या रेल वे प्रेमींचं काय करायचं

Submitted by एस. चावरे on 10 August, 2014 - 13:48

प्रसंग एक :

राजधानी एक्स्प्रेक्सची सेकंड एसीची तिकीट. नेहमी स्लीपरचा किंवा थर्ड एसीचा डब्बा पहाय्ची सवय असलेल्यांना चकाचक डबा, पडदे पाहून स्वर्गात गेल्यासारखं वाटतं. एका बाकावर दोघंच म्हणजे लक्झरी. साइडच फोल्डींग टेबल तिघात कसल अडचण करतं.

गाडीत बसतो नाही कुठं पेपरवाला येतो, पाण्याची बाटली नि पेपर देऊन जातो. पैसे नाही. फुकाट येकदम. लगेचच झिलमिल, रिमझिम नावाचं रंगीत सौंफचं पाकिट येतं. तो टीपी होईपर्यंत चहा येतो. पाऊण तास कसा गेला कळत नाही. मग नाश्ता येतो. छोटा ट्रे आणि त्यात कचोरी, कच्छी दाबेली, समोसा, पॅटीस किंवा तत्सम काही तरी. पुन्हा रिमझिम, टोमॅटो सॉसचं पाकीट, दूधाची पावडर, साखर यांचे पुडके, डीप डीप पाकीटं. गरम पाण्याचं थर्मोवेअर असा ब्रिटीशकालीन कपटीचा जामानिमा येतो.

आपण पडदा सरकवून प्रसन्न मनाने घास घ्यायचा प्रयत्न करणार इतक्यात खिडकीतून आपल्याला बाह्रेचं चित्तथरारक दृश्य दिसतं. अनेक छोटे मोठे आमीरखान रेल वे पटरीवर थ्री इडीञट्स पोझ मधे बसलेले, पण आत्ता आपण आणि हे महानायक यांच्यामधे ते आसन नसून आपल्याला या नभाने या भुईलादाअन द्यावे या ओळीची प्रचिती येऊ लागते. मोदक विसर्जनाचा विधी पाहून आपली उदरभरण विधीची मनातल्या मनात सांगता झालेली असते.

प्रसंग दोन :
घरी नवीन कार येते. वडलांच्या हुकूमाप्रमाणे लायसेन्स काढले जाते. आउटिंगला जायचा बेत ठरतो. गाडी चालवायला मिळाल्याने सातवे अस्मानपर दिमाग छाता है. निघेपर्यंत दुपार होते. तरी पण रस्त्यात दिसली. भजी की थांबव गाडी,,दिसलदिसलापाव वाला थांबव, चहा घे, मिसळ घे असं करत अंधार होतो. आता नॅशनल हायवे सोडून गाडी आतल्या रस्त्याला लागते. हेडलाइट लागतो. बैलांच्या डोळ्यातून आग येताना दिसते. ती मज्जा बघत चाललो असतानाच आणखी एक उत्साहवर्धक दृश्य दिसते.

राजा आल्यानंतर नागरीक जसे रस्त्याच्या कडेला उभे रहायचे तसेआमय्च्या ङाडीला सलामी देण्यासाठी लोक बसलेले उठून उभे राहत. आम्ही जाईपर्यंत ते उभे राहत. हे मॅनर्स पाहून भारावून जातो तोच पुढय्चा गावाआधी महिलांचा ताफा आम्हाला तोफांची सलामी देत असल्यासारखा उभा असलेला दिसला. या दृश्याने डोळ्यात पाणी आलं. गावाकडे आजही आदब, संस्कार टिकून आहेत, संस्कृती टिकून आहे हे कळालं. आमच्यातला एक विचारवंत यावर भरभरून बोलू लागला , एका अज्ञानदासाने त्यावर चिंतन केलं.

तेव्हां प्रेतात बसलेला एक बेफिकीर माणूस तुच्छतेने म्हणाला ते कशालाबुभे राहतात ते कळतंय का ?

मग त्याच्या सूचनेप्रमाणे लाईट्स बंद करून काही वेळ गाडी चालवली आणि रस्त्याच्या कडेला पांढरी बोचकी दिसू लागल्या बरोबर हेडलाईत्स ऑन केले आणि.... पुन्हा ते चित्तथरारक दृश्य !!!

अनेक आमीरखान विदाउट ट्रान्झिस्टर बसलेले ! राग हागणदारी आळवत असताना अचानक प्रकाशझोत पडल्याने मैफल अर्धवट सोडूनव्नाड्या आवळत उभे राहताना त्यांची उडालेली धांदल आणि त्या विजारीचे मागे काय झाले असेल याचा विचार झटकत त्यांच्या रागाला बली न पडण्याचे ठरवत टाकलेला चौथा गियर !!!
नशीवब आमीर खान होते. हिरविनी असत्या तर धडगत नव्हती असा उपविचार करून कसे बसे सुटलो.

या दोन्ही प्रसंगात जे काही अनुभवाला आलं ते परदेशी लोकांना खूप्रेर्ण्रणादायी असेल नै ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला... मायबोलीवर आता (टम)रेलद्वेष्ट्या ब्रिगेडचा उदय झाला तर...

एकूण विचारांचा हाच प्रवास... अमूक ट्रेन, तमूक स्टेशन, अमका फलाट आंणि तमका रूळ अश्या वळणाने जात जात हिटलरशाही पर्यंत पोहोचतो.

माझ्या ट्रेनसमोर तु बसलास, माझ्या गाडीला तू तोफांची सलामी दिलीस मग तर मला तुला अद्दल घडवावीच लागेल..... ऑनर किलिंग सारख्या प्रश्नाच मूळ उत्तर देखील ह्या प्रश्नातच आहे.

चावरे उडाले Proud

मुंबई त लोकल्सच्या बाहेर बघावंसं वाटत नाही. रुळाच्या मधे तरी घाणच असते.

रेल्वेसाठी डीआरडीओच्या एका लॅब ने बायोडायजेस्टर क्लोजेट्स विकसित केली आहेत. लिंक सापडली तर देइन. प्रॉडक्शन सुरू झालं तर स्वच्छ ट्रेन्स आणि रूळ पहायला मिळतील.

पण घरातून रूळात येणा-यांच काय करावं हे ब्रह्मदेवालाही कळणार नाहीत . रडण्यात अर्थ नाही. मनपाची जबाबदारी आहे. नाहीतर लोकांनीच नगरसेवकांना मत मिळणार नाही हे सांगायला पाहीजे.

अर्थात राजकारण्यांचं काही सांगता येत नाही. पूर्वी वार लावून जेवायचे तसं मन उदार करा म्हणत नवेच कायदे करतील.