नरेंद्र मोदी सरकारचे १०० दिवस - आपले विचार?

Submitted by रांचो on 3 September, 2014 - 06:59

२६ मे ला मोदींचा शपथविधी झाला. तो दिवस ह्या सरकारचा पहिला दिवस मानला तर आज ३ सप्टेंबर रोजी ह्या सरकारचा १०१ वा दिवस आहे. कोणीही, काहीही न सांगता मोदींनी १०० दिवसांची मुदत स्वतःच्या सरकारला घालुन घेवुन १०० दिवसांसाठी एक अजेंडा निश्चीत केला होता. त्यांच्या सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यकाळाचे मुल्यांकन विविध प्रसारमाध्यमात एव्हांना सुरु झालेले आहेच. मे महिन्याच्या अखेरी आलेल्या विविध वर्तमानपत्रातील बातम्यांच्या आधारे तो अजेंडा आपल्या संदर्भासाठी खाली देतो आहे. ह्या अजेंडयाच्या आधारे आपल्या लाडक्या मा. बो. वरही त्याविषयी साधक बाधक चर्चा व्हावी, ह्या हेतुने हा धागा उधडत आहे. चर्चा विषयाला धरुन आणि मायबोलीच्या अडमीननी जाहीर केलेल्या नवीन धोरणानुसार होइल अशी अपेक्षा करतो. माझे विचार चर्चेच्या ओघात मांडेनच.

प्रसारमाध्यमात आलेला मोदी सरकारचा १०० दिवसांचा अजेंडा:
१. उत्तम आंतर-मंत्रालयीन समन्वय. (Better inter-ministerial coordination.)
२. नोकरशाहीचा आत्मविश्वास पुन:प्रस्थापीत करणे. (Restoring the confidence of bureaucrats.)
३. सरकारी कामात नाविन्यपूर्ण कल्पनांचे स्वागत करणे. (ative ideas to be welcomed.)
४. सरकारी कामात पारदर्शकता आणणे. (Transparency in government.)
५. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते विकासावरती लक्ष केंद्रीत करणे. (Focus on education, health, water, energy and roads.)
६. लिलाव आणि इतर सरकारी संबंधित कामासाठी ई लिलावअस प्रोत्साहन देणे. (E-auction to be promoted for auction and other government related work.)
७. सरकारी धोरणामध्ये स्थिरता आणि सातत्य राखणे. (Stability and and sustainability in government policy.)
८. ठरावीक वेळेत धोरणांची अंमलबजावणी करणे. (Implementation of policy in time bound manner.)
९. जनकेंद्रीत सरकारी प्रणाली राबवणे. (People oriented system to be put in place.)
१०. तंत्रज्ञान आणि सामाजिक-माध्यमांचा वापर करुन सार्वजनिक सुसंवाद वाढवणे. (Use of technology and social media to maximise public interaction)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मोदी सरकारने कामे पूर्ण करयला सुरवात केलिय.....
आणि काँग्रेस ने ही कामे आम्ही सुरु केलि होति पण पूर्ण करायला अपयशी झालो हे ओरडुन ओरडुन कबुल करायला सुरवात केलीय.. Lol

खरे तर सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात फरक पडेल अश्या गोष्टी सहसा इतक्या वरच्या पातळीला होतच नाहीत. तरीही काही नवीन निर्णय, नवीन घोषणा वगैरे स्तुत्य वाटल्या. कोणत्याही कारणाने नेमके पेट्रोलचे भाव ह्याच दरम्यान उतरले हेही एक लक्षात राहिले.

पण आता (मायबोलीवरीलसुद्धा) विरोधक म्हणतात त्याप्रमाणे ज्या कारणासाठी काँग्रेसचा अपप्रचार केला जात होता त्यांच्याबाबत कोणतीही ठोस कृती करणे सहज शक्य नसते हे अगदी नीट समजून येत असावे नव्या सरकारला! असो, निवडून येण्यापुरता ज्या घोषणांचा आणि मुद्यांचा वापर केला ते सगळे तिथेच सोडायचे म्हंटले तर जनता कधीतरी पुन्हा इंगा दाखवेलच.

बाकी आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर फारच जास्त फोकस असावा असे वाटत राहिले ह्या सरकारचा! चांगले की वाईट हे आकलनापलीकडीलच आहे, पण फोकस खूप जास्त वाटतो इतके नक्की!

जाता जाता - मुखदुर्बळ आणि कठपुतळी पंतप्रधानांच्या तुलनेत एक खमक्या पंतप्रधान मिळाला आहे इतपत भावना नक्कीच जनमानसांत निर्माण करण्यात यश मिळवलेले आहे ह्या सरकारने!

जयहिंद!

जाता जाता - मुखदुर्बळ आणि कठपुतळी पंतप्रधानांच्या तुलनेत एक खमक्या पंतप्रधान मिळाला आहे इतपत भावना नक्कीच जनमानसांत निर्माण करण्यात यश मिळवलेले आहे ह्या सरकारने!

>>>
एकदम सहमत
आजच्या सकाळ मध्ये सोनिया आणि मनमोहन यांच्या संवाद (विनोदी लेखन) वाचन्याजोगे आहे.

@अग्निपंख : पॉप कॉर्न खात दंग्याची वाट पहात बसण्यापेक्षा आपले विचार मांडावेत, हि विनंती.

