Submitted by सुमुक्ता on 10 August, 2014 - 02:41
मळभ सरले दाटलेले, आभाळाच्या अंगणी
बरसून झड गेली, लुकलुकली शुक्राची चांदणी
कोलाहल भावबंधनांचा, दूर मागे राहिला
सुटला रेशमी गुंता, कल्लोळ हृदयीचा थांबला
डोहात शांततेच्या खोल, सावकाश उठले तरंग
साद कानी ओमकाराची, जसा राउळीचा घंटानाद
विराट अन अथांग मनाचा, शुद्ध झाला आरसा
साठले ब्रह्मांड हृदयी, साक्षात्कार हा चिरंतनाचा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त!
मस्त!
विराट अन अथांग मनाचा, शुद्ध
विराट अन अथांग मनाचा, शुद्ध झाला आरसा
साठले ब्रह्मांड हृदयी, साक्षात्कार हा चिरंतनाचा >>>>> क्या बात है ....