मैत्री तुझी माझी

Submitted by आनंद राजगोळे on 2 January, 2009 - 10:23

! मैत्री तुझी माझी !

मैत्री तुझी माझी
असावी फुलासारखी
शेवटपर्यंत सुगंध देणारी ,
तशीच ती फुलपाखरासारखी
मनसोक्त गंध लूटणारी ....!!

मैत्री तुझी माझी
असावी पाखरासारखी
सतत मुखी राहणारी,
मुखी राहुनही
खुप काही बोलणारी ....!!

मैत्री तुझी माझी
असावी धुक्यासारखी
क्षणापूरतीच गारवा देणारी ,
तशीच ती दवासारखी
अंगावर थंड पांघरुण जाणारी ....!!

मैत्री तुझी माझी
असावी सावलीसारखी
सतत विसावा देणारी ,
तशीच ती मनाला
शांत करून जाणारी ..!!

मैत्री तुझी माझी
अशीच असावी
सुखा दु:खात साथ देणारी
सुखात तुझी आसवे असावीत
तर दु:खात माझे अश्रू असावेत ....!!

आनंद राजगोळे

गुलमोहर: 

छान. सुखात तुझी आसवे आसवीत
तर दु:खात माझे अश्रू आसवेत

सुंदर.

अशीच एक मेलमधून २ वर्षांपूर्वी ' मला मैत्री अशी हवी' अशा टाइप एक कविता आली होती (बहुधा तुमचीच असावी) आणि त्याला मि लगेच एक प्रतिसादात्मक कविता दिली होती- मेल पाठवण्या व्यक्तिला ; ती माझ्या संग्रहातून मिळाली तर इथे लिहिन.

आनंदा, मस्त रे. फक्त शुद्धलेखनाकडे थोडे लक्ष असु दे...

उदा. आसवीत (असावीत) आसवेत (असावेत) राहूणही (राहुनही) पांगरूण (पांघरुण) आसवे (आंसवे)

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

धन्यवाद विशाल ....अभारी आहे.... मी शुद्धलेखनाकडे लक्ष देईन...

सुंदर ...
मैत्री तुझी माझी
शरीर माझं सावली तुझी.

नमस्कार्. सुप्रभात.....

मस्तच छान!.......आवडली

मी खुप खुप आपला आभारी आहे.

योगीता, रामदास, बाळू, शिवा ......

आपण माझी कविता येवढ्या मनपुर्वक वाचलीत.

आपला मनापासून आभारी आहे.

धन्यवाद!

ऑक्टोबर २००५ मध्ये लिहिलेली -

(मला वाटते मैत्री कशी नसावी पहिले कडवे मेल आलेली
आणि त्याला प्रत्युत्तर मैत्री कशी हवी हे मला सुचलेले).

मैत्री..
नको फुलासारखी, शंभर सुगंध देणारी
नको सुर्यासारखी सतत तापलेली
नको चंद्रासारखी, दिवसा साथ न देणारी
मैत्री हवी-
अश्रूसारखी, सुखदु:खात समान साथ देणारी !

मला मैत्री हवी..
फुलासारखीच, सदैव दरवळणारी
सुर्यासारखीच अंधारातून प्रकाशाकडे नेणारी
चंद्रासारखीपण, सतत आसपास अन
नकळत स्नग्धता देणारी
सावलीसारखी तर हवीच हवी
गूपचूप गूपचूप आधार देणारी
मैत्री हवी मला आनंदाअश्रूंची
परदु:खामध्ये विरघळण्याची..

धन्यवाद. मैत्रीची पुन्हा आठवण करून दिल्याबद्दल.

..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..