पोस्ट-मॉर्टम/अ‍ॅटॉप्सीबद्दल माहिती हवी आहे

Submitted by हर्ट on 22 August, 2014 - 13:22

मला पोस्ट-मॉर्टम/अ‍ॅटॉप्सीबद्दल माहिती हवी आहे. पोस्ट-मॉर्टम आणि अ‍ॅटॉप्सी ह्या दोन्हीचा एकच अर्थ होतो का? भारतामधे जेंव्हा एखाद्या व्यक्तिचे शव पोस्ट-मॉर्टमला दिले जाते तेंव्हा दोन प्रकारचे रीपोर्ट निघतात हे खरे आहे का? एक रिपोर्ट साधारणतः एखाद महिन्याने मिळतो आणि एक "व्हीसरा" रिपोर्ट असतो तो मिळायला सहा महिने लागू शकतात. "व्हीसरा" मधे त्या व्यक्तिच्या शरिराचे काही भाग मोठ्या दवाखान्यात पाठविले जातात. हे बरोबर आहे का?

शेवटचे, पोस्ट-मॉर्टम आणि अ‍ॅटॉप्सी दोन्ही कुठल्याही शासकिय दवाखान्यात केल्या जातात का?

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी,

पोस्ट मॉर्टेम आणि अ‍ॅटॉप्सी हे दोन्ही समानार्थी शब्द असले तरी त्यात किंचीत फरक आहे.

पोस्ट मॉर्टेम या शब्दाचं मूळ लॅटीन आहे. याचा अर्थ व्यक्तीच्या मृत्यूनंतरची सर्व व्यवस्था. व्यक्ती जर हॉस्पीटलमध्ये मरण पावली असेल तर त्याला लावलेली उपकरणं (उदा. व्हेंटीलेटर वगैरे) काढणं, मृतदेह वैद्यकीयदृष्ट्या तपासून मृत असल्याचं जाहीर करणं याचा पोस्ट मॉर्टेममध्ये समावेश होतो.

अ‍ॅटॉप्सी म्हणजे व्यक्तीच्या मृत्यूचं कारण जाणून घेण्यासाठी मृतदेहाची केलेली शास्त्रीय तपासणी. हा मूळ ग्रीक शब्द आहे. अ‍ॅटॉप्सीमध्ये व्यक्तीच्या मृत्यूच्या शरिरातील अंतर्भागांचा अभ्यास करुन नेमक्या कोणत्या कारणामुळे मृत्यू आला याचा शोध घेतला जातो. अ‍ॅटॉप्सीसाठी मृतदेहाची तपासणी करताना ऑपरेशनप्रमाणे देहावर 'कट' घ्यावा लागतो.

भारतात पोस्ट मॉर्टेम आणि अ‍ॅटॉप्सी हे दोन्ही शब्द समानार्थीच वापरले जातात.

अ‍ॅटॉप्सी करतानाही मृत्यूचं सकृतदर्शनी कारण दिसून न आल्यास मृतदेहाचा व्हिसेरा पुढील तपासणीसाठी काढून ठेवला जातो. हा व्हिसेरा म्हणजे शरिरातील एक अथवा अनेक अवयवांचा काही भाग अथवा काही प्रसंगी संपूर्ण अवयव असू शकतो.

सामान्यतः अ‍ॅटॉप्सीचा रिपोर्ट एका दिवसात येतो. (माझ्या आईच्या बाबतीत स्वानुभव). व्हिसेरा तपासणीचा रिपोर्ट येण्यासाठी अधीक कालावधी लागू शकतो.

(मी या विषयातील तज्ञ नाही. एखाद्या डॉक्टरांना संपर्क केल्यास ते अधीक तपशिलवार माहीती देऊ शकतील).

इथे अधिक माहिती मिळेल.
व्हिसरा नव्हे, व्हिसेरा म्हणत असू आम्ही. Viscera. त्याबदलची अधिक माहिती इथे आहे.