मुरली मोहन मोही मना....

Submitted by जिप्सी on 17 August, 2014 - 22:48

कानी येता ज्याच्या बासुरीचे सूर
कालिंदीला येता आनंदाचा पूर
गोपिकांच्या घरी प्रीतिचा पाहुणा
सखी गं, मुरली मोहन मोही मना...

प्रचि ०१

प्रचि ०२
देवकी वसुदेव बंदीमोचन त्वां केलें
नंदाघरीं जाउनी निजसुख गोकुळा दिधलें
गोरसचोरी करितां नवलक्ष गोपाळ मिळविले
गोपिकांचें प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले

हले हा नंदाघरी पाळणा, त्यात देखणा गोजिरवाणा
हसतो गोकुळ-राणा...

प्रचि ०३
असा कसा देवाचा देव बाई ठकडा
देव एका पायाने लंगडा

प्रचि ०४
आज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी
अमृताचा चंद्रमा भाळी, उगवला हो

प्रचि ०५
देवकिनंदन श्याम सुलोचन, गोपगड्यांसह खेळे हासुन
लेवुनि पानफुलांच्या साजा, गोकुळिचा राजा, माझा गोकुळिचा राजा

प्रचि ०६
कलेकलेने चंद्र वाढतो चिमणा नंदाघरी
पाजळ्या या अमृतज्योती देवकीच्या अंतरी

प्रचि ०७
गोविंदा रे गोपाळा रे
छंद तुझा जडला, घननीळा

प्रचि ०८
मुरलीधर चित्तचकोरा रे, जाशि कुठे नवनित-चोरा रे
आज तुझी ना होईल सुटका, फोडुनि बघ तू गोरस-मटका
किती करशिल शिरजोरी असता तुझ्या भोवती घेरा रे

प्रचि ०९
असा कसा खट्याळ तुझा कान्हा, यशोदे तुझा कान्हा
काही केल्या मला आवरेना ग बाई आवरेना!

प्रचि १०
रंगुनि जाता दिसे आगळी, श्रीरंगाची मूर्ती सावळी
लावूनिया छंद उभ्या गोकुळाला, विसरला भान देव चक्रधारी
रंगला रे हरी यमुनाकिनारी...

प्रचि ११
तुला शोधिते मी दिनराती, तुजसी बोलते हरि एकांती,
फिरते मानस तुझ्याच भोवति, छंद नसे हा साधा,
प्रेमवेडी राधा, साद घाली मुकुंदा...

प्रचि १२
झुलतो बाई रास-झुला
नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा

वार्‍याची वेणु, फांद्यांच्या टिपर्‍या
गुंफतात गोफ चांदण्यात छाया
आभाळाच्या भाळावरी चंदेरी टिळा...

प्रचि १३

हरिनाम मुखी रंगते, एकतारी करी वाजते
विनविते, मी तुला, भाववेडी मीरा
गोड नामी तुझ्या दंगते

प्रचि १४
नको वाजवू श्रीहरी मुरली
तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे

प्रचि १५
कृष्ण गाथा एक गाणे जाणते ही वैखरी
एकतारी सूर जाणी श्री हरी जय श्री हरी

प्रचि १६

जिवाचा जिवलगा नंदलाला रे
यमुनेत तुझ्या माझ्या बिंब मुखाचे
बांसरीत तुझ्या माझ्या गीत सुखाचे
स्मरणाने जीव माझा धुंद झाला रे

प्रचि १७
तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा दिसे
माझ्या डोळ्यांत मूर्ति तुझी विलसे

प्रचि १८

देव माझा निळानिळा, डोळे माझे निळे
माझा समुद्रही निळा, आभाळही निळे
कशी बाई सावळ्याची जादू अशी निळी?
श्रीरंगही निळे आणि अंतरंग निळे

