निसर्ग'वेड'...

Submitted by झुलेलाल on 12 August, 2014 - 00:03

अशा ठिकाणी घर हवं, जिथे मन प्रसन्न राहील. कला बहरेल आणि प्रतिभेला पंख फुटतील...... मुंबईतल्या तमाम कलावंतांनी ठरवलं, मंत्रालयात खेटे घातले, पाठपुरावा केला, आणि नवी मुंबईत, डोंगराच्या कुशीत कलाग्राम उभे राहिले.
एका प्रसिद्ध व्यंगचित्रकारानेही आपलं टुमदार घर आर्टिस्टस व्हिलेजमध्ये वसवलं...
कधीतरी, दादरच्या गजबजाटापासून दूर, निवांत एकांतासाठी, शीण घालवण्यासाठी हा कलावंत वीकेन्डला तिकडे जायचा.
पण हळुहळू जाणं कमी झालं.
सहज गप्पा मारताना त्याला विचारलं, त्या स्मशानाचा धूर, रस्त्यावरचा कलकलाट,... तुम्हाला वीकेन्डला तरी त्यापासून सुटका मिळत असेल ना?...
त्यानं गरागरा मान फिरवली.
'हल्ली आम्ही जात नाही तिकडे'... सुरात तिटकारा आणत तो म्हणाला.
मी का म्हणून विचारायच्या आधीच तो बोलू लागला.
'अहो काय सांगू, इथल्या रगाड्यातून निवांतपऩा मिळावा म्हणून तिथे घर बांधलं. सुट्टीला जात होतो. जरा निवांत झोपावं, सकाळी आरामात उशीरापर्यंत लोळत पडावं, कसला त्रास असू नये असं वाटत होतं. पण कसलं काय'...
मी प्रश्नार्थक!
'अहो, उजाडायच्या आधीच पक्ष्यांचा कलकलाट नुसता... बरं किती वेगवेगळे आवाज त्यांचे... झोपेचं पार खोबरं. शेवटी जाणंच बंद केलं!'...
... निसर्ग बघायला गावाबाहेर गेल्यावर, गाडीच्या खिडकीतून बाहेर बघताना सारखी झाडी आडवी येत होती, हा अशोक नायगावकरांनी सांगितलेला भन्नाट किस्सा आणि हा प्रसंग, दोन्ही आज एकदमच आठवलं! कारण दोन्ही किस्से आमच्या लोकसत्ता कार्यालयातच, गप्पांच्या ओघातच जन्मलेले!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

रविवारी सकाळी पक्ष्यांच्या आवाजाने जाग आली की कधीकधी मलाही असेच वाटते. इतर दिवशी ठिकाय, पण रविवारीही यांनी उठवावे........ Happy

निन्दियासी जागी बहार, ऐसा मौसम देखा पहेली बार
कोयल कुके, कुके, गाए मल्हार...

म्हणजे अस कोणालाच नकोय तर. साहजीक आहे, एक दिवस सुट्टी, आणी त्यातुन यान्चे चु चु, कुकु. तरी बरय, कोवळे मन्जूळ सूर कानी पडतायत. आम्हाला तर कोणत्याही दिवशी ( सुट्टी असो वा नसो) भटक्या कुत्र्यान्च्या भुभु रागाने जाग येते. कोणत्याही पट्टीत ते त्यान्चा राग आळवत असतात.:खोखो: