकाही काउंटरवर मला आयडी प्रूफ विचारण्यात आला नाही .
तात्पर्यः जर नविन नावाचे आयडी प्रूफ असेल तर नक्की घेउन जा. नसेल तर फिंगर क्रॉस्सड .
जर बाहेर टोकन देतानाच, नाही मागितलं तर तुमचे सुदैव , मागितलं तर वाद घालायची आणि अधिकार्यांकडे जायची तयारी ठेवा. नाहीतर मग परत एक दिवस यायची तयारी ठेवा
लेकाच्या पासपोर्ट रेन्यु साठी , फक्त पालकांचे पास्पोर्ट आणि दोघांपैकी कोणीतरी एक हजर असावा असं सांगितल आहे .
आम्ही दोघेही जाणार आणि त्याचे आधार कार्ड वगैरे घेउन जाणार . कोई रिस्क नही लेना चाहते
पोलिस व्हेरिफिकेशन्ची गरज
पोलिस व्हेरिफिकेशन्ची गरज नव्हती म्हणून अक्षरशः चार दिवसात नविन पासपोर्ट हातात आला.
तत्कालचे ४००० रूपये वाचले .नविन वर्शाची सुरवात " फील गूड " गोष्टीनी झाली .
पोलिस व्हेरिफिकेशन्ची गरज
पोलिस व्हेरिफिकेशन्ची गरज नव्हती म्हणून अक्षरशः चार दिवसात नविन पासपोर्ट हातात आला.
तत्कालचे ४००० रूपये वाचले <<<
कसे काय? पोलिस व्हेरिफिकेशची गरज का नव्हती?
सगळयांना धन्यवाद. बरीच माहिती
सगळयांना धन्यवाद. बरीच माहिती मिळाली.
Pages