पाकिस्तानला उत्तर

Submitted by बेफ़िकीर on 24 August, 2014 - 09:00

टीप - हा एक राजकीय धागाच आहे. मायबोलीवर अनेक प्रकारचे राजकीय धागे अस्तित्वात असताना व जोरात चालू असताना हा आणखी एक धागा का असावा? ह्याचे उत्तर हे की सगळ्या जगात जे मोदी सरकार हिंदूत्ववादी असल्याच्या समजामुळे अस्वस्थता किंवा इतर कोणतीही भावना निर्माण झाली आहे, त्या मोदी सरकारच्या अस्तित्वाने बिथरलेल्या पाकिस्तानने उघड हल्ला केलेला आहे. ह्याशिवाय, निषेध व्यक्त करणे, अद्दल घडवू असे म्हणणे, आंतरराष्ट्रीय समुदायाला दखल घेण्यास भाग पाडणे हे सर्व पारंपारीक उपाय बाजूला ठेवून मोदी सरकारने भारतीय सेनेला 'योग्य वाटेल ती कृती करण्याचे' आदेश दिलेले आहेत. परिणामतः, शौर्याच्या भावनेने सळसळलेल्या जवानांनी जोमदार प्रत्युत्तर देणे सुरू केल्याच्या बातम्या येत आहेत.

==============================================

विषारी सापाचे खरे रूप कधी प्रकट होणार हाच जणू प्रश्न होता. पाकच्या सर्वोच्च नेत्याला आपल्या शपथविधीला बोलावण्यातील नावीन्यावर जगभर चर्चा घडवून आणणारे मोदी मुळात हिंदूत्ववादी असल्याने पाकिस्तानला त्यांचे नेतेपदी असणे फार काळ सहन होणार नाही असे वाटत होते. त्याचाच परिपाक बासित ह्यांनी फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्यात झाला. ही कुरापत एक लक्षण होते चवताळलेल्या सापाच्या आगामी कृतीचे! पाकशी चर्चा रद्द करण्याचे आदेश भारत सरकारने दिले आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या साक्षीने सापाच्या शेपटीवर पाय ठेवला. हा निर्णय निराशाजनक आहे वगैरे मुक्ताफळे जगभरातील नेते उधळत असतानाच पाकिस्तानने बॉर्डरवर हल्ला सुरू केला व निरपराध भारतीय नागरीक मारले गेले.

पण ह्यावेळी, आपापसातील सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून प्रखर राष्ट्रप्रेमाच्या भावनेचे तुषार मनात उडावेत असे काहीतरी घडले.

संरक्षण मंत्रालयाने भारतीय जवानांना 'योग्य वाटेल ती कृती करा' असे खुल्लेआम 'गो अहेड' दिलेले आहे.

युद्ध बाजूलाच राहो, साध्यासाध्या कुरबुरीही अनेक प्रकारे महागच पडतात हे सर्वमान्यच आहे. पण कधी ना कधी इंगा दाखवणेही अतिशय महत्वाचे आहे. आशा आहे की पाकला ह्यावेळी लवकरच अद्दल घडेल आणि अक्कल येईल.

जय हिंद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या घटनांचा मोदी सरकारच्या हिंदुत्ववादाशी संबंध नाही. पाकिस्तानात सैन्य आणी नागरी सरकार यांचा संघर्ष हे मुख्य कारण आहे. पाकिस्तानात कधी नव्हे ते निवडून आलेल्या सरकारने पाच वर्षे पूर्ण केली, निवडणूका झाल्या आणी नवे सरकारही आले. त्यामुळे सैन्याचे महत्व कमी झाले की काय असे सैन्याला वाटते. भारत पाक संबंध सुधारले तर आपले महत्व अजूनच कमी होईल या भीतीने हा गोळीबार सुरू आहे. नवाझ शरीफ शपथविधीला आले तेव्हाही सैन्याने त्रागा केला होता.

पाकिस्तानचे प्रतिनिधी फुटिरतावाद्यांशी नेहेमीच चर्चा करतात त्यात नवे काही नाही.

