झी-जिंदगी

Submitted by कविता१९७८ on 10 September, 2014 - 00:37

पुर्वी जेव्हा केबल हा प्रकार अस्तित्वात नव्हता तेव्हा दुरदर्शन वर छान मालिका दाखवल्या जायच्या . बहुतकरुन त्या कुठ्ल्या न कुठल्या हिंदी उपन्यासावर आधारीत असायच्या. जास्तीत जास्त २०-२५ भागांची एक मालिका असायची. आतिशय अर्थपुर्ण संदेश देणार्‍या मालिका असुन सुद्धा कुठेही भडकपणा नसायचा. नट्यांचा कमीतकमी मेकअप, साध्या साड्या , सुंदर अभिनय. परंतु साधारण ९०-९२ च्या दरम्यान केबल हा प्रकार आला आणि पुर्ण चित्रच पालटले, मालिकांमधे अतिशय श्रीमंती , भडकपणा दाखवला जाउ लागला, मालिकांची टी.आर.पी. वाढवण्यासाठी काही संदर्भ नसेलेले कथानक वापरले जाउ लागले, एकावर एक मालिका येउ लागल्या, नवनवीन चेहरे येउ लागले. मालिकेचे भाग वाढवण्याच्या नादात कथानकाला भलतेच वळण देणे सुरु झाले, एकाच घरातील एक सुन पहील्या नवर्‍याबरोबर घटस्फोट घेउन त्याच घरातील दुसर्‍या मुलाबरोबर संसार थाटु लागली, एकाच घरात ४-४ कुटुंबे एकत्र नांदु लागली प्रत्येक पात्र थोड्या थोडया वेळाने चांगले आणी वाईट अशी दुय्यम भुमिका साकारु लागले. प्रत्येक पात्र अपघातात मरण पावुन काही एपिसोड नंतर जीवंत होणं , नायक - नायिकांचा स्मृतीभ्रंश होणं हे सगळं करता करता काही मालिका ५०० भागापर्यंत पोहोचल्या. प्रत्येक मालिकेत नायिकेचा भडक मेकअप, मग ती कीतीही गरीब असो, विधवा असो तिला सजुन धजुन दाखवले गेले पण आता सर्वांनाच त्याचा कंटाळा येउ लागालाय, सारखं तेच कथानक , सासु - सुनांची भांडणे , वहीनी - नणंदांची भांडणे , वहीनीची कारस्थानी आई घरात येउन उच्छाद मांडणे म्हणुन ह्या मालिका पाहणेच बंद केले होते.

असेच एके दिवशी चॅनल्स चाळता चाळता झी चे जिंदगी चॅनल लावले. पाकीस्तानी मालिका असतात पण कुठेही भंपकपणा नाही , ३०-३५ भागांची मालिका असते. अतिशय साधेपणा , बोलण्यात अतिशय आदर , कपडे अतिशय साधे, अतिशय श्रीमंत घर असले तरीही बायकांचे ही कपडे अतिशय साधे , दगिने तर शक्यतो लग्नासारख्या समारंभाशिवाय घातलेले दाखवले गेले नाहीत, अर्थपुर्ण मालिका. हा आता पाकीस्तानी मालिका पाहणे न पाहणे हे प्रत्येकावर आहे पण भारतीय मालिकांप्रमाणे अगदी प्रत्येक गोष्टीची अतिशयोक्ती अशा मालिकांमधे दिसत नाही की सारखं अल्ला अल्ला केलं गेलेलं नाही त्यापेक्षा तर भारतीय मालिकेत देवालाही सोडलेलं नाही. कुठेही कृत्रीमता वाटत नाही , घरे सुद्धा आर्थिक परीस्थीतीनुसार दाखवली आहेत.

ह्या चॅनलवरील माझी आवडती मालिका म्हणजे "कीतनी गिर्‍हें बाकी है", ही मालिका स्त्रियांवरील बंधने, अत्याचार, बलिदान ह्या वर आधारीत आहे , रोज वेगळी कहाणी दाखवली जाते. ह्या मालिकेचे सुत्र संचालन कीरण खेर यांनी केले आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कितनी गिरहे चं सांगा कि राव . आता लागत नाही का ? लागत असेल तर कुठल्या वारी किती वाजता लागते ? आणि एखादी हॉरर मालिका लागते का झी-जिंदगी वर ?

कितनी गिर्‍हें अब बाकी है आता लागत नाही, हॉरर मालिका ही लागत नाही, सध्या पुढील मालिका चालु आहेत.

