झी-जिंदगी

Submitted by कविता१९७८ on 10 September, 2014 - 00:37

पुर्वी जेव्हा केबल हा प्रकार अस्तित्वात नव्हता तेव्हा दुरदर्शन वर छान मालिका दाखवल्या जायच्या . बहुतकरुन त्या कुठ्ल्या न कुठल्या हिंदी उपन्यासावर आधारीत असायच्या. जास्तीत जास्त २०-२५ भागांची एक मालिका असायची. आतिशय अर्थपुर्ण संदेश देणार्‍या मालिका असुन सुद्धा कुठेही भडकपणा नसायचा. नट्यांचा कमीतकमी मेकअप, साध्या साड्या , सुंदर अभिनय. परंतु साधारण ९०-९२ च्या दरम्यान केबल हा प्रकार आला आणि पुर्ण चित्रच पालटले, मालिकांमधे अतिशय श्रीमंती , भडकपणा दाखवला जाउ लागला, मालिकांची टी.आर.पी. वाढवण्यासाठी काही संदर्भ नसेलेले कथानक वापरले जाउ लागले, एकावर एक मालिका येउ लागल्या, नवनवीन चेहरे येउ लागले. मालिकेचे भाग वाढवण्याच्या नादात कथानकाला भलतेच वळण देणे सुरु झाले, एकाच घरातील एक सुन पहील्या नवर्‍याबरोबर घटस्फोट घेउन त्याच घरातील दुसर्‍या मुलाबरोबर संसार थाटु लागली, एकाच घरात ४-४ कुटुंबे एकत्र नांदु लागली प्रत्येक पात्र थोड्या थोडया वेळाने चांगले आणी वाईट अशी दुय्यम भुमिका साकारु लागले. प्रत्येक पात्र अपघातात मरण पावुन काही एपिसोड नंतर जीवंत होणं , नायक - नायिकांचा स्मृतीभ्रंश होणं हे सगळं करता करता काही मालिका ५०० भागापर्यंत पोहोचल्या. प्रत्येक मालिकेत नायिकेचा भडक मेकअप, मग ती कीतीही गरीब असो, विधवा असो तिला सजुन धजुन दाखवले गेले पण आता सर्वांनाच त्याचा कंटाळा येउ लागालाय, सारखं तेच कथानक , सासु - सुनांची भांडणे , वहीनी - नणंदांची भांडणे , वहीनीची कारस्थानी आई घरात येउन उच्छाद मांडणे म्हणुन ह्या मालिका पाहणेच बंद केले होते.

असेच एके दिवशी चॅनल्स चाळता चाळता झी चे जिंदगी चॅनल लावले. पाकीस्तानी मालिका असतात पण कुठेही भंपकपणा नाही , ३०-३५ भागांची मालिका असते. अतिशय साधेपणा , बोलण्यात अतिशय आदर , कपडे अतिशय साधे, अतिशय श्रीमंत घर असले तरीही बायकांचे ही कपडे अतिशय साधे , दगिने तर शक्यतो लग्नासारख्या समारंभाशिवाय घातलेले दाखवले गेले नाहीत, अर्थपुर्ण मालिका. हा आता पाकीस्तानी मालिका पाहणे न पाहणे हे प्रत्येकावर आहे पण भारतीय मालिकांप्रमाणे अगदी प्रत्येक गोष्टीची अतिशयोक्ती अशा मालिकांमधे दिसत नाही की सारखं अल्ला अल्ला केलं गेलेलं नाही त्यापेक्षा तर भारतीय मालिकेत देवालाही सोडलेलं नाही. कुठेही कृत्रीमता वाटत नाही , घरे सुद्धा आर्थिक परीस्थीतीनुसार दाखवली आहेत.

ह्या चॅनलवरील माझी आवडती मालिका म्हणजे "कीतनी गिर्‍हें बाकी है", ही मालिका स्त्रियांवरील बंधने, अत्याचार, बलिदान ह्या वर आधारीत आहे , रोज वेगळी कहाणी दाखवली जाते. ह्या मालिकेचे सुत्र संचालन कीरण खेर यांनी केले आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मन मायल मनाला येईल तशी पुढे जात आहे..सोडून दिली बघणं!

