Submitted by नाना फडणवीस on 19 August, 2014 - 09:21
मला सोप्प्या विविध उकडी बद्दल माहिती हवी आहे.....तांदुळ, गहु पीठ, ज्वारी ई.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला सोप्प्या विविध उकडी बद्दल माहिती हवी आहे.....तांदुळ, गहु पीठ, ज्वारी ई.
तांदुळाची पिठी पातळ (आणि
तांदुळाची पिठी पातळ (आणि शक्यतो आंबट) ताकात सरसरीत कालवायची. त्यातच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं.
तेलावर मोहरी, हिंग, जिरं (आणि हवी तर हळद) घालून फोडणी करायची. त्यात हिरव्या मिरच्या आणि आवडत असेल तर लसणीच्या अख्ख्या पाकळ्या परतायच्या. लसूण ब्राऊन झाली की त्यात कालवलेली पिठी घालून परतायची आणि आधणाचं झाकण ठेवून दोनतीन दणदणीत वाफा आणायच्या.
उकड छान शिजली म्हणजे गोळा होते आणि रंग बदलतो.
खायला घेताना आवडत असेल तर त्यावर कच्चं तेल घालायचं.
ओट्स खाऊन खाऊन
ओट्स खाऊन खाऊन कंटाळलेले दिसता.
इथे फोटो टाकायला कृपया बंदी
इथे फोटो टाकायला कृपया बंदी घाला
नाना, ब्रसेल्स मधे आहात ना ?
नाना, ब्रसेल्स मधे आहात ना ? तिथे आफ्रिकन उत्पादने मिळतील. कसावाचे पिठ ( गारी किंवा फुंगी या नावाने मिळेल ) कदाचित आवडणार नाही तूम्हाला. पण उगाली ( मक्याचे जाडसर पिठ ) मिळेल. ते पाण्यात किंवा दुधात शिजवून छान लागते. मीठाशिवाय बाकी काही घालायची गरज नसते. पण हवे तर हिंग जिरे आणि मिरचीची फोडणी देऊ शकाल. हे पिठ २ मिनिटात शिजते.
नेमकी कृती लिहायची तर हे पिठ, पाण्यात किंवा दूधात भिजवून घ्या. एकास एक प्रमाण, जास्त पाणी वा दूध घेतले तरी चालते. मग फोडणी करून त्यावर ओता. ढवळा, झाकण ठेवा. २ मिनिटांनी गॅस बंद करा.
गारी किंवा फुंगी तर शिजवावेही लागत नाही, ( गरम पाणी टाकले कि चालते ) पण ते थोडे फर्मेट केलेले असल्याने त्याचा वास आपल्याला असह्य होतो. ही तिन्ही पिठे शक्तीवर्धक आहेत असे माझ्या सर्व काळ्या मित्रांचे मत आहे आणि त्यांच्या तब्येतीकडे बघून ते मानावेच लागते.
उगालीबरोबर ताक किंवा पालेभाजी छान लागते.
कणकेचे दिवे आणि तांदळाच्या दिवशी हे प्रकार म्हणजे आपले पारंपारीक प्रकार आहेत. फार कौशल्याचे नाहीत.
कणकेचे दिवे करण्यासाठी गूळ ( किंवा डिमेरारा शुगर ) पाण्यात विरघळवून घ्या. त्यात कणीक भिजवा.
मग ती मळून त्याचे खोलगट "दिवे" करा ( साधारण दिव्याचा आकार ) मग ते वाफवून घ्या. खाताना त्यावर
तूप घेऊन खाता येते.
दिवश्या करण्यासाठी तांदळाचे पिठ लागेल. पिठाएवढेच पाणी उकळत ठेवून त्यात थोडे तेल, मीठ व वाटलेली
मिरची किंवा मिरपूड घाला. मग त्यात तांदळाचे पिठ पसरून घाला; ढवळून झाकण ठेवा.
एक वाफ आली की गॅस बंद करा. थोड्या वेळाने ग्लासचा आधार घेत ती मळून घ्या. त्याचे गोळे करा व ते
उकळत्या पाण्यात टाका. ते वर तरंगायला लागले कि काढून घ्या. हा प्रकार चटणी किंवा तूपासोबत छान लागतो.
बेक्ड बीन्स बरोबरही चांगला लागतो.
वा दिनेशदा, किती माहिती आहे
वा दिनेशदा, किती माहिती आहे तुम्हाला. सलाम त्यासाठी.