१] सबकी लाडली ... लारैब
२] मेरी जान है तु
३] प्यार का हक
४] इज्जत
५] कभी आशना कभी अजनबी
६] मेरे हमनवा
७] खेल किस्मत का
८] बडी आपा

नुकत्याच संपलेल्या सीरीयल्स पैकी "रंजिश" आणि "लडकी होना कोई गुनाह नही" आवडल्या. "वक्त ने कीया क्या हसी सितम" ही भारत पाक फाळणीवर आधारीत प्रेमकथा होती.

"सारे मौसम तुमसे ही ही एकच भागाची मालिका होती की मी शेवटचा भाग पाहिलाय माहीत नाही पण वेगळी कथा होती , आवडली, दोन तरुण मुलांचे आईवडील असतात , जोडप्याचे एकमेकावर खुप प्रेम असते, मोठ्या मुलाच्या साखरपुड्याच्या दिवशी माहीत पडतं की आई पुन्हा प्रेग्नंट आहे, आई पन्नाशीत असल्याने अबॉर्शन करण्यात आईच्या जीवाला धोका असतो, वडील आईला साथच देतात पण मुलं या ना त्या कारणाने तिचे अबॉर्शन करु पाहतात. मुलांची , समाजाची वागणुक आणि त्यावर आई वडीलांनी दिलेले उत्तर, मस्तच वाटली सीरीयल.

लडकी होना कोई गुनाह नही मधे जैद नाव असलेला आणि खेल किस्मत का मधे दानियाल नाव असलेला सावळा हीरो, मस्तच दिसतोय

पेरू, हो सदके चं टायटल सॉंग किलर आहे! आणि माहिरा अक्षरशः जगली आहे शानो म्हणून! शेवटचा भाग जमिनीवर आणणारा होता म्हणून आवडला. खलील काही काही ठिकाणी आवडला पण खरे खलील साब खूपच आवडले कारण त्यांनी लिहिलेली उत्कृष्ट पटकथा आणि संवाद Happy Those dialogues keep ringing in your head! Especially the ones between Shano and Rasheeda!

हमसफर नंतरची माहिराची आलेली मालिका शेहर-ए-जात (Shehr-e-jaat = the city of soul) बघायला घेतली. It's supposedly a spiritual love story. I really liked the title! पहिले ७-८ भाग फार छान आहेत. असं वाटतं की एकदम काहीतरी हटके स्टोरी पाहायला मिळणार! पण मग एकदम इतकी stereotypical होते मालिका आणि शेवटचे काही भाग तर एकदम अति-धार्मिक इस्लामपुराण जे पटत नाही (इस्लाम आहे म्हणून नाही पण अति आणि अतार्किक आहे म्हणून)! अक्षरशः पळवत पळवत पाहीली. दोन चांगल्या गोष्टी..माहिराचं काम चांगलं झालं आहे. सुरुवातीला खूप वेगळी मुलगी आणि नंतर संपूर्णपणे बदललेली मुलगी तिने चांगली उभी केली आहे. The best thing about the serial is the title song! अबिदा परवीन यांची यार को हमने जा ब जा देखा (जा ब जा - सगळीकडे) ही अप्रतिम गझल हे ह्या सिरीयलचं टायटल सॉंग आहे. The central idea is very very good but the way it is scripted it defeats the whole purpose Sad I wish it was scripted better. It would have been a mile-stone drama! अर्थात ह्या अशा वेगळ्या, हटके विषयांना हात घालणाऱ्या मालिकांचा विचार होतो हेही कौतुकास्पद आहे. Though the efforts are just skin deep we must appreciate them!

शनाख्त बघितली. बरी वाटली. नेहमीचेच प्रश्न आहे पण प्रेझेन्टेशन चांगले आहे.

सध्या मेरा नाम युसुफ आवडतेय. टायटल साँगपण छान आहे.

Could not resist! जागून ५ भाग पाहीले मेरा नाम युसुफ है चे Happy मेहरीन आणि के आर क्यू - एका traditional कथेला मजेदार आणि unique कसं बनवता येतं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही मालिका..I am loving it!

जिज्ञासा, मेरा नाम युसुफ केली का पूर्ण? टायटल साँग जबरी आहे. सध्या दियार ए दिल बघतेय. थोडी वेगळी स्टोरी आहे. वरती लिंक दिलेल्या शॉर्ट फिल्मच नाव दे ना. फेसबुक लिंक नाही उघडता येणार.