दिल लगी चे संवाद एकदम कडक आहेत! मजा येते बघायला त्यामुळे..शिवाय कथा ही वेगळीच वळणं घेत चालली आहे. शेवटी तिची नेहमीची प्रेम कहाणी झाली तरी फार वाईट वाटणार नाही.सबा हमीद फार छान काम करत्येय!
(एका रविवारी पुढचा भाग आला का म्हणून युट्युबवर बघत होते तर चक्क ही मालिका युट्युबवर थेट प्रक्षेपित होत होती! काय भारी वाटलं:) )

पण आत्ता इथे लिहिण्याचं कारण म्हणजे एका नवीन मालिकेचा पहिला भाग बघते आहे. हमसफरचा दिग्दर्शक फरहात इश्ताकने दिग्दर्शन केलं आहे. फार छान मालिका होईल असं मालिकेतले कलाकार बघून वाटतंय! अहसन खान (प्रीत ना करीयो कोई), सामिया मुमताज आणि रेहान शेख (सदके तुम्हारे), द बुशरा अन्सारी आणि बेहरोझ सब्झावारी (किती नावं लिहू!) असे सगळे कलाकार असणार आहेत ...मज्जा मालिका असणार आहे ही!

'उडारी' इथे हम टिव्हीवर सुरु आहे सध्या. माझं होमवर्क करून झालं आता पुढचे भाग लागेल मालिका तेव्हा बघता येतील. सध्या दोन स्टोरीज पॅरलल सुरु आहेत, पुढे जाऊन कुठेतरी मिळ्तील असं वाटतंय.

दिल लगी आणि जुदाई ह्या दोन मालिका पण बघतेय. दिल लगी ला स्टोरी अ‍ॅज सच नाहीये त्यामुळे बोअरिंग वाटतेय मला. जुदाईची स्टोरी पण प्रेडिक्टेबल आहे पण तरीही उत्सुकता आहे.त्यामुळे दिल लगी पेक्षा उडारी आणि जुदाई आवडतायत मला. उडारी मध्ये सामिया मुमताज आहेच.

दिल लगी मधल्या अनमोलच्या आईचं खरं नाव काय आहे? काय काम करते ती पण. उडारीमध्ये पण चांगलं काम आहे तिचं.

इथे कुणि धूप किनारे ही पाकिस्तानी मालिका पाहिली आहे का? प्रचंड अफाट सुंदर मालिका आहे. प्रत्येक पात्र इतके सुरेख रंगवले आहे की एकही मिनिट ही मालिका रटाळ होत नाही. १९८८ वगैरेच्या सुमारास बनवलेली आहे.

Jackson Heights पाहिली. मस्त आहे. खुप आवडली. टायटल साँग तर फारच भारी आहे. सर्वच कलाकारांनी अप्रतिम काम केले आहे. मरिना खान (मिशेल) चे काम खूप आवडले. २७ च भाग.. असा ड्रामा झी / ईतर वाहिन्या का नाही प्रोड्युस करत???????

कधीतरी बघायचा मूड आणि वेळही असतो, तर फेरिहा आणि फातमागुल प्राईमटाईमला दाखवतायत! अशा डब्ड मालिका दाखवण्याचं प्रयोजन काय? जाहिरातींसाठी का?

फातमागुल अगदीच रडी सिरीयल वाटतेय. त्या सिरीयलसाठी झी जिंदगीचं सबस्क्रीप्शन घ्यावं का विचार करत होतो, नशीब नाही घेतलं ते. पैसे वाया गेले असते अगदीच. फेरिहा तर मागच्या सप्टेंबरपासून झालीये सुरु. दोन्ही टर्किश मालिका.

फातमागुल एक बलात्कारित मुलगी आहे. ड्रग्जच्या नशेत दोन तीन अतिश्रीमंत मुलांनी हे कृत्य केले. त्याचा आळ त्यांचा गावातला केरिम नावाचा चुलतभाऊ स्वतःवर घेतो. खरतर त्याने काहीच केले नाही पण हे फातमागुलला माहित नाही. गावकर्‍यांच्या भितीने फातमागुलचा भाउ तिचे लग्न केरिमशी लाउन देतो आणि दोन्ही कुटुंब शहरात शिफ्ट होतात. आता केरिमला फातमागुल आवडते आहे आणि ती त्याच्याशी बोलतही नाही.. ज्या मुलांनी हे काम केले तीसुद्धा त्याच शहरात आहेत..

आधी जरा इन्टरेस्टिंग वाटत होती पण आता खूपच फिल्मी होत चालली आहे.. पण फेरिहा छान होती Happy

jackson heights पाहिली.. खुप आवडली.. टायटल साँग कोणि गायलंय? छान आहे आवाज आणि ते गाणं, म्युझिक सुद्धा..

इथे आता जुन्या सात फेरे आणि कुठलीतरी चालू होणार आहे. सात फेरे आता सलोनी नावाने येणार आहे. मला आवडायची राजश्री ठाकूर-शरद केळकर जोडी. सुरुवातीला खूप दिवस बघितली होती मी.

