ट्रेडमिल

Submitted by नंदिनी on 29 August, 2014 - 07:35

घरीच व्यायामाकरिता ट्रेडमिल घ्यायचं म्हणतोय.

बाहेर रनिंगला जाणं मला शक्य असलं तरी नवर्‍याच्या टाईमटेबलानुसार शक्य होत नाही. भल्या पहाटे मी रस्त्यावर धावण्यासाठी गेल्यास कुत्री अतिशय त्रास देतात (कोतबो!) त्यामुळे घरीच ट्रेडमिल, योगासने आणि इतर व्यायाम असा विचार सध्या चालू आहे. "खरंच गरज आहे का?" इथपासून ते "कुठले मॉडेल घ्याव?" या सल्ल्यापर्यंत माहिती आवश्यक आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ऐकलय की नंतर फक्त कपडे वाळत घालाय्ला उपयोग होतो त्याचा Happy

त्यापेक्षा,
केदार (फिटनेस वाला Happy ) ने कुठेतरी सांगितल्याप्रंमाणे सायकल (एक्सरसाईझ बाईक) घ्या, तिचा खरच चांगला उपयोग होतो असं बर्‍याच जणांकडून ऐकलं आहे आणी मी स्वतः पण बाईक चाच विचार कर्तोय सध्या

कपडे वाळत घालायला सायकल पण तेवढीच उपयोगी पडते.

नंदिनी, मी घरी आणलेलं ट्रेडमिल असं पडून राहू देणार नाही हे स्वतः स्वतःच्या मनाशी ठरव. माझ्याकडे गेली २+ वर्षे आहे ट्रेडमिल. बर्‍यापैकी रेग्युलरली वापरते मी ते ट्रेडमिल. तुमच्याइथे 'लाईफ फीटनेस' कंपनीची मशिन्स मिळतायत का बघ. चांगली वाटली मला.

आम्ही पण ह्याच विचारानी घेतली पण नंतर ती पडून राहिली कारण -
१. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशीरा त्यावर धावल्यास होणारा आवाज घरच्या इतरांना उठवतो किंवा टिव्ही बघु देत नाही.
२. त्यावर मी किंवा पत्नी पळायला लागलो कि आमच्या १ वर्षाच्या सुपुत्रालापण तेच करायचं असे.
३. घरी पाहुणे (मुलं असलेले) येणार असले कि विषेश काळजी घ्यावी लागते कारण मुलं त्यावर काय करतील सांगता येत नाही. सरकता पट्टा असल्यामुळे एखादं मुल खेळायला जाउन पडलं तर चांगलं लागु शकतं.
४. तुमची स्वतःची मुलं खेळत्या पण अल्लड वयात असतील तर मुद्दा ३ त्यांच्या बाबतीतही अर्थात लागु होतो.
५. हे प्रकरण बरच अवजड असल्यामुळे दोन तीन लोक तरी असल्याशिवाय घरात दुसरीकडे नेता येत नाही.
६. वरील सर्व गोष्टींमुळे सुरुवातीचा उत्साह ओसरल्यावर ती न वापरण्याचीच कारणं जास्त निर्माण होत.

ती ४ महिने पडुन राहिल्यावर शेवटी विकली. वरील कोणतीही परिस्थिती तुमच्या घरी असल्यास, हे यंत्र घ्यायच्या आधी विचार करा.
हे सर्व अडथळे नसतील तर घरच्या घरी व्यायामासाठी अतिशय उपयोगी आहे. आमच्या ओळखीत एक दोन लोकांनी जरा मुलं ४ थी ५ वी मधे गेल्यावर घेतली आणि ते छान वापरतात.
नॉर्डिक ट्रॅक च्या ट्रेडमील छान असतात. तशा किंमतीला चांगल्या आणि दणकट. बघताना रनिंग बेल्ट खाली पॅडींग / कुशनिंग असेल असे मॉडेल बघा कारण अशा प्रकारच्या पळण्यामधे गुढघ्यांवर खुप ताण येऊ शकतो आणि त्यासाठी पॅडिंग असणे हाच एक चांगला उपाय आहे. बर्‍याच मॉडेल्स मधे ३२, ६४ प्रिडिझाइन्ड वर्क आऊट वगैरे जाहिरात असते. ते नक्कि इन्बिल्ट आहेत का आय फिट वरून डाऊनलोड करावे लागतील ह्याची खात्री करा म्हणजे नंतर चिडचिड होणार नाही. बरीच स्वस्त मॉडेल दिसताना हलकी आणि वापरायला सोपी वाटतात पण वापरायला लागल्यावर पटकन खराब होतात. त्यामुळे तो मोह टाळा. ह्या यंत्रावर आपण पळत असल्यामुळे ते दणकटच हवं. आणि जमत असल्यास वाढीव फॅकट्री वॉरंटी घ्या. पळण्याच्या क्रियेमधे (जर कोणी चांगलं वेगात धावत असेल तर विषेशतः) बराच इंपॅक्ट, व्हयब्रेशन्स येतात आणि काही इलेक्ट्रोनिक पार्ट मोडु शकतात.
अजुन माहिती हवी असल्यास जरून कळवा.
शुभेच्छा..

सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशीरा त्यावर धावल्यास होणारा आवाज घरच्या इतरांना उठवतो किंवा टिव्ही बघु देत नाही.
२. त्यावर मी किंवा पत्नी पळायला लागलो कि आमच्या १ वर्षाच्या सुपुत्रालापण तेच करायचं असे.
३. घरी पाहुणे (मुलं असलेले) येणार असले कि विषेश काळजी घ्यावी लागते कारण मुलं त्यावर काय करतील सांगता येत नाही. सरकता पट्टा असल्यामुळे एखादं मुल खेळायला जाउन पडलं तर चांगलं लागु शकतं.
४. तुमची स्वतःची मुलं खेळत्या पण अल्लड वयात असतील तर मुद्दा ३ त्यांच्या बाबतीतही अर्थात लागु होतो.
५. हे प्रकरण बरच अवजड असल्यामुळे दोन तीन लोक तरी असल्याशिवाय घरात दुसरीकडे नेता येत नाही.
६. वरील सर्व गोष्टींमुळे सुरुवातीचा उत्साह ओसरल्यावर ती न वापरण्याचीच कारणं जास्त निर्माण होत.>>>

चांगले मुद्दे!! पण मी वापरणार लेक शाळेत गेल्यावर. नवरा पहाटे लवकर- तेव्हा कन्यका उठलेली असेल पण मशिनमधून कसलाही आवाज येत असेल तर ती त्या खोलीतही येणार नाही. वेगळ्याच खोलीमध्ये ठेवणार असल्यानं दार बंद करून घ्यायचा ऑप्शन आहेच. इथं येणारे जाणारे फारसे कुणी नसतात. त्यामुळे इतरांच्या मुलांचा प्रश्न येत नाही.

व्यायामासाठी म्हणून याचा उत्तम उपयोग होत असेल तर घेणे जास्त इष्ट ठरेल ना?

आडो, सर्च करून बघते. माझ्यापेक्षा जास्त उत्साह नवर्‍याला आहे. कारण त्याला खरंच रोज बाहेर जाण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे तो तरी नियमितपणे वापरेलच.

नंदिनी, उपयोग करण्यावर आहे. माझ्याकडे गेले काही वर्ष ईलिप्टिकल आहे. मी तरी खुपच उपयोग केला आहे त्याचा. मला ट्रेडमिल पेक्ष्या हे जास्त आवडते. जिम मधे दोन्ही ऑपशन्स असतांना मी ईलिप्टीकलच वापरते. चौकट राजाने सांगितलेले मुद्दे आडवे येत नसतिल तर नक्की घे आणि वापर Happy पैसे वसुल होतात.

वॅक्युअम क्लीनर, ट्रेडमील, रोटी मेकर, या वस्तू माळ्यावर अधिक कार्यक्षमपणे काम करतात... ::फिदी:

पळायला जावे तर हे...

images_4.jpg

सायकलवर जावे तर हे....

images (1)_0.jpg

काय करावे ::अओ:

नंदिनी रस्त्यावर पळणे केव्हाही चांगलेच पण जमत नसेल तर ट्रेडमिल उत्तम उपाय. मात्र चौकट राजानी दिलेले मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. ट्रेडमिलवर पळताना चांगला जोरदार धाडधाड आवाज होतो. जिम मध्ये वगैरे जाणवत नाही पण घरात जाणवते. तेव्हा जर तुमच्या खाली/शेजारी इतर लोक राहत असतील तर किती आवाज येउ शकतो, त्यांना त्रास होऊ शकतो का या शक्यता तपासून घ्या.
ट्रेडमिल अवजड असते, आकारदेखील मोठा असतो तेव्हा घरात अडचण होणार नाही ना हे पण महत्वाचे.
एलिप्टिकल वा स्टेशनरी सायकलचा आवाज होणार नाही.