@बेफिकीरः योग्य बोललात. शंभर दिवसामध्ये कोणत्याच सरकारला फार भरीव अशी कामगिरी करता येत नसते कारण आपल्या देशातली सरकारी यंत्रणा खुपच मंद गतीने चालणारी आहे आणि आपल्याकडे लोकशाही राज्यपद्धती असल्यामुळे कोणताही निर्णय घेण्याची प्रक्रिया ही प्रचंड वेळखाऊ असते. यामुळे एखादी समस्या जाणवणे/खटकणे, त्या समस्येचा रितसर अभ्यास होवुन एखाद्या निर्णयाप्रत येणे आणि प्रत्यक्षात तसा सरकारी आदेश निघणे यामध्ये १०० दिवस सहज निघून जातात. आणखी एक ठळक जाणवणारी गोष्ट म्हणजे, देशात गेल्या पाच-सात वर्षापासून सरकारी पातळीवर दिसून येणारा धोरण लकवा निश्‍चितच संपत आहे. रोज नविन उच्चांक गाठणारा सेंसेक्स हा त्याचाच परीणाम आहे.

@संमि: गांधी आणि बुद्ध हे राष्ट्र् विभुती आहेत. भारतीय पंतप्रधान त्यांच्यापुढे नतमस्तक होणे याचा तिरकस उल्लेख धागा भरकवटेल. क्रुपया चर्चेत मौलीकभर घालावी, हि नम्र विनंती.

- सार्क देशांच्या प्रमुखांना शपथविधीला आमंत्रण
- अमेरिकेची दाढी न कुरुवाळणं
- जपानचा दौरा करुन चिन/पाकिस्तानला स्टर्न मेसेज

हे काहि परराष्ट्रधोरण संदर्भातले मास्टर्स स्ट्रोक...

रांचो म्हणाल्याप्रमणे १०० दिवस खुपच कमी आहेत मोठे बदल घडवण्यासाठी.
परवाच्या लोकसत्तेमधल्या लेखात ह्या १०० दिवसांच्या संकल्पनेचा उगम समजला. दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिकेत जेव्हा सत्तापालट झाला आणि तेव्हा तेथे विरोधी पक्ष व सत्तारुढ पक्ष ह्यांनी एकत्र येऊन देशाच्या हितासाठी पटापट निर्णय घेतले आणि झटपट कृती साठी एक आदर्श घालुन दिला. आत्त्ताच्या परिस्थितीत, विषेशतः भारतात, तसे काही होणे अशक्य वाटते.
पण स्वतःलाच असे माईलस्टोन (मराठी प्रतिशब्द सुचत नाहिये) घालुन घेणे आणि त्यावर झालेली प्रगती सर्वांसमोर ठेवणे ही न.मों ची कृती अतिशय स्वागतार्ह आहे. राज्य पातळीवरील सरकारांनी पण असे करावे.

न. मों च्या सरकारने, मुद्दे १ ते ५ व ९,१० वर कामं सुरु केल्याचं वाटत आहे. मुद्दे ६ ते ८ बद्दल काही केलेलं माझ्या तरी वाचनात आलेलं नाही.

आणि आता च पुर्ण केलेला जपान दौरा.. त्या बाहुल्या आणि बाहुल्या खेळवनार्‍या त्या बाइ पेक्शा तरि छान काम केल.

मागच्या दहा वर्षात दौरे हे फक्त पिकनीक होते..

१०० दिवस खुप कमी असले मुल्यमापनासाठी तरी निवडणुकीदरम्यान जी आशा जागवलेली त्याची थोडीफार पुर्तता होईल असा आशावाद या १०० दिवसांनी नक्कीच निर्माण केला.

खमक्या पंतप्रधान मिळाल्याबद्दल सहमत. आधीचा पंतप्रधान हा इतर मंत्र्यांच्या गर्दीतला एक मंत्री वाटायच, बॉस कोणी भलताच होता. नवा पंतप्रधान मंत्रीमंडळाचा बॉस आहे हे त्याच्या देहबोलीवरुन जाणवत राहते. सुरवातीला तो देश कसा चालवेल याबद्दल मला खुप शंका होती कारण केवळ निगेटीव गोष्टीच वाचलेल्या. पण आता ती शंका उरली नाही.

आरोग्य खात्याबद्दल एक स्तुत्य निर्णय झालेला आहे.

एड्स टीबी असे कार्यक्रम नॅकोसारख्या निमसरकारी संस्थेकडुन होत होते.
नॅको बरखास्त झालेली आहे.

सगळे कार्यक्रम आता सारवजनिक आरोग्य खात्यात येतेल.

आमचे लोक म्हणतात.. आता पगार वाढतील. आता तरी मोदीना माना. म्या म्हटलं परमनंट मोदीने केले तरी आमचं मत हातालाच.

सातीतै, एस एम ओ होणार का ?

संसदेत भरभक्कम बहुमत तरीही उरल्यासुरल्या विरोधी आणि मित्रपक्षांची मुस्कटदाबी, प्रसारमाध्यमे खिशात (उदा. ते कोणी निखील वागळे होते त्यांचे काय झाले?), कॉलेजियम नष्ट करुन न्यायसंस्थेवरही पकड आणि नोकरशाही तर कायमच सत्ताधिशांची गुलामी करायला तत्पर- १०० दिवसात लोकशाहीच्या सगळ्या नाड्या आवळणारा पुरुषसिंह हाच!