स्वामीनारायण मंदिर Robbinsville

Submitted by जीएस on 19 August, 2014 - 17:22

Robbinsville ला नव्या स्वामीनारायण मंदिरात जाऊन आलो. १६२ एकरावर वसलेले हे जगातले सगळ्यात मोठे स्वामीनारायण मंदिर असणार आहे. दिल्ली आणि अहमदाबादचे किती सुंदर आहे ते तिकडे जे जाऊन आले आहेत ते जाणतातच.

सगळे बांधकाम २०१७ मध्ये पूर्ण व्हायचे आहे. पण जेवढे झाले आहे ते अतिशय सुंदर आहे. एका भागाचे उद्घाटन १० ऑगस्ट ला झाले. देवळाचे संगमरवरावरचे कोरीव काम तर अफाट आहे. आणि हे मुख्य मंदिर नाही. ते अजून व्हायचे आहे. landscaping पण मस्त होत आहे. सध्या एक छोटा तलाव, कारंजे, संगरवरी कमानी आहेत. देवळात मुर्ती, त्यांचे कपडे, दागिने अतिशय टेस्टफुली डिझाईन केले आहेत. आम्ही गेलो त्या दिवशी अक्षरशः शेकडो स्वयंसेवक हसतमुखाने राबत होते. पार्किंगपासून देवळात यायला ज्येष्ठ नागरिकांसाठी बॅटरी ऑपरेटेड कार्टची व्यवस्था होती.

मला भोजनव्यवस्था फार आवडली. मसालेदार बटाटा भजी झकास! फराळी मिसळ, पुरी भाजी चा प्रसाद, नमकीन ची पॅकेट्स, मिठाई, रोझ लस्सी आणि अजून बरेच काही चांगले पदार्थ होते. साबुदाणा टिक्कीही चांगली होती मात्र चवीला दीपची वाटत होती. चटण्या छान होत्या. इतर दिवशी उपवासाचे सोडून बाकीचे पदार्थही मिळत असावेत. पाणीपुरी, सामोसा वगैरेरे पाट्या दिसल्या.

आम्ही गेलो तेंव्हा गोकुळाष्टमी चा कार्यक्रम असल्याने दहा एक हजार माणसे जमली होती, निवांत दिवशी गेलात तर खूप छान वाटेल.

कोणी जाऊन आल्यास सविस्तर लिहा / फोटो टाका. आतले घेता येणार नाहीत. पण बाहेरचे टाकता येतील.
इथे काही फोटो आहेत. हे बघाच... http://www.baps.org/Photos/2014/Mandir-Moods-8481.aspx?mid=61344

http://www.baps.org/News/2014/Mandir-Mahotsav-2014-BAPS-Shri-Swaminaraya...

http://www.baps.org/Global-Network/North-America/Robbinsville.aspx

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!
आम्हीही गोकुळअष्टमीला मेलबर्न मधील स्वामीनारायण मंदिरात गेलो होतो. अतिशय सुंदर बांधकाम असलेल हे मन्दिर त्यातील सुबक आणि कलात्मक पद्धतीने सजवलेल्या मुर्तींमुळे फारच भावत.
स्वयंसेवक खुप आनंदाने काम करत असतात. प्रसादाची व्यवस्था पण छान असते. कुठेही गोंधळ, आरडाओरडा, गैरशिस्त, अस्वच्छता दिसत नाही. मंदिरात गेल्यावर एक प्रकारची मन:शांती मिळते. त्यामुले शक्य तेव्हा वीक एण्ड ला तिथे जान्याकडे आमचा कल असतो.

येथे स्त्री पुरुष यान्ना समान मानले जाते ? वागवले जाते? या मन्दिरात स्त्रियान्ना प्रवेष नसतो, त्नान्ना कमी दर्जाची वागणुक मिळते असे मी एकले आहे, यात कितपत तथ्य आहे?