सीमेवर अशा चकमकी घडत असतात. त्यांनी आपले दोन मारले तर आपण त्यांचे चार मारतो. घरापासून दूर सीमेवर रात्रदिवस पहारा देणार्‍या सैनिकांच्या उद्वेगाला एक outlet valve इतकेच. त्यात राष्ट्रप्रेमाचे तुषार वगैरे कशाला?

आशा आहे की पाकला ह्यावेळी लवकरच अद्दल घडेल आणि अक्कल येईल हाही आशावाद भाबडाच आहे. पाकी जनरल्स च्या दृष्टीने सीमेवरील सैनिक आणी नागरिक हे cannon fodder आहेत. काही सैनिकांच्या किंवा नागरीकांच्या मृत्यूने त्यांचे मत परिवर्तन होईल असे वाटत नाही.

बोलणी रद्द करायला नको होती. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी.

कुर्दिश लोकान्ची विना कारण कत्तल आणी शेजारी ईराण शी भान्डण या दोन गोष्टी सोडल्या तर सद्दाम हुसैन यान्चे बाकी कुणाशीही वैर नव्हते. ( निदान माझ्या माहितीप्रमाणे तरी, चूकत असेल तर दुसर्‍यानी दुरुस्ती सुचवा) पण आय एस आय,( मिलीटरी ) तालीबान या सन्घटना या दहशत पसरवण्यातच फेमस आहेत. उगाच कुरापती काढुन तेढ माजवणे हाच यान्चा पर्मप्रिय उद्योग.

अमेरीकेला तेल हवेय, बाकी काही नाही. सद्दामला मारुन आणी इराकला उध्वस्त करुन त्यानी चान्गलेच शिव्याशाप ओढवुन घेतलेत. आता ईराणवर डोळा आहे.

चाल्लाय धुमाकुळ.

पाकिस्तानात सैन्य आणी नागरी सरकार यांचा संघर्ष हे मुख्य कारण आहे. पाकिस्तानात कधी नव्हे ते निवडून आलेल्या सरकारने पाच वर्षे पूर्ण केली, निवडणूका झाल्या आणी नवे सरकारही आले. त्यामुळे सैन्याचे महत्व कमी झाले की काय असे सैन्याला वाटते. भारत पाक संबंध सुधारले तर आपले महत्व अजूनच कमी होईल या भीतीने हा गोळीबार सुरू आहे. नवाझ शरीफ शपथविधीला आले तेव्हाही सैन्याने त्रागा केला होता. >>>

कुठल्याही देशाचे लष्कर आणि सरकार हे त्या राष्ट्राचा भाग असते. एकाच देहाचे दोन महत्वाचे अवयव. पाकिस्तानच्या बाबतीत हातांनी पायांवर कुरघोडी करायला बघितल्यासारखं झालं आहे. सगळ्या अवयवांवर योग्य नियंत्रण ठेवणारा मेंदू मिसिंग आहे तोपर्यंत पाकिस्तानचं काहीही होऊ शकत नाही.

आनंदी असण्याचे निकष सापेक्ष असतात.
हे सुभाषित म्हणून पाठ करावे. जमल्यास आचरणात आणावे.
हे जग आनंदाने भरलेले आहे, इथे नाही तर तिथे कुठेतरी मिळेलच. शोधत रहा नक्की सापडेल. अनुभवाचे बोल.