प्रचि १९

पानापानात दिसतो कान्हा, फुले तोडू कशी मी सांगा ना
बासुरीच्या या सूरात न्हाली, चिंब राधिका भिजुनी ओली
कृष्णरूप ही छाया झाली, आता सरला परकेपणा

प्रचि २०
समचरण सुंदर, कांसे ल्याला पीतांबर
अनाभी या माळा रुळती, मुख्य त्यात वैजयंती

प्रचि २१
बोले स्वर बासरिचा, राधेला छंद तुझा
तरु-वेली-फुलांतुनी, गोकुळ हसर्या नयनी
यमुनातटि कुंजवनी, उधळी गंध मनीचा

प्रचि २२
मनी माझिया नटले गोकुळ, मी राधा तू कान्हा प्रेमळ
वाजविता तू मधुर बासरी, नंदन माझ्या फुले अंतरी
फुटते घागर, भिजते साडी, खट्याळ हसते कालिंदीजळ

प्रचि २३
मुरलीधर घनश्याम सुलोचन, मी मीरा तू माझे जीवन
तुझ्या मूर्तिविन या डोळ्यांना, कृष्ण सख्या रे काहि दिसेना
एकतारिच्या सुरात माझ्या, तुझेच अवघे भरले चिंतन

प्रचि २४
दावा नयनी यशोदेचा सुकुमार
मस्तकी मुकुट, कानी कुंडल शोभे
गळा वैजयंती हार

प्रचि २५
सखे ग कृष्णमूर्त गोजिरी, ही ठसली मम अंतरी
धरी वदनी मधु बासरी, मधुर काढी सूर श्रीहरी
बावरे सृष्टि सुंदरी

प्रचि २६
सांवरे श्याम श्रीहरी, मी झाले तुजविण बावरी
मंतरलेले सूर ऐकुनी भान मला नुरले
बंध जगाचे तोडुनि सारे धावत मी आले
ही छळते वैरिण बासरी

प्रचि २७

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे

प्रचि २८
चांदण्यांची लुकलुक झुले गगनी
बासरीने भारावून गेली रजनी
रासरंग उधळला कोनाकोनांत
त्याची धून झंकारली रोमारोमांत

प्रचि २९

प्रचि ३०
तटी:
१. प्रचि १ वरील सुलेख मायबोलीकर निलू हिने केले आहे. Happy
२. प्रचि २९ डिजिटल आर्ट संदेश करलकर.
३. काही प्रचि पूर्वप्रकाशित.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम....

मायबोली उघडली आणि पहिल्या बीबीवरच हे कृष्णदर्शन झाले. आता बाकी काही पाहण्याची इच्छाच उरली नाही. अगदी अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी.. असे झाली.

तुझे आभार मानावे तितके थोडेच. आजचा दिवस प्रसन्न केलास अगदी..

असाच आनंद कायम देत राहा. Happy

छान.

योग्या. मस्तच रे नेहमीप्रमाणे. Happy

इथे मायबोलीवर लाईक बटण हवेच हवे.

१०, २०, २१, २९ हे मला जास्त आवडले, अर्थातच सर्वच थीमला धरुन आहेत आणि त्यामुळे रोज दिसणारा कॄष्ण, आजच्या दिवसाला जास्तच भावला Happy

सर्व सणान्चे महत्व असे वेगळ्या पद्धतीने सांगण्यात योगेशचा हात धरणारे कोणी नाही Happy

सुंदर!

शेवटचे दोन कृष्णाचं जाणीवेतलं दर्शन घडवतात. >>> यात एकविसावा पण येतो.

जिप्स्या, मुर्ती / चित्रे कुठली आहेत ते पण लिही.

छान सिरीज. पण ८ मधलं लोणी आणि २२ ते २६ मधला मुकुट, हार, मोरपीस नसतं तर जास्त आवडलं असतं. ती मूर्तीच सुंदर आहे.
अशा मूर्ती मुंबई/ पुण्यात कुठे मिळतात?

Pages