ते कणकेचे दिवे, तांदळाच्या दिवशी हे काही मला माहितीच नाहीये.
इथे फोटो टाकायला कृपया बंदी
इथे फोटो टाकायला कृपया बंदी घाला >>>किंवा खायला तरी घाला
कसावाचे पिठ ( गारी किंवा
कसावाचे पिठ ( गारी किंवा फुंगी या नावाने मिळेल ) कदाचित आवडणार नाही तूम्हाला.>> हे भगवान!! हे मी कासवाचे पीठ असे वाचले
कदाचित पुढचे वाक्य डोळ्यांनी आधी पकडल्याचा परीणाम असावा.
कसावा म्हणजे काय दिनेशदा?
कणिक, ज्वारी, तांदूळ, बाजरी, मका इत्यादी कुठल्याही पीठाची उकड एकाच पद्धतीने होते. पीठ + आंबट ताक + पाणी + लसूण, मिरचीची फोडणी आणि शिजवणे एवढीच कृती.
त्यात तांदूळ आणि ज्वारीची उकड चविष्ट लागते. म्हणजे मला आवडते.
मीही कासव वाचले आणि अरे देवा
मीही कासव वाचले आणि अरे देवा हे काय करत परत मागे आले वाचायला. कसावा हे कंदमुळ आहे बहुतेक.
अरे नुसतीच काय फोडणी? वर ताजी
अरे नुसतीच काय फोडणी? वर ताजी चिरलेली हिरवीगार कोथिम्बीर पण पेरा की. मज्जा येईल.
नानबाच्या कृतीने पोह्याची उकड
नानबाच्या कृतीने पोह्याची उकड पण जबरी होते. तरीही मला फक्त तांदळाचीच आवडते. बाकी सगळ्या कामचलावू.
उकड खायला घेताना कशी घेता
उकड खायला घेताना कशी घेता तेही महत्वाचे.
ताटलीत घेतल्यावर त्यात मधे आळे करायचे. त्यात साजूक तूप घालायचे.
वरून भाजलेले दाणे आणि सुक्या खोबर्याचा किस घालायचा..
दाण्यांबरोबरच फरसाण किंवा चिवडा पण गार्निश म्हणून घालतात. तेही मस्त लागते पण हवेच असे नाही.
कोथिंबीर एरवी आवडते मला पण उकडीवर ती बरी जात नाही हेमावैम.
कोथिंबीरीबद्दल + १ नी. पण
कोथिंबीरीबद्दल + १ नी.
पण सा.तूप आणि दाणे खोबर्याबद्दल नाही
मला कच्चं तेल आवडतं. ते तसंच खळं करून घेते. एकटीच असेन तर उकड चमच्याने न खाता बोटांनी चाटत चाटत खाते.
पण मला कोथिम्बीर आवडते हे
पण मला कोथिम्बीर आवडते हे माझे वै. मत.:फिदी: ( मी लादत नाहीये कुणावर, पण आवडते हे सान्गीतले) बाकी कच्चे तेल पण फेवरीट.
निवग्र्या पण करता येतील.
निवग्र्या पण करता येतील. मोदकांसारखी उकड काढून घ्यायची मग त्यात कोथिंबीर, हि.मिरची अणि जिरे खरंगटून घालायचे. किंवा लाल तिखट आणि जिरे. मग हातानेच त्याच्या वड्या थापून त्या (प्रेशर शिवाय) उकडून घ्यायच्या.
(मोदकाची उकड हे रॉकेट सायन्स वाटायचे मला. पण मायबोलीवर नुकताच आलेला मोदकाच्या उकडीचा धागा बघून 'हे मला जमू शकेल कदाचीत' असे वाटले. म्हणून तुम्हाला हा पदार्थ सुचवायचे धाडस केले )
निवगिर्या एकदम झकास.
निवगिर्या एकदम झकास.:स्मित:
मला कच्चं तेल आवडतं. ते तसंच
मला कच्चं तेल आवडतं. ते तसंच खळं करून घेते.>>> मी पण मी पण.
निवगर्यांचे दिवस येत आहेत होऽऽऽ
निवगर्यांशिवाय नुसते मोदक केले तर मला काहितरी अपुर्ण वाटतं.
धन्स माबोकर्स्....आज मी करून
धन्स माबोकर्स्....आज मी करून बघणार आहे....
