कवितांची पुस्तकं

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

गद्य पुस्तकांची यादी केली तेंव्हाच ही पुस्तकं पण लावून ठेवली होती अकारविल्हे प्रमाणे. पण त्यांची यादी कागदावर करण्यात अन मग ती इथे टाइप करण्यात इतका वेळ गेला!

अनिल सांगाती

विंदा करंदीकर निवडक कविता
कुसुमाग्रज १०० कविता
थांब सहेली
पाथेय
महावृक्ष
मुक्तायन
विशाखा
केशवसुत हरपले श्रेय
वि स खांडेकर खांडेकरांची कविता
गुलजार त्रिवेणी
ग्रेस चंद्र माधवीचे प्रदेश
राजपुत्र आणी डार्लिंग
संध्याकाळच्या कविता
सांध्यपर्वातील वैष्णवी
दिलीप चित्रे हिमगंध
कुंदा जोशी फेनफुलें
भा रा तांबे तांबे यांची समग्र कविता
यशवंत देव पत्निची मुजोरी
पद्मा नीहार
श्रावण मेघ
आरती प्रभु नक्षत्रांचे देणे
दिवेलागण
भाउसाहेब पाटणकर दोस्त हो
मंगेश पाडगावकर उत्सव
उदासबोध
कबीर
गझल
त्रिवेणी
धारानृत्य
बोलगाणी
भटके पक्षी
मीरा
मोरु
वादळ
विदुषक
सलाम
वसंत बापट अकरावी दिशा
मानसी
शततारका
सकीना
सेतू
बी फुलांची ओंजळ
बा भ बोरकर गितार
चित्रवीणा
गोवर्धन भोसले प्रीतम
बा सी मर्ढेकर मर्ढेकरांची कविता
ना धों महानोर अजिंठा
पक्ष्यांचे लक्ष थवे
पानझड
प्रार्थना दयाघना
वही
विनायक मोहरीर ओढ

प्रकार: 

धन्यवाद! बरेच संग्रह आहेत तुझ्याकडे.

पद्मा म्हणजे पद्मा गोळे का.. हो त्याच असतील कारण श्रावण आणि नीहार ही त्यांच्याच काव्यसंग्रहाची नावे. आता कदाचित ही दोन संग्रह मिळणार देखील नाहीत. आपल्याकडे हा नेहमीचा प्रश्न आहे की एकदा लेखक जुने झालेत की मग त्यांची पुस्तकं कालबाह्य होतात आणि मग ती फक्त ग्रंथालयात संदर्भ प्रत म्हणून आढळतात. कित्येक चांगली चांगली पुस्तक मिळणे दुरापास्त झाले आहे.

आता जर सा. स. जात असणार तर तिथे तुला अशी दुर्मिळ पुस्तकं मिळू शकतील पण किम्मत मात्र नक्कीच अबब असेल.

बी खरंच अशी जुनी पुस्तकं सहजा सहजी मिळत नाहीत ही खेदाची बाब आहे. आपल्या इथे ग्रंथाल्यांमधून सुद्धा असली पुस्तकं मिळणं कठीण आहे. सुनीता बाईंच्या एका पत्रात जी एंना हवं असलेलं एक पुस्तक पुणे विद्यापीठाच्या ग्रंथालयात असल्याचा उल्लेख आहे. त्या म्हणतात की वीस पंचवीस वर्षात ते पुस्तक कोणी नेलेलंच नाही पण तरिही ते जी एंना पाठवण्यासाठी सुनीताबाईंना आपल्या नावाचा उपयोग करावा लागला. इतकं वाईट वाचलं वाचताना!

माझ्या जुन्या रंगी बेरंगीत पुस्तकांबाबतची माझी स्वप्नं लिहिली होती. आताशा एक नवीनच स्वप्न आहे.
कुठे तरी एक ऑन लाईन लायब्ररी असावी. यच्चयावत मराठी पुस्तकं , मासिकं, दिवाळी अंक , ग्रंथ संग्रह, मान्यवरांची भाषणे, वर्तमान पत्रातील लेख हे सगळं तिथे क्रॉस रेफरंस सकट असावं. वर्षाकाठी परवडेल अशी वर्गणी असावी. शब्दांचं सायटेशन शोधण्याची सोय असावी. मी आनंदाने तुझी अन माझी वर्गणी भरेन.

'कळ्यांचे निश्वास' ची प्रस्तावना वाचत होते. त्यात तेंव्हाच्या स्त्री लेखिकांची नावं वाचली जी मी कधी ऐकली नव्हती. त्यांची पुस्तके कुठे बरे मिळतील असा विचार चालू आहे सध्या.

खरं तर वाचकांनी एकत्र येऊन जुनी पुस्तकं पुन्हा एकदा छापली जावीत म्हणून प्रकाशनाकडे विनंती करायला पाहिजे. किती किती पुस्तकं सापडत नाहीत. संदर्भ मात्र कितीतरी ठिकाणी येतात त्या पुस्तकांचे पण पुस्तकं काही सापडत नाहीत. देशात गेल्यानंतर अशी पुस्तकं ग्रंथालयात आढळली तरी ती वाचून किंवा नक्कल प्रत घेण्याइतपत वेळ नसतो.

बरं आता मी माझ्या स्वाक्षरी मधे दोन संकेतस्थळ टाकणार आहेत. तिथे जाऊन एक फार मोठे दालन वाचकांना आढळणार आहे Happy अत्यंत जुनी मराठी पुस्तकं तिथे ठेवलेली आहेत. फक्त डाऊनलोडचा गहन प्रश्न आहे. मला हवे असलेले सावरकरांचे कमला हे खंड्काव्य मला तिथेच मिळाले.

निकुंबांचे सर्व कविता संग्रह आणि पद्मा गोळेंची सर्व काव्यसंग्रह मला हवे आहेत. निकुंबाची चंदन कविता मी किती दिवसांपासून शोधत आहे. साठ आठ वर्ष झालीत मला ही कविता हाती लागत नाही आहे Sad

मला असे ऑनलाईन ग्रंथालय मिळाले की मी आधी तुला कळवेन Happy

त्या माणसाला सांगायला हवे की असा एक स्वतंत्र व्यवसाय तो काढू शकतो. ऑनलाईन ग्रंथालय उघडू शकतो.