असेल हिंमत तर सुनावा ना की जो पर्यंत पाकच्या कुरापती बंद होत नाहीत तोपर्यंत एकाही पाकिस्तानी खेळाडूला किंवा कलाकाराला भारतात येण्यासाठी व्हिसा मिळणार नाही म्हणून....
हिंमत असेलहि, पण दोन कारणे -
काही लोक जे संगीत, कला किंवा खेळावर इतके प्रेम करतात की त्यांना राजकारणाचा विचार नसतो.
काही लोकांना मनापासून खात्री पटली आहे की खेळ, कला, व्यापार यातून पाकीस्तान्यांचा भारत विरोध कमी होईल नि शत्रूत्व नाहीसे होईल.
आता भारतात व्यक्तिस्वातंत्र्य आहे, मतस्वातंत्र्य आहे. शिवाय सरकार लोकशाही आहे, हुकुमशाही नाही.
आता बहुमताने जर संसदेने ठरवले की पाकीस्तान हे शत्रू राष्ट्र म्हणून घोषित करावे तर आपोआप कायद्याने या सर्वाला बंदी घालता येईल.
तोपर्यंत एकच मार्ग - अश्या व्यापार, कला खेळ यांच्यावर स्वमताने बहिष्कार. म्हणजे पैसे मिळणे कमी झाले की असले उद्योग आपोआप बंद पडतील.
उदा. टाटाने पाकीस्तान शी व्यापार करायला साफ नकार दिला होता. पाकीस्तानात क्रिकेट खेळायला परदेशी संघ जात नाहीत, आय पी एल मधेहि फारसे पाकीस्तानी दिसत नाहीत.

सद्दाम हुसैन यान्नी पण सन्शय वाढेल असेच वर्तन ठेवले होते,
कुणाला संशय आला होता? संशय आला की टाक बाँब त्या देशावर असे असते का? इराकवरील हल्ला या विषयात सरकार, विरोधी पक्ष, सल्लागार या लोकांचे कसे साफ चुकले होते हे आजकाल इथे सांगितले जाते. पुरावे खोटे होते हे तेंव्हाहि इतर राष्ट्रांना माहित होते, पण इराकबद्दल कुणालाच फारसे प्रेम नव्हते, नि अमेरिकेला विरोध करण्याची तेंव्हा तरी कुणाची टाप नव्हती.

काहीच नसताना उगाचच खुप काही आहे असा आव आणला होता.
नुसता आव आणणे यात काय वावगे आहे? भारतीय लोक नाही का आव आणत आम्हाला सगळे समजते, आम्ही काँप्युटर मधे तज्ञ आहोत, आमची संस्कृती उच्च आहे वगैरे!
काँप्युटर क्षेत्रातले शष्प भारतात शोधून काढलेले नाही, इतरांनी शोधून काढलेल्या गोष्टी थोड्याफार समजल्या नि स्वस्तात काम करतात म्हणून उगीचच आमच्यामुळेच अमेरिका चालते असा आव आणतातच की.
नि संस्कृती तर इतकी उच्च - बलात्कार काय, लाचलुचपत काय, कायदे तोडणे काय, नुसती धमाल!

पाकिस्तानला उत्तर बाफवर अमेरिका आणि भारताला शिव्या!
झक्की, जो देश तुम्ही सोडला त्याबद्दल प्रेम नाही ज्या देशात सध्या रहाता त्याबद्दल आदर नाही.
अगदी साधुअवस्थेला पोचलाय तुम्ही.
Wink

Proud

गूड न्यूज गाईज गूड न्यूज ...

पाकिस्तानला उत्तर देणारे मोदी सरकारचे मेसेज व्हॉट्सपवर फिरू लागलेत. !!!

Internet वरच फिरणार ते प्रत्यक्षात बोलताना साडी आठवते त्यांना

Proud

लाहोर भारतात आले का?

काल बातमी होती पाकिस्तानच्या गोळीबारीमधे दोन जवान शहीद.
फक्त आपण त्यांचे २० पाकडे ठार केले ती बातमी छापली गेली नाही वाटते.

पाकिस्तानला उत्तर देणारे मोदी सरकारचे मेसेज व्हॉट्सपवर फिरू लागलेत.

धन्य, धन्य.
आता अहिंसात्मक मार्गाने उत्तरे.
पण जास्त कडक उत्तरे नकोत हां. हो, शाब्दिक हिंसा व्हायची.

पाकीस्तानकडे व्हाट्स अ‍ॅप नसेल तर? किंवा त्यांनी मोदीचे संदेश वाचायचेच नाहीत असे ठरवले तर?

झक्की, जो देश तुम्ही सोडला त्याबद्दल प्रेम नाही ज्या देशात सध्या रहाता त्याबद्दल आदर नाही.