पेरु .. मी बघितली गेल्या विकांताला.. टायटल साँग +१

काल रंजिश बघायला सुरु केली.. असं वाटतय की आईबाबांच अधुरं प्रेम हेच बेस आहे की काय!
सदके तुम्हारे मधे शानोची आई ही या सिरीअलमधे सिंगल पॅरेंट आहे.. तिचा लुक नि कॅरेक्टर एक्दम विरुध्द आहे आधीपेक्षा!
दोन्ही भुमिका मस्त केल्यात.. आधीतर विश्वास्च बसला नव्हता माझा.. शानोची आईच डोक्यात!

जिंदगी गुलझार है, हमसफर, नूरपूर की रानी, वक्त ने किया, कितनी गिर्हे इ. सुरुवातीच्या सिरीयल्स खूप पाहिल्या. जिंदगी चॅनलच खूप मस्त आहे. पण अलिकडे वेळ नाही झाला TV पहायला.. सध्या कुठल्या चांगल्या सिरीयल्स सुरू आहेत?

पेरू, शॉर्टफिल्मचं नाव the letters of Mikael Muhammad असं आहे. मी पाहिलं शोधून पण ही फिल्म युट्युबवर नाहीये! त्यांनी ती फेसबुकवरच अपलोड केल्येय.
मेरा नाम..पूर्ण केली! टायटल सॉंग +१ शेवट पण आवडला Happy आजीबात खेचली नाही ते फार आवडलं!
दियार-ए-दिल चे सुरुवातीचे भाग पाहिले आहेत. नंतर ती मागेच पडली. Is it going good?
चनस, शानो ची आई = सामिया मुमताज ग्रेट आहे! Ace actress! रंजिश पाहिली नाहीये मी..सामिया मुमताज असेल तर नक्की बघेन!

दियार ए दिलचे सुरुवातीचे भाग आवडले नव्हते. त्यात सगळी चुकी बेहरोज आणि रुहीचीच असेच इम्प्रेशन येत होते ते नाही आवडले. नंतर सिरियल पुढे गेल्यावर तीची भुमिकाच लेखकाने एकदम ब्लॅक केली आणि आगाजानला मात्र एकदम व्हाइट दाखवले ते नाही आवडले. मधले काही भाग रटाळच आहे पण सनम सईदसाठी बघितले. तिचा जावई वली मात्र भारी दाखवलाय. एन्डला सगळे गोड गोड होणार असा अंदाज आहे.

दुर-रे-शहरवार (कसं लिहितात हे?) चा उल्लेख कोणी केला होता इथहे? ती टेलीफिम्लही आहे दाखवणार आहेत लवकरच.

कोक कहानी (https://www.youtube.com/watch?v=ISl6JejU-BE) ही मेहरीन जब्बारची १३ भागांची sitcom पाहिली! मस्त आहे! एकदा पहावी अशी आहे. सध्याच्या चांगल्या पाकिस्तानी sitcoms (किसकी आयेगी बारात सिरीज वगळता) कमीच आहेत. त्यामुळे कोक कहानी सुखद धक्का आहे!

I love how MJ always tries to portray "the right thing" in her dramas! I also like the clean humor in Urdu sitcoms! All in all, 13 episodes 20 minutes each..worth investment of time!

मुझसे अब मेरी मुहोब्बत के फसाने ना कहो,
मुझको केहने दो के मैने उन्हे चाहा ही नहीं!
- साहीर लुधियानवी

