'वजन' वाढवू या

Submitted by अक्षय_AB on 13 August, 2014 - 13:07

असे म्हणतात की माणसाचे व्यक्तिमत्त्व 'वजन'दार असावे. आता माझी अंग'काठी' अशी आहे अगदी बांबु च्या झाडाला competition देतेय. लहानपणी कुणी मला टोकर म्हणालेल आठवतंय, मनाने हे डायरेक्ट शरीरावर घेतलय. height 6.1 feet ahe n vajan 40 kg approx. Please vajan vadhvayla kay karave te dhyani lokani saangave

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पलक दि,
सेम हीअर, लग्न झालं, मुलं झाली, वजन काहि वाढलं नाहि. ऊंची ५'७" वजन ५० किलो फक्त. तेही मागच्या काहि महिन्या मध्ये खुप केक खाल्ले म्हणुन वाढलं. चीझ खाउन काहि फायदा नाहि, शतावरी कल्प सुरु केलय. पाहु काहि फायदा होतोय का ते.

धारा खूप स्कोप आहे तुम्हाला सर्व धाग्यांवर हिरिरीने बोलण्यासाठी!>>>>> याचा अर्थ कळाला नाही. मी फक्त गेले काही वर्षे माझी धाग्याकर्त्यासारखीच परिस्थिती असल्याने आणि एरवी दिसते तसे त्यामागचे कारण नसल्याने, त्यांचा कदाचित फायदा होईल म्हणून इथे लिहीले. बाकीच्या धाग्यांचा काय संबंध?
मी वजन कमी/जास्त करण्यासाठी कधीच काहीच उपाय केले नाहीत. फक्त निरोगी राहण्यास पुरेसा आहार आणि विहार ठेवला आहे.

व्यायामाला पर्याय नाही. Happy

माझे वजन असेच कितीही खाऊन वाढत नाही. नियमित जिमला जाऊन व्यायाम करण्याने वाढले. व्यायामाने खाल्लेले अंगी लागते. स्नायू बळकट होतात. शिवाय एकदम छान उत्साही वाटते ते वेगळेच.
कार्डियो = धावपळीचे व्यायाम कमी, तर वजने उचलायचे, स्ट्रेचिंगचे (उदा सूर्य नमस्कार) जास्त करायचे. पण सगळे प्रकार करायचेच. शिवाय भरपूर डाळी, उसळी, चीज आणि खात असाल तर लीन मीट.

मी वाढवलय वजन ३८ ते ५०. ३-४ वर्षामधे.

हे खा, ते खा असं सगळे सांगत होते. पण भूक कशी वाढवायची असा प्रश्न होता.
व्यायाम सुरू केल्यावर तो प्रश्न मिटला. आता वेळेत भूक लागते नी वजन ५० वर कायम आहे.

व्यायामशाळेत सांगितल्याप्रमाणे सगळं करायला जमलं नाही. पण अर्धमुर्ध तरी केलं.

  • व्यायामशाळेत जाण्यापूर्वी ४-५ खजूर आणि एक उकडलेला बटाटा किंवा अंड. एवढे खजूर एकदम खाणे मला झेपणारे नव्हते. २ पर्यंतच. काळीमिरीबरोबर खाल्ले तर जातात म्हणे.
  • व्यायामशाळेत १० मिनिटे वॉर्मअप. मग वजने उचलणे. हात, छाती, पाय, पोट असे त्यांचे जे संच असतात प्रत्येक दिवसाचे तसे.
  • नंतर न्याहारीला पोहे, उपमा, चपाती-भाजी,मोड आलेल्या उसळी, असं काहीतरी आणि दूध.
  • दुपारी चपाती भाजी
  • संध्याकाळी मिल्कशेक किंवा एखादे फळ
  • रात्री चपाती, भाजी, भात डाळ
  • यात मधेच काहीतरी गोड, ड्रायफ्रुट वगैरे.

व्यायाम करायला लागल्यावर हे सगळं खायला जमायला लागलं. नाहीतर ऐकूनाच डोळे पांढरे झाले होते. आता व्यायाम न करता पण एवढं खायला जमतं.पण मग वजन जास्तंच वाढतं. त्यामुळे जेव्हा माहीत असतं दुसर्या दिवशी व्यायाम करायला जाणे जमणार नाही तेव्हा रात्रीचे जेवण अगदी कमी किंवा नुसते सॅलड वगैरे काही हलकसं.

मी गेलोय यातून .शाळेपासूनच बारीक .वरील सर्व उपाय ग्रजुएशनपर्यँत करून झालेले .नोकरीच्यावेळी मेडिकलसाठी बोलावले .उंची ५.८ आणि वजन ४१ किलो(आठेएक केळी खाऊन) .घेऊन बघा असेपण प्रबेशन सहा महीने आहे प्रयत्न करून पन्नास आणतो म्हणालो .सुदैवाने कंपनीतले नाश्ता जेवण उत्कृष्ट होते आणि अनलिमिटेडही .पंजाबी समोसे मेदूवडे ,ब्रेडबटर ,दहा दहा सहज खायचो,वर अर्धा जग चहा ढोसून चार तासांनी भरपूर भूक लागून जेवायचो .भस्म्या रोग यालाच महणतात का ?कधीही व्यायाम केला नाही .सहा महिन्यांनी वजन ७३ किलो झाले .कशामुळे झाले ? डॉक्टर म्हणाले आता बास .मला वाटतं पंजाबी समोसे आणि मेदुवडे आलटुन पालटुन पंधरा दिवस खाऊन पाहा .मी पूर्ण शाकाहारी आहे आणि 'इतर' कोणतेही पदार्थ खात नाही .

तुम्हाला अ‍ॅसिडिटीचा त्रास आहे का?
मी सुद्धा या प्रकारातून गेलोय. नोव्हेंबर २०११ ला माझे वजन साधारण ४९ किलो होते आणि मार्च २०१२ ला ६३ किलो. आहार, व्यायाम, झोप, मन इ गोष्टी महत्वाच्या आहेत.
सगळ्यात पहिलं व्यायाम चालू करा, वेट ट्रेनिंग. जॉगिंग, ट्रेडमिल इ इ अजिबातच नको. जास्त वजन उचलायची गरज नाहीये, पण कमी वजन जास्त वेळेस उचलू शकता. सुरुवातीला खूप जास्त व्यायाम करू नका. सुरुवात १५ मिनिट व्यायामाने करा आणि ४० मिनिटांपर्यंत न्या.
६ meals a day करून बघा, साधारण दर ३ तासांनी काहीतरी पोटात गेले पाहिजे. जसं सकाळी ब्रेकफास्ट, १२ ला जेवण, २-३ वाजता एखादं फळ, ५-६ वाजता स्नॅक्स, ८-९ वाजता जेवण, आणि रात्री झोपायच्या आधी अर्धा ग्लास दुध.
साधारण ८ तास झोप अगदी गरजेची आहे. रात्रीचे जागरण टाळा. मन शांत ठेवा. शांत मन आणि चयापचय यांचा संबध आहे.
आणि सातत्य अगदी महत्वाचे, परिणाम दिसायला १ महिना लागतो. एकदा का शरिराला या सगळ्या गोष्टींची सवय झाली की मग नंतर सगळच सोपं होते.

अमेरिकेत स्थलांतर करा. सगळीकडे गाडीतून हिंडून, ड्राइव्ह थ्रू मधून जंक गोष्टी घेउन आणि पिझ्झा खाउन सहा महिन्यात वजन खात्रीने वाढेल. Happy

एकच पर्याय जोर मारणे . or dips, पण डिप्स मारण्याची प्रत्येकाची पद्धत निराळी असते त्यामुळे जोर मारणे हेच चांगले .
वजन वाढवायचय जोर मारा ,
वजन कमी करायचय जोर मारा,
गोरं व्हायचय जोर मारा , (थोड्या प्रमाणात)
सुंदर दिसायचय जोर मारा ,
पोट साफ होत नाही जोर मारा,
तुमची पाठ दुखतीय जोर मारा,

सुरवातीला तुम्हाला एका दमात निघतील ( चार, पाच, दहा, पंधरा कितीही) तेवढे काढा नंतर दहा मिनीटे थांबून पून्हा काढा यावेळी पहील्या पेक्षा थोडे कमी निघतील पुन्हा दहा मिनीटे थांबा पुन्हा जोर मारा असे दररोज पाच सेट करा.

प्रत्येक दिवशी वा दोन दिवसांनी अथवा चार दिवसांनी एक एक जोर प्रत्येक सेट मधे वाढवा.