माझ्या घरी आहे. ती फोल्डिंग असली तरी नेहमी उघडी करून ठेवलेली असते. समोर टिव्ही आहे. यामुळे ती रोज वापरली जातेच जाते.

ट्रेडमिल घेताना मॅन्युअल घेऊ नकोस. महाबोअर होऊन त्यावर चालणार नाहीस. खूप ढींगचॅक ही नको, पण अगदी बेसिक मॉडेलही नको. एलेव्हेशन वगैरे वापरलं जाणार आहे का? हे प्रामाणिकपणे कबुल कर आणि मग एलेव्हेशन असलेली घ्यायची की नाही हे ठरव. फार ब्रॉड घेण्याची गरज नाही. सर्व्हिसिंग लागलंच तर घरी येऊन करतात ना वगैरे विचारून घे. सहसा लागत नाही.

टण्या +१. चौकट राजांनी सांगितलेले काही मुद्दे खुपच महत्वाचे आहेत. आवाजाचा तर खुपच. पळताना प्रचंड आवाज होतो. हे मुद्दे आड येणार नसतील तर नक्कीच फार उपयोगाची वस्तू आहे ट्रेडमिल.

जिम मध्ये वगैरे जाणवत नाही पण घरात जाणवते. तेव्हा जर तुमच्या खाली/शेजारी इतर लोक राहत असतील तर किती आवाज येउ शकतो, त्यांना त्रास होऊ शकतो का या शक्यता तपासून घ्या.>> नाही. घर स्वतंत्र असल्यानं आवाजाचा त्रास इतरांना होणार नाही. अवजडपणाचा प्रश्न नाही. घरमालकाने देवांसाठी सेपरेट मोठी खोली बांधली आहे. त्याचं आम्ही सध्या गोडाऊन केलंय.. तिथे ट्रेडमिल आरामात राहील. (म्हणूनच घ्यायचा विचार चालू आहे)
रस्त्यावर पळणं अनेक कारणांनी शक्य नाही. वर्षभर टंगळंमंगळं झाली तेवढी पुरे.
(रच्याकने, टण्या मला अजोजाहो का करतोय??(

मामी, मॅन्युअलचा विचारच केला नाहीये. तुझं ट्रेड्मिलचं कुठलं मॉडेल आहे?

मी मागच्या १० वर्ष झाले ट्रेडमिल वापरत आहे. काही कारणानिमित्त जर बाहेर पळु शकत नसेल तर ट्रेडमिल हा उत्तम उपाय आहे. जर जास्त पळुन गुढगे दुखत असतील तर एलेव्हेशन वापरुन वेग कमी करु शकतो. त्यामुळे एलेव्हेशन हा option असावा. मी सुरवातिला काही वर्ष एलेव्हेशन नाही वापरले पण हल्ली खुप वापरात येत आहे. प्रिडिझाइन्ड वर्क आऊट वगैरेचा जास्त उपयोग होत नाही. (Nobody can identify your comfort so most of the time it does not useful. We can always adjust parameters while we are running)

मी appartment जिम मध्ये वापरत असल्याने आवाज किती येईल त्याची कल्पना नाही.

कोणत्या वयोगटातील लोकांसाठी व्यायामाकरिता ,ट्रेडमिल अ‍ॅडव्हायसिबल आहे?...
आमच्या कडे ८० वर्ष वयाची म्हातारी माणस पण ट्रेडमिल वापरतात. फक्त वेग ३-४ किमी ठेउन तासभर चालतात. जसे वय होईल तसे वेग कमी करावा आणी duration वाढवाव.