पाकिस्तानी सिरीयल्स दाखवुन संपल्या का? आपल्याकडच्या जुन्या सिरीयल्स का दाखवाय्ला लागले इथे?

उत्तम अभिनय, चांगली कथा, आणि limited episodes मुळे त्यांच्या मालिका आवडत होत्या. आता आपल्याच पाणि घालुन वाढवलेल्या सिरीयल्स पहायच्या इथे पण? इतर चॅनल्स वर सुरू आहे तोच प्रकार इथे ही का सुरू केला असेल?

फेरिहा आणि फातमागुल प्राईमटाईमला दाखवतायत! अशा डब्ड मालिका दाखवण्याचं प्रयोजन काय? जाहिरातींसाठी का?>>>>

'जोडे दिलोंको' अशी टॅगलाइन आहे झी जिंदगीची. या चॅनेलवर फक्त पाकिस्तानीच नाहीत तर इतरही देशांमधल्या मालिका दाखवायचा हेतू आहे. त्यामुळे, 'फेरिहा','फातमागुल' या मालिका दाखवतात.
फेरिहाचे आता पुनःप्रसारण सुरू आहे. मी १ल्यांदा जरा पाहिली होती. नंतर नंतर एकेचीच मालिका वेगळ्यां नावाने बघत आहे असे वाटू लागले. तरी हिरोसाठी मालिकेचे बरेच भाग पाहिले होते.
'फातमागुल' विशेष पाहिली नाही.

'भागे रे मन' बघायचे बर्‍याचदा. दोन सीझन्स झाले त्याचे. छान, हलकीफुलकी मालिका होती.

मन मायल संपली एकदांची! अत्यंत रटाळ मालिका होती.
दिल लागी पण संपली..शेवटचा भाग एकदम मेलोड्रामा केला नाहीतर एकूण चांगली/ठीक मालिका झाली..संवाद मस्तच!
उडारी (पंजाबी, हिंदीमध्ये उडान) पण संपली..फारच सुरेख मालिका..बाललैंगिकशोषणासारखा इतका संवेदनशील विषय तितक्याच ताकदीने हाताळला गेला त्याबद्दल कौतुकच केलं पाहिजे. सगळ्यांची कामे सुरेख झाली. काही लूपहोल्स होते पण दुर्लक्ष करण्याजोगे.

'आता काय पाहू?' असं झालं असताना कालच दिल बंजारा चा पहिला भाग पाहिला! दिल लागी च्या लेखिका फैझा इफ्तिकार ने लिहिली आहे आणि सिराज उल हक दिग्दर्शक आहेत. सनम सईद (झिंदगी गुलझार है मधली कशफ), अदनान मलिक (सदकेतुम्हारे मधला खलील) आणि मीरा सेठी (प्रीत ना करीयो कोई मधली मरियम) असे मुख्य कलाकार आहेत! बाकी कलाकार पण जोरदार! हीना बयात (झिंदगी गुलझार है मधली फवाद खानची आई), समीना एहमद (डॉली की आयेगी बारात आणि इतर आयेगी बारात च्या मालिकेतली नानी), मुनव्वर सईद वगैरे. मला वाटलं की बेहेरोझ सब्ज्वारी पण आहेत ह्यात पण मला कलाकारांच्या यादीत कुठे त्यांचं नाव दिसलं नाही.
पहिला भाग तरी खूपच जोरदार वाटला. बघूया पुढे कशी रंगतेय ती!
पहिल्या भागाची लिंक: https://www.youtube.com/watch?v=AnEn7qSzODM

एक नुकतीच आलेली दमपुख्त अतिश्क़ ए इश्क अशा थोड्याश्या विनोदी नावाची (meaning slow cooked on the fire of love) मालिका आजच बघायला सुरुवात केली. प्रोमोवरून बरीच मेलोड्रामा वाटते आहे पण तरी पहिले दोन भाग चांगले वाटले. बघूया पुढे कशी काय वाटते ते.
दिल बंजारा मध्ये खंडीभर चुका आहेत. पण तरी बघत राहणार आहे.
बिन रोये आंसू ह्या पुस्तकावरून माहिरा खानचा बिन रोये नावाचा सिनेमा येऊन गेला. तो सिनेमा बनवतानाच त्याची त्याच नावाची मालिका देखील बनवली होती (काय आयडिया आहे!) तर ती पण सुरु झाली .आहे. स्टोरी यथा तथाच आहे पण माहिरा खान खरच छान न्याय देते सगळ्या भूमिकांना. यात जराशी नकारात्मक, पझेसिव्ह मुलगी चांगली साकारली आहे.