जिथे अत्यंत बावळटपणा, अन्याय चालतो तिथे देशप्रेम म्हणून टीका करायची नाही का? साधू होण्याचा काय संबंध? मुळात ज्याबद्दल प्रेम, किंवा आस्था असते तिथेच लक्ष घातल्या जाते. इतर देशांबद्दल लिहीत नाही मी.

ही मायबोली आहे - इथे चांगले काय ते गवताच्या गंजीत सुई शोधण्याइतके कठीण. तिथे कचरा, टीका, शिव्याच दिसणार. देशप्रेम, भूतदया घरी!

हो. आता प्यान्ट घालणार आहेत.

तोही खाकी किंवा निळा !

अबबबं ! बहुजनहो संभाळा ! निळा रंग संघ घेणार म्हणे.

नेपाळच्या राज्यघटनेच्या प्रश्नात नाक खुपसायची सरकारला काहिही गरज नव्हती.परराष्ट्र धोरणाच नव्हे तर संपुर्ण राज्यकारभाराच्या नावाने बोंब आहे.

शिवाय पाकीस्तानला उत्तर या धाग्यावरमात्यबोली वरचे लोक नेपाळबद्दल का बोलत आहेत?

असे करतात, मग कॉपरमाईन यांना राग येतो. नि ते प्रशासकांना छळतात - ९ पाने वाचायची ही शिक्षाच नव्हे का प्रशासकांना, विशेषतः ९ पैकी साडेआठ पाने म्हणजे शिमगा!

अहो प्रेमकथेवर सिनेमा बनवायचा म्हटला तरी त्यात राग लोभ द्वेष दाखवतात कि नाही ? की तीन तास फक्त प्रेम एके प्रेम दाखवतात ? लोक कंटाळून झोपणार नाहीत का ? त्यामुळं पाकिस्तानच्या बाफवर नेपाळ येणारच. याकूब नाही का पाकिस्तानमधून नेपाळमार्गे आला होता. त्याला का नाही विचारले कि तू थेट का नाही आलास ? लोक तर चीन, जपान असं करत करत अमेरिका , दुबई आणि नंतर पाकि स्तान असेही जातात. कुणी थेट जातात. कुणी विदाऊत व्हिसा जातात. मग त्यावर सिनेमा बनतो.

आपल्याकडुन हजारो कोटी घेउन नेपाळ आपल्यावरच डाफरतोय. सरकारकडे याच्यावर उत्तर काय?

नेपाळने असे का केले हे आपल्या सरकारला कसे माहित?
खुद्द आपल्याच सरकारात काय होत आहे हेहि आपल्या सरकारला नक्की माहित नसावे.

तुमच्यासारख्या विद्वान लोकांनाच ते माहित.

नेपाळच्या राज्यघटनेच्या प्रश्नात नाक खुपसायची सरकारला काहिही गरज नव्हती.परराष्ट्र धोरणाच नव्हे तर संपुर्ण राज्यकारभाराच्या नावाने बोंब आहे.

अहो असे काय म्हणता? तिथे जे काय करतात त्याचा आपल्या बिहारवर परिणाम होतो ना. त्यातून आ़जकाल चीनचेहि प्रस्थहि तिथे वाढते आहेच. म्हणून नाक खुपसायचे.

एक इंदिरा गांधी नावाची शहाणी व मर्द बाई होती. बांगलादेशात असेच चालू झाल्यावर तिने तिथे नाक खुपसले. मग जरा तिथल्या लोकांचा उपद्रव कमी झाला.

आणि राज्यकारभाराच्या नावाने बोंब असतेच. काश्मीर यूनो त नेणे काय, हिंदीचिनी भाइ भाइ काय, तिबेटचे प्रकरण काय, भाषावार प्रांतरचना काय, संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न काय, नि गेल्या दहा वर्षातली लाचलुचपत काय, जे थोर लोकांनी पूर्वी केले तेच आता चालू आहे. पूर्वी इतरांनी नावे ठेवली आता जरा तुम्हाला पण संधि.

Pages