प्रत्येक वेळी जोर किती मारताय हे मोजा , हळू हळू टारगेट वाढवा मग बघा तुम्हाला त्याचा छंद लागेल रोज न चुकता अस केल्यास तुम्ही तिन महिन्यात एका वेळी (एका दमात म्हणजे एका श्वासात ) पन्नास जोर काडू शकता ( पहिल्यावेळी पन्नास पुन्हा चाळीस ,पस्तिस समथिंग).

जोर काडण्यामुळे शरिराला जो शेप येतो जो आकार येतो तो लाजवाब असतो . इतका सुंदर असतो की तुम्ही आरशासमोर तासअनतास उभ राहून बघत रहाल.
जोर काडण्यामुळे आपल्या शरिरा बरोबर आपल्या चेहर्याला सुद्धा एक मस्तच शेप येतो . मि तर अस म्हणेन कि प्रत्येक पुरूष स्त्री सुंदर दिसू शकते जिच्यात शारिरिक व्यंग नाही .

तुम्ही जिम करा पण जिम मुळे तुम्ही ह्रतिक टाईप बाॅडी नाही बनवू शकत .त्यासाठी तितक्याच क्षमतेचा ट्रेणर असणे मह्तवाचे असते.
आर्धवट जिम करणारी लोकं बेढब दिसतात .आणी पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला एक पण जोर निघत नसेल अन तुम्ही डायरेक्ट जिम करणार असाल तर तुम्हाला भर चौकात नारळ द्यायला पाहीजेल.

काही लोकं कपड्यात श्रिमंत दिसतात अन काही लोकं कपडे काडल्यावर - s@rk@r

आणी पहिली गोष्ट म्हणजे
जर तुम्हाला एक पण जोर निघत नसेल
अन तुम्ही डायरेक्ट जिम करणार
असाल तर तुम्हाला भर चौकात नारळ
द्यायला पाहीजेल>>
mag tasla ek karyakram theuyaa karan mi gym join keliye magchyach aathavdyat

वाह मस्त, उपयुक्त धागा, मलाही.. मी स्वतःच काढायला लाजत होतो. पण आता आयते सल्ले मिळतील.
धागा वाहता असेल तर प्लीज अ‍ॅडमिन थांबवा याला.

Exam mule busy hoto thoda.. Aachanak mazya dhaagyavar hi pratisadanchi laat aleli pahun aanand zala..
he admin bhau kuthe ahet rao...

वर जोर काढण्याबद्दल म्हणले आहे ते तंतोतन्त बरोबर आहे, फक्त जोडीला बैठका मारणेही हवे.
कित्येक वर्षे माझे वजन ५०/५२ च्या घरात होते. २०१२ मधे डिपार्टमेंट बदलल्यावर मात्र सहा महिन्यात वजन ५ किलोने वाढले (आहारात बदल न करता) व आता ६२/६३ मधे फिरते आहे.
अजुनही अधेमधे हुक्की आल्यावर मी जोर बैठका मारतो. (हुक्की आल्यावरच कारण वयपरत्वे व दम्याच्या आजारामुळे कंटीन्यू करता येत नाही).
भरपूर शारिरिक कष्ट, पुरेसे जेवण नेमक्या वेळेला मिळ्णे व डोक्याला चिंताविवंचना नसतील तर वजन नक्कि वाढते.
शारिरीक कष्ट न करता बशा कामांमुळे व अतिखाण्याने वजन वाढते त्या व्यक्ति फोफशा/बेढब दिसतात. पण वर म्हणल्याप्रमाणे जोर, बैठका व थोडीफार वजने/डम्बेल्स्/पीटीचे हातवारे इत्यादी व्यायामामुळे वजन वाढवले तरी ते सुडौल दिसते.
तुम्हाला शुभेच्छा....

नक्की कशा मारायच्या जोर बैठका मुलींनी मारल्या तर चालतात का?
<<
हो. मुलींनी सगळा व्यायाम केलेला चालतो.

शाळेत काढतात तश्या (कान न धरता) उठबश्या काढणे = बैठका.

जोर = सूर्यनमस्कारातला एक छोटा भाग. (व्हेरिएशन. नॉर्मली जोर काढत नाहीत)

तुम्ही फक्त सूर्यनमस्कार घातलेत तरी भरपूर होतील.

माझ वजन 55 कि. आहे मागच्याच आठवड्यात कळलं.. माझ्याकडे आता 2 महिनेच सवड आहे
अजुन काही सल्ले व अनुभव शेअर करावेत...