ती दमपुख्त मालिका चांगली चालू आहे. ५ भाग पाहीले मी. एक नंबर संवाद आहेत. संथ आहे पण तरीही कंटाळवाणी झालेली नाही. पुढे काय होणार याचा थोडा अंदाज येतो प्रोमो वरून पण कसं होणार असं वाटत राहतयं.

अंजली, मी सगळ्या युट्युब वर बघते. झी जिंदगीवर काय दाखवतात ते माहिती नाही मला. खरंतर पाकिस्तानी मालिकांवर वेगळा धागा काढता येईल पण इथे बरीच चर्चा झाली आहे म्हणून इथेच लिहिते मी पण.

सध्या जिंदगीवरची 'अगर तुम साथ हो' छान चालू आहे. हँडलिंग पाकिस्तानी मालिकांसारखं आहे. कथेत आणि संवादातही प्रॅक्टिकल अ‍ॅप्रोच असला की बघण्यातला इंटरेस्ट टिकून रहातो.

हमसफर आणि झिंदगी गुलझार है नेटफ्लिक्स वर आल्या आहेत. मी हमसफर पाहायला सुरवात केली आहे. कसला जुना टीव्ही पाहिल्यासारखा वाटतो. फवाद खान छान आहे. Happy

हमसफर आणि झिंदगी गुलझार नुकत्याच हॉलीडेस मध्ये नेटफ्लिक्स वर पहिल्या. खूपच आवडल्या. फवाद आणि पाक मालिकांची ची मी आता फॅन बनून गेले आहे, हमसफर बघताना अनेक प्रसंगी रडले पण Sad . या मालिकांची quality बघून लगेचच नेहेमी बघत असलेल्या ५ मालिकांपैकी ३ मराठी मालिका बघायच्या बंद केल्या इतक्या मराठी मालिका आता फोल वाटत आहेत. मी मराठी मालिका आपली मराठीवर बघते. माझ्याकडे देशी चॅनेल्स नाहीत. Hum TV, Z-Zindagi या वरील बाकी मालिका नेटवर कुठे पाहता येतील ?

Hum TV, Z-Zindagi या वरील बाकी मालिका नेटवर कुठे पाहता येतील ?>>>>>> यू ट्यूबवर पहाता येतील.मा.बोवरच
पाक सिरियलचे वाचून मी पहाणे सुरू केले.यापूर्वी मी देशी सिरियलही क्वचित बघत असे.पण मला पाक सिरियल आवडल्या.

@manishas, YouTube for Hum TV channel and other other Pakistani channel (geo, urdu 1, A1 etc) dramas. Don't know about Zee zindagi dramas.

दमपुख्त संपली. नेहमीच्या मालिकांपेक्षा वेगळी होती..अधिक संवेदनशील विषयावर (इस्लाम धर्म आणि त्यातील अनिष्ट चालीरीती) होती पण छान हाताळला हा विषय. जरी २७ भागांचीच मालिका होती तरी मध्ये थोडीशी रेंगाळली. मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे उच्च उर्दू!बरेचदा मधेच थांबून शब्दाचा अर्थ पाहीला मी. पण त्या उच्च उर्दू मधले संवाद ऐकणे म्हणजे एक पर्वणी आहे! अहाहा!
वोह करे बात तो हर लफ्ज से खुशबू आए
ऐसी बोली वोही बोले जिसे उर्दू आए -एहमद वासी
जरा अवघड उर्दू आहे आणि विषय गहिरा आहे त्यामुळे सगळ्यांना आवडेल असं नाही पण मला आवडली! कदाचित तुम्हालाही आवडेल!

मधे बरेच दिवस काहीच पाहण्यासारखं नव्हतं ..दिल बंजारा अगदीच वाईट चालू आहे फक्त ५ मिनिटांत अख्खा भाग पाहते मी पुढे पुढे करत (तो ही का पाहीला असं वाटतं नंतर!).
पण आजच एका नवीन मालिकेचा पहिला भाग पाहीला - फालतू लडकी (Faltu larki) चांगली वाटतेय. सामिया मुमताज आहे म्हणून अपेक्षा वाढलेल्या आहेत! बघूया ही पुढे चांगली निघते का!

PK dramas have caught me by surprised me yet another time. Quirky is the only word that comes to my mind for Faltu Larki! अशक्य महान मालिका आहे. चांगली वाईट ह्या सरळधोपट मार्गाने ह्या मालिकेचं मोजमाप करता येत नाहीये मला. सगळ्यांना आजीबात आवडणार नाही (जशी झिन्दगी गुलजार है आवडली होती). पण ही मालिका खास आहे. काही भागांत मालिका संपेल मग हिच्यावर एक लेख लिहीन असं मनात आहे.

Pages