काय? या सगळ्या उकडीन्पैकी
काय? या सगळ्या उकडीन्पैकी नक्की कोणती? नवीन प्रयोग केल्यास हिथ कळवा.
मी आज स्वाती_आंबोळे ताइनी
मी आज स्वाती_आंबोळे ताइनी सान्गितलेली उकड करून बघणार आहे......रिझल्ट उद्या...

मग दिनेश दादांची स्टाइल....
मलापण उकडीवर भरपुर कच्चं तेल
मलापण उकडीवर भरपुर कच्चं तेल आणि थोडी कोथिंबीर आवडते.
निवगर्या मला मोदकापेक्षाही आवडतात.
तांदळाच्या उकडीवर तूप , पापड
तांदळाच्या उकडीवर तूप , पापड किंवा लसण्चा चटणे आवडत
गहू, तांदूळ, आख्खे मूग, हरभरा
गहू, तांदूळ, आख्खे मूग, हरभरा डाळ, बाजरी - प्रत्येकी २-२ चमचे भाजायचं. मिक्सरमधे त्याची भरड करायची आणि हे मिश्रण उकडीसारखं ताकात शिजवून खायचं. बाकी फोडणी तशीच - कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, लसूण वगैरे. ऑसम लागतं. हे शुगरवाल्यांसाठी एकदम आयडियल वन डीश मील आहे.
मीही कासव वाचले. मला
मीही कासव वाचले.
मला तांदळाच्या उकडीचे नवीन प्रयोग करायला आवडतात.
म्हणजे धान्याची भाजणी टाइप..
म्हणजे धान्याची भाजणी टाइप..
मी नॉर्मल उकड तांदूळ, ज्वारी, नाचणी आणि गहू पिठे एकत्र करून करते अनेकदा. मस्त लागते.
हे भाजणी टाइप प्रकरण करून बघायला हवं.
आपली थालीपीठाची भाजणी असते
आपली थालीपीठाची भाजणी असते त्याची मोकळी भाजणी करतात तो प्रकार उकडीसारखाच आहे.
इथे स्वाती_आंबोळेंनी
इथे स्वाती_आंबोळेंनी लिहिलेली मोकळ भाजणी आहे. ती ही करता येइल. फक्त बेल्जियमच्या मार्केटात थालीपीठाची भाजणी शोधत फिरू नका. भारतातून मागवा.
तांदुळाच्या उकडीची एक सोप्पी
तांदुळाच्या उकडीची एक सोप्पी पध्दत. पिठात ताक+मीठ घालून कुकरच्या भांड्यात ढोकळ्यासारखे उकडून घ्यायचे अन वरून पळीफोडणी घालणे - जिरे् हिमी कढिपत्त्याची. हा प्रकार दहा मिन्टात होतो. अन ढवळत - वाफा काधत बसावे लागत नाही.
तां. उकड किती शिजवली तरी
तां. उकड किती शिजवली तरी कचवटच लागते मला. शिवाय ताक घालत नव्हते, इथे वाचून आता घालून पाहीन.
आजच मी प्रथमच ज्वारीच्या
आजच मी प्रथमच ज्वारीच्या पीठाची उकड करून खाल्ली. झकास लागली. फार आवडली. इतके वर्ष लहानपणापासून कधीच तांदळाशिवाय कशाची खाल्ली नव्हती.
आता भाकरी निमित्ताने आणलेले ज्वारीचे पीठ कसे संपवावे हा प्रश्न मिटला. मस्त नाष्ट्याचा आयटम झाला हा झटपट होणारा.
शुम्प्री, तशीच पद्धत म्हणजे
शुम्प्री, तशीच पद्धत म्हणजे ताक वगैरेत कालवुन केली का?
येस. ताकात कालवलं आणि फोडणीत
येस. ताकात कालवलं आणि फोडणीत मस्त लसूण घातली. वरून साजूक तूप
उकड करताना पीठ फार कमी
उकड करताना पीठ फार कमी वापरावे लागते ना ?
<<मला कच्चं तेल आवडतं. ते
<<मला कच्चं तेल आवडतं. ते तसंच खळं करून घेते>> =१११११
मला तांदुळाची उकड प्रचंड म्हणजे प्रचंडच आवडते . निवग्र्या तर आवडतातच
ज्वारीच्या पीठाची उकड आज करुन
ज्वारीच्या पीठाची उकड आज करुन बघितली. मस्त लागली चवीला. फारच कमी वेळात चमचमीत करुन मिळाले. धन्यवाद!