ज्योत्स्ना भो़ळे सभागृह टिळक रोडवर (पुण्यात) कुठे आहे?

Submitted by mansmi18 on 15 August, 2014 - 07:37

नमस्कार,

ज्योत्स्ना भो़ळे सभागृह टिळक रोडवर (पुणे) कुठे आहे? गूगल वरुन नीट कळत नाही आहे.
(आजुबाजुचे लँडमार्क आणि डायरेक्शन्स लिहाल का?)

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिराबागेजवळ.
टिळक स्मारक मंदिराकडून स्वारगेटाकडे जाताना पेट्रोल पंप ओलांडल्यावर डाव्या हाताला आहे.

थँक्स चिनुक्स..तो हॉल किती मोठा आहे/पार्किंग कसे आहे माहित आहे का?
(उद्या तिथे "जयदेव"च्या गांण्यांचा कार्यक्रम आहे,,त्यासाठी धावपळ Happy )

हॉलच्या खाली पार्किंग आहे. पंचवीस-तीस गाड्या मावत असतील. लवकर जा म्हणजे खात्रीने मिळेल.

आम्ही ज्योत्स्ना भोळे सभागृहात ग्रिप्सची नाटकं पाहिली होती. तेव्हा खुर्च्या आणि भारतीय बैठक असे दोन्ही होते. खूप मोठा नाहीये हॉल. शंभर-दीडशेची कपॅसिटी असावी ( अंदाज )

त्या बिल्डिंगमध्ये अजून मोठा दुसरा हॉल असल्यास कल्पना नाही.

हो.. तिथे दुसर्‍या मजल्यावर दुसरा हॉल आहे. कपॅसिटी २००-२५० आरामत असेल. पार्किंग १०-१५ चार चाकी आणि ३०-३५ दुचाकी आरामात मावतील एवढे आहे.

.

जाउन आलो.. हॉल चांगला आहे पण लहान आहे (२०० कॅपेसिटीचा आहे). पार्किंगही व्यवस्थित आहे.
माहितीपुर्ण प्रतिसाद दिलेल्या सगळ्यांचे आभार.