अरुंधती रॉय यांच्या God of small things ह्या अप्रतिम कांदबरी वरून प्रेरित तल्खीयाँ पाहिली. अत्यंत सुंदर मालिका..कथानक तर अप्रतिम आहेच पण त्याचे अनेक पातळ्यांवरचे माध्यमांतर सुरेख झाले आहे! केरळातून उचलून कथेला मरी (आपल्या माथेरान/महाबळेश्वर सारखे एक थंड हवेच्या ठिकाण) येथे आणून उर्दू भाषेतून, मालिकेच्या दृक्श्राव्य माध्यमातून सादर करणे हे एक फार अवघड शिवधनुष्य बी गुल हिने यशस्वीपणे पेलले आहे! (बी गुल ची ह्या ताकदवान कथा-पटकथा-संवाद लेखिकेची ह्या मालिकेमुळे ओळख झाली. तिची आपल्याला माहिती असलेली प्रसिद्ध मालिका म्हणजे कितनी गिरहे बाकी है. जी मी पाहिली नाहीये!) खालिद एहमद यांनी मालिका खूप सुरेख दिग्दर्शित केली आहे. सगळ्या कलाकारांची कामे उत्तम! कितीही तारीफ केली तरी ती पुरेशी वाटणार नाही इतकी!
तल्खीयाँ म्हणजे कडवटपणा..एखाद्याच्या आयुष्यात अकारण सगळीच गणितं चुकत जावीत आणि आयुष्याला जरा प्रेमाचा ओलावा लाभतोय तोच त्या ओलाव्याचा वणवा होऊन त्यात सारं काही जळून खाक होऊन जावं ह्यानंतर येणारा कडवटपणा. ह्यात दुःख आहे, वेदना आहे पण ती फार कोरडी आहे..ह्या दुःखाने धोधो रडायला येत नाही. घशात आवंढा येतो, कसेबसे पाण्याचे दोन थेंब बाहेर पडतात तेवढंच. पण तरीही आपण रडतोच..आतल्याआत..कोरडे! हे असे दुःख फार वाईट कारण ते मोकळे होऊ देत नाही.
मी खूप वर्षांपूर्वी एका अशाच पावसाळ्यात God of small things वाचली होती..ती संपल्यावर मला जसं वाटलं तसंच मला तल्खीयाँ संपल्यावर वाटलं! माझ्यासाठी ही माध्यमांतर यशस्वी झाल्याची खूण आहे. Undoubtedly one of the finest dramas of Pakistan till date. Kudos!

And when a shooting star sparkles through my night sky,
Let me not feel the ache of a lost wish…
And when the color of rainbow fades in a blink of an eye,
Let me not feel the fire that my tears unleash..
And when the moments we cherished poison my rains,
Let me not feel the void that you left behind...
And when battling my agony I resent the summer rains,
Let me not hear the melody that the song birds find …
Let me not think of you in the silence of the night,
Let me not languish for the seasons gone by,
Aching in your absence with every soft side
Relieve me from the odes of lost love …

Hear this beautiful OST here : http://www.pakium.com/2012/11/15/mehwish-hayat-waqar-ali-talkhiyan

Jackson heights - माझ्या आवडत्या दिग्दर्शिकेची, मेहरीन जब्बारची मालिका. पण ती सुरु असताना मला पाहायला वेळ झाला नव्हता. म्हणून गेल्या काही दिवसांत थोडी थोडी करून पाहिली. २७ भागांची मालिका आहे. असं खूप वेगवान, घडामोडींनी भरलेलं कथानक नाहीये. बऱ्यापैकी अंदाज बांधता येणारी गोष्ट आहे. पण ह्या गोष्टीतली माणसं खूप खरी आहेत. त्यांचे प्रॉब्लेम्स खूप खरे आहेत त्यामुळे ही मालिका बघावीशी वाटते. न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या देसी जनतेची गोष्ट आहे. भट्टी साब, सलमा, मिशेल, जमशेद ह्या सगळ्यांची स्वतःची एक स्टोरी आहे. मला भट्टी साब यांचं काम खूप आवडलं! अगदी must watch अशी नसली तरी एकदा नक्कीच बघण्यासारखी आहे.
आणखी दोन गोष्टी : वसय चौधरी हा माणूस इतकं सिरीयस लिहू शकतो हे माहिती नव्हतं मला! आणि MJ चा USP म्हणजे संगीत- मालिकेचा OST खूप श्रवणीय आहे.

जिज्ञासा, अनघा...........जॅक्सन हाइट्स मलाही खूप आवडते.
माणसं अगदी खरी.त्यांचे प्रॉब्लेम्स खूप खरे आहेत>>>>>>>>>>>>>>>>>>> +१००
आणि अगदी सट्ल डायरेक्शन, कुठेही मेलोड्रामा नाही.
आणि मी स्वता: ही अशी पाकीस्तानी माणसं तिकडे उसगावात जवळून पाहिली आहेत. आणि त्यांच्या कहाण्या खूप जवळून अनुभवल्या आहेत. काही नोकरीनिमित्त काही इल्लिगल इम्मिग्रन्ट्स काही अगदी त्या जमशेदसारखी ...अ‍ॅट एनी कॉस्ट अमेरिका गाठायचीच या विचाराने भारलेली. त्यामुळे ही मालिका खूप ओळखीची वाटते.
भट्टीसाब ...वेरी स्वीट. आणि हो म्युझिकही. न्युयॉर्कमधून कॅमेराही मस्त फिरवलाय.
छानच आहे सिरियल.