>एलिप्टिकलचा विचार करणे> चांगला सल्ला. आम्हीपण केला होता. ट्रेडमिल विरुद्ध एलिप्टिकल असं गुगल केल्यावर काही महत्वाचे मुद्दे कळाले. आमच्या जवळच्या फिटनेस ट्रेनरनी सुद्धा तेच सांगितले ते खालीलप्रमाणे -
१. ज्या लोकांना गुढघ्याचा त्रास आहे त्यांना एलिप्टिकल चांगले कारण त्यात गुढघे कमी स्ट्रेस होतात.
२. एकाच सेटींग ला (इनक्लिनेशन, रेझिस्टन्स व वेळ) ही दोन यंत्रे वापरल्यास ट्रेडमिल वर जास्त दमायला होतं कारण ट्रेडमिल वर पळणे हे जमिनीवर पळण्याशी जास्त जवळचे आहे. त्यात जास्त शरीराला जास्त कष्ट पडतात. एलिप्टिकल वर मोटर पाय उचलायला जास्त मदत करते ह्यामुळे आपल्या शरीराचे वजन उचलुन पुढे टाकायची क्रिया कमी होते. त्यामुळेच गुढघ्यांना कमी त्रास होतो. अर्थात तेवढ्याच वेळात तुम्ही ट्रेडमिल वर जास्त कॅलरी जाळता.
३. एलिप्टिकल मधे समोरच्या बार वर हात धरले तर बर्‍याच वेळा त्यावर वजन टाकुन व्यायाम केला जातो ज्यामुळे खरा व्यायाम कमी होतो. यंत्रावर कॅलरी भरपूर गेल्याचे दिसेल कारण ते फक्त काळ आणि वेगाचे गणित असते पण त्याचा परिणाम होत नसतो व हे कळायला मार्ग नसतो.

दोन्हीपैकी एक कोणते चांगले ह्याला उत्तर नाही पण आपल्याला काय मानवते ते बघणे महत्वाचे. बाहेर पळायची सवय असल्यास, वजन कमी करायचे असल्यास, स्टॅमिना वाढवायचा असल्यास ट्रेडमिल चा विचार करावा. गुढघ्याचे, कंबरेचे त्रास असल्यास, नुसता फिटनेस ठेवायचा म्हणुन हवे असल्यास एलिप्टिकल चांगले.

वॅक्युअम क्लीनर, ट्रेडमील, रोटी मेकर, या वस्तू माळ्यावर अधिक कार्यक्षमपणे काम करतात... >> +१

माझी सायकल (एक्सरसाईझ बाईक) पडून आहे. २-३ वर्षे वापरली. पुढे बाळाची त्या आवाजाने झोपमोड होईल म्हणून वापरणे बंद केले. घरातली मंडळी आता त्यावर कपडे वाळत टाकतात ( literally). Sad

<<वॅक्युअम क्लीनर, ट्रेडमील, रोटी मेकर, या वस्तू माळ्यावर अधिक कार्यक्षमपणे काम करतात>> +११११
त्याचातला वॅक्युअम क्लीनर घरात जागा अडवून आहे . आणि दुसर्या गोष्टींबद्दल ऐकल्याने कधीच विकत घेणार नाही .
पण त्यातल्या त्यात माझ्या मते एक्सरसाईझ बाईक चांगली असावी Happy

माझ्या माहितीतल्या ज्या लोकांकडे आहे त्यापैकी कुणीच नियमीत वापरत नाही. आणि हे सगळे थ्री बिएच्के मध्ये राहतात. त्यापेक्ष घराजवळचं एक जीम शोधा.

नंदिनी, मी वापरतेय ट्रेडमिल गेली पाच वर्षंतरी.व्यायाम तर करायलाच हवा पण बाहेरची थंडी सहन होत नाही ह्या दिवसांत तरी नक्की वापरली जाते.

ट्रेड्मिल हवेशीर जागी असू द्या. व्यायाम करण्याच्या जागी ऑक्सीजन भरपूर मिळायला हवा... ह्याच उद्देशाने. ट्रेडमिलला कुठेही ठेवा. तिची काही तक्रार नसते. Happy
ट्रेड मिल इन्स्टॉल करण्यात, तिचं लेव्हलिंग हा मोठ्ठा भाग असतो आणि तो उत्पादकाच्या/विक्रेत्याच्या जाणकाराने केलेला चांगला.