तेलगु, तमिळ, गुजराथी, पंजाबी, UP वाले लोकांनी त्यांची मंदिरे बांधली आहेत. त्यांची म्हणजे काय , तर managing commitee , मेजर डोनर हे "ते" असतात. मंदिरे हि हिंदू देवतांचीच असतात पण "त्यांचा" ठसा जाणवून येतो. कलिफ़ोर्निय चा कोकण झालाय. हजारो मराठी लोक तिकडे गेले आहेत इत्यादी बातम्या आपण नेहमीच वाचत असतो. मग मराठी लोकांचे असे एक तरी मंदिर आहे का अमेरिकेत ??

मस्त Happy

मग मराठी लोकांचे असे एक तरी मंदिर आहे का अमेरिकेत <<< मराठी लोक मंदीर बांधत नाहीत.... Proud

फिलाडेल्फियाला असलेल्या भारतीय मंदिरात तिथल्या मराठी मंडळाचीही भागिदारी आहे...

या विषयावर अजून बरेच काही लिहीण्यासारखे आहे पण ते वादाला कारण होईल....

मला भोजनव्यवस्था फार आवडली. ........ पाणीपुरी, सामोसा वगैरेरे पाट्या दिसल्या.

वा, वा. लै ब्येस.
आता ते जगातले सर्वात मोठे असो, उत्तम कोरीव काम वगैरे राहू दे बाजूला. केवळ खाण्यासाठी तरी गेले पाहिजे.
इथल्या ब्रिजवाटरच्या देवळात मुख्यतः डोसा इडली या पदार्थांसाठी जातो. बाकी देव पहायला देवळात कशाला जायला पाहिजे? शोधीसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी!!

सायो, तिकडेच एखाद्या कोपर्‍यात बस्तान बसवायचे. भरपूर जागा आहे. हाहाहूहू ऐकून कोणी विचारायला आलेच तर झक्कीबुवाजींचा हास्यसत्संग चालू आहे असे सांगता येईल.

Happy

मी ह्युस्टन मधलं बघितलं होतं .. आणि हल्लीच दिल्लीचं अक्षरधाम बघून आले ..

मी फारशी धार्मिक नाही पण मला सगळ्यात काय भावलं ते ह्या मंदिरात असलेली सुव्यवस्था, स्वच्छता .. त्यांची व्यवस्था इतकी चोख आहे की तिकडे जाणार्‍या लोक बहुदा फारसा ताप न होता आपसुक नेमून दिलेल्या शिस्तीत वागत असावीत त्यांच्या परीसरात असताना ..

ह्युस्टन ला पहिल्यांदांच स्वामी नारायण मंदिर बघून "अबब! केव्हढा हा खर्च, तेही मंदिरासाठी .. ह्यापेक्षा दुसर्‍या एखाद्या 'चांगल्या' कॉज् साठी नाही का हा पैसा वापरता येणार" अगदी असाच पहिला विचार आला डोक्यात .. मंदिरा चं सौंदर्य बघता क्षणी आवडलेलं होतं तरी ते ऐश्वर्य बघून खरंच असं आवजवी असण्याची गरज आहे का असा प्रश्न पडला ..

मग त्यानंतर ८-९ वर्षांनीं दिल्लीतलं अक्षरधाम बघितलं .. परत एकदा तिथलं सौंदर्य, कला, ऐश्वर्य बघून डोळे दीपले .. पण त्यापेक्षा जास्त तिथली व्यवस्था बघून प्रभावीत व्हायला झालं .. आपल्या लोकांत अशी शिस्त कुठल्या का उद्देशाने अंगी बाळगली जात असेल तर सो बी इट असं वाटलं ह्या वेळेला ..

दिल्लीच्या अक्षरधाम मध्येही खाण्या-पिण्याची अतिशय चांगली सोय आहे आणि बर्‍यापैकी वाजवी दरात .. चाट, पावभाजी, थाली, डोसा, पिझ्झा, सँडविचेस्, एगलेस पेस्ट्रीज् , बंगाली मिठाई, आईस्क्रीम्स् असं सर्व काही मिळतं त्यांच्या फूड कोर्ट मध्ये ..

(बहाई टेम्पलला ही परत जाणं झालं .. तोही परीसर असाच देखणा आणि उत्कृष्ट रीतीने मेन्टेन केलेला आहे .. )