पाकिस्तानी सिरियल्स मध्ये जरा दुष्काळ पडल्यासारखा वाटत होता! पण आता सध्या दोन मालिका बघते आहे.
दियार ए दिल मी पूर्ण नाही पाहिली पण ती एक चांगली मालिका आहे असं ऐकलंय. त्याच दिग्दर्शकाची नवीन मालिका सुरु झाल्येय - मन्न मायल (अर्थ: मन्न - favorable मायल - inclination). माया अली (She is getting better each day!) आणि हमझा अली अब्बासी (he's one to watch out for - very handsome guy!) यांची. अजूनतरी स्टोरी आजीबात खास नाही. पण हे दोघे आणि इतर कलाकार छानच काम करत आहेत. मालिका पुढे जाईल तशी गोष्ट जरा वेगळी असेल असं वाटतंय. बघण्यासारखी गोष्ट म्हणजे camerawork! दियार ए दिल मध्ये सुद्धा इतकं अप्रतिम शूटिंग होतं वाह! शिवाय मालिकेचा OST पण खूप श्रवणीय आहे. तर मालिकेची झलक:
OST - https://www.youtube.com/watch?v=l8pFZrZtCdc

Mann Mayal BTS - https://www.youtube.com/watch?v=YNj3VagP3mk

दुसरी मालिका मात्र एकदम हटके आहे. प्रीत ना करीयो कोई. बरेच भाग झालेत ह्या मालिकेचे आणि मी नुकतीच पाहायला सुरुवात केल्येय. वेगळीच गोष्ट आहे. एकदम raw, खऱ्याखुऱ्या व्यक्ती आहेत सगळ्यांची कामे फार सुरेख पण नायिका थोडी हट्टी आणि आपले इप्सित साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाणारी मुलगी दाखवली आहे. मी फार उत्सुकतेने पुढचे भाग बघत्येय! I have high hopes from this drama. बघूया..
ता.क. : प्रीत ना.. फार मस्त चालू आहे..मी ११व्या भागापर्यंत पोचले आहे. काही गोष्टी खटकल्या पण गोष्ट इतकी पटापट पुढे जाते की त्याकडे जास्ती लक्ष दिलं जात नाही. बघाच!

जरा पाकिस्तानी मालिकांची ताजी खबरे!
प्रीत ना करीयो कोई १९ भागात संपली. शेवटचा भाग जरा संपवल्यासारखा वाटला पण त्या आधीचा भाग खूप सुरेख होता! एकुणात चांगली, एकदा बघावी अशी मालिका झाली.
मन मायल अत्यंत संथ आणि कंटाळवाणी चालू आहे. नेटाने बघत्येय तरी ही मी.
कुछ प्यार का पागलपन भी था अशा लांबलचक नावाची फवाद खानची एक जुनी (२०१२) मालिका बघायला सुरुवात केली आहे. जरा वेगळी कथा आहे. अमेरिकेत करियर करण्यासाठी आलेल्या एका अति-गर्विष्ठ मुलाची (फवाद खान) गोष्ट आहे. बघूया पुढे कशी वाटतेय.
नवीन मालिकांमध्ये बऱ्याच वेगळ्या विषयावरच्या मालिका आहेत. मै सितारा म्हणून एका चित्रपट नटीच्या आयुष्यावरची मालिका आहे जी १९६०/७० चे दशक ते २१ वे शतक असा पूर्ण प्रवास दाखवते. प्रोमो (https://www.youtube.com/watch?v=lC8QNQgE6fQ)आणि पहिला भाग छान वाटला.
अजून एक भाई म्हणून रस्त्यावर गुंडगिरी करणाऱ्या एका गल्लीतल्या भाई ची गोष्ट सांगणारी मालिका आहे. जी मी पाहिली नाहीये पण चांगली आहे असं वाचलंय.
सध्या पहायला सुरुवात केलेली मालिका म्हणजे दिल लगी. अजून तरी चांगली वाटतेय जरी कथेत काही नाविन्य नसलं तरी.
एका अजून सुरु न झालेल्या मालिकेविषयी प्रोमो पाहून उत्सुकता निर्माण झाली आहे. ती म्हणजे मोर महल (https://www.youtube.com/watch?v=NhBSEVQiKB0)
काही दिवसांनी पुन्हा अपडेट देईनच!

Pages