मी ट्रेड मिलवर मऊ सॉक्स घालून चालते किंवा पळते... बेअरफूट च्या जितक्या जवळ जाता येईल तितकं. माझा लेक "फाइव्ह फिंगर्स" घालून रोज ५-६ कि.मी पळतो. (http://www.vibramfivefingers.com) ... ती लिन्क काही इन्सर्ट होत नाहीये)
त्याच्या ट्रेनरने सांगितलेलंच इथे सांगतेय. मलाही खूप फायदा झाला.

नंदिनी , ट्रेडमिल मी सहसा वापरल नाही .
पण मी स्वत: व्यायामाची सायकल गेली ३ वर्षे वापरतोय . त्यातली पहिली २ वर्षे धुणे वाळत घालण्यासाठी अन गेल १ वर्ष व्यायामासाठी Happy
मला स्वतःला तरी तिचा प्रचंड फायदा झाला , तिच्यामुळे मला व्यायामाचा अश्श्युरन्स मिळतो . दिवसभर काही नाही झाले तरी रात्री १० ला मी १ तास कुणालाही (स्वतः सह ) फारसा त्रास न होता व्यायाम करू शकतो .
त्यामुळे जर व्यायामाची इच्छा असेल तर जरूर घ्या . तिचा वापर कशासाठी करायचा हे नंतर तुम्हीच ठरवाल Happy

इब्लिस "वॅक्युअम क्लीनर" घेणार आहत का ? कितीला पाहिजे ?
रोबिन हूड बर झाल क़्विकर च लिहिलत ते . माझ्या लक्षातच आलं नव्हत Happy

मी गेली ८ वर्षे वापरतीये ट्रेडमील. याशिवाय ईलिप्टिकल, आणि स्टेशनरी बाईक सुद्धा. ( अ‍ॅब प्रो पण आहे एक... Wink ) महत्त्वाचा रूल म्हणजे या सगळ्या वस्तु टिव्ही समोरच असाव्यात.

ट्रेडमीलच्या आवाजामुळे टिव्ही चा पण आवाज खूप मोठ्ठा ठेवावा लागतो आणि तरिही स्वतःलाच तो नीट स्पष्ट ऐकु येत नाही. यावर मी शोधलेला उपाय म्हणजे कॉर्डलेस हेडसेट. प्रोमेट चा ७-८ हजारात येतो पण याचेच चायनीज भावंड अवघ्या ५०० मधे येते आणि उत्तम काम करते.

नंदिनी - माझ्याकडे ट्रेडमील नाही पण सायकल आहे... बाहेरची मुल आणि माझी मुलगी यांनी त्याच खेळण करुन टाकल. Automatic च maual मधे convert झाल खेळापायी.

वाक अ‍ॅट होम चा विचार केलास का?

माझ्याकडे गेली आठ वर्ष नॉर्डिक ट्रॅकचं एलिप्टिकल आहे. पसारा ट्रेडमिलसारखाच आहे. पण व्यायामाशिवाय बाकी गोष्टींकरता उपयोग करत नाही. इथल्या थंडीत बाहेर जाणं शक्य नाही तेव्हा आणि एरवीही माझी भिस्त त्यावरच असते.

स्वर, वॉक अ‍ॅट होम जमत नाही. Sad

स्वरा, तुझं घरगुती जिमच झालं की :). मला हे धूड टीवीसमोर नसलं तरी चालेल. कानात बोळे घालून ऑडिओ बूक्स ऐकायची सवय आहेच.

तुर्रमखान, घराच्या आसपास १० किमीच्या परिसरामध्ये जिम नाही. Sad त्यामुळेच तर ट्रेडमिलचा विचार चालू आहे.

सर्व सूचना लक्षात घेता, अ‍ॅफ्टोन ब्रॅन्ड ठरवलाय, नेटवर त्याचे फीचर्स नीट समजत नसल्यानं एखाद्या वीकेंडाला चेन्नईला जाऊन विकत घेण्याचा विचार चालू आहे.

चेन्नईला जाऊन विकत घेण्याचा विचार चालू आहे>>> त्या आधी चांगल्या कंडिशन मधे असलेली एखादी सेकण्डहॅण्ड मिळते का ते नेट वर पहा, नाहीच मिळाली तर नवी घ्या, उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा!

Pages