उद्धटपणावर इलाज

Submitted by उडन खटोला on 10 August, 2014 - 02:38

अनेक कुटुंबात घरातील लहान मुले, टीनेजर्स, तरूण मुलेमुली ही काहीवेळा विचित्र वागतात...आईवडीलांचे ऐकत नाहीत, व्यसनाधिनतेकडे वाटचाल सुरु होते किंवा घरातलं वागणं विचित्र बनतं, उध्दटपणे उत्तरे देतात तेव्हा पालकांनी भगवतगीतेतील पुढील मंत्राचा उपयोग करुन पहावा...काही काळातच फरक नक्की दिसुन येईल ( उत्तम संस्कार,सुसंवाद आणि शिस्त यांच्या जोडीने हा प्रयोगही अवश्य करुन पहा)

१) दिलेल्या मंत्राचा जप संबंधित मुलामुलींनी स्वत: रोज किमान ११ वेळा जप करणे योग्य असेल. रोज सकाळी आंघोळीनंतर मंत्राचा जप पूर्वाभिमुख बसुन श्रध्देसहित ११ वेळा करावा आणि भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करावे
२) मुलगा किंवा मुलगी हा मंत्रजप करायला तयार नसतील तर आईवडील किंवा पालकांनी मुलांच्या नावे संकल्प करुन "माझा मुलगा/मुलगी चि.XXX याला उत्तम बुध्दीप्राप्ती होऊन, त्याची/तिची सन्मार्गाकडे वाटचाल सुरु व्हावी, त्याला/तिला सदबुध्दी प्राप्त होऊन, वाईट/अशुभ/असंस्कृतिक/अनैतिक गोष्टींपासुन त्याचे संरक्षण व्हावे" असा संकल्प करुन रोज सकाळी आंघोळीनंतर ११ पेक्षा अधिक म्हणजे ३३ किंवा १०८ वेळा या मंत्राचा जप मनापासुन करावा व भगवान श्रीकृष्णांचे स्मरण प्रार्थना करावी.

३) या मंत्र सुवाच्च अक्षरात नीट लिहुन मुलांच्या अभ्यासिकेत किंवा जिथे त्यांची नजर जाईल अशा कुठल्याही ठिकाणी/भिंतीवर लॅमिनेशन करुन/फोटोफ्रेम करुन लावावा. जेणेकरुन त्या मंत्रावर लक्ष जाऊन आपोआप वाचन होऊ शकेल

मंत्र:- ॥ नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत ।
स्थितोsस्मि गतसन्देह: करिष्ये वचनं तव ॥ (अध्याय १८, श्लोक ७३)

( अर्थ:- हे अच्युत (भगवान श्रीकृष्ण) तुमच्या कृपेने माझा मोह नष्ट झालेला असुन मला उत्तम, सत्य अशी स्मृती प्राप्त झालेली आहे. मी संदेहरहित होऊन तुमच्या आज्ञेचे पालन करेन )

** . या मंत्राने विवेकजागृती होऊन, मुले सन्मार्गाकडे वळतात. बुध्दी-ज्ञान-स्मरणशक्तीतही वाढ होते. स्वभाव बदलतो, स्वभावातील अहंकार,माज,मुढता,अविवेक, उध्दटपणा हळुहळु नष्ट होऊ लागतो. मंत्रशक्तिवर ज्यांची पुर्ण निष्ठा आहे, त्यांनी संपुर्ण श्रध्देसहित भगवान श्रीकृष्णांना शरण जाऊन या मंत्राची उपासना करावी आणि फरक पड्ताळुन पहावा ही विनंती**

(((जपसंख्येच्या पेक्षा जास्त कितीही जप केला तरी चालेल. अधिकस्य अधिकं फलं या उक्तिनुसार जप जास्त करायला हरकत नाही)))

**लोककल्याणार्थ ही पोस्ट माझ्या नावासहित शेअर करावी ही नम्र विनंती***

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)
ज्योतिष-भाग्यरत्न मार्गदर्शक

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

अरेच्चा ! उद्धटपणा तर आवश्यक गुण वाटू लागला आहे. Lol

हा शब्द उच्चारल्याने जे नाव आठवतेय त्यांच्यावर या मंत्राने परिणाम होईल का हे पहायला पाहीजे.

उगाच संस्कृतमधे आहे म्हणून मंत्र होत नाही. तो श्रीमद्भगवद्गीतेतला एक श्लोक आहे. त्याला मंत्रत्व कसे आले?
प्रत्येक गोष्टीला मंत्राची गरज नसते. लहानपणापासून उद्धटपणे बोलू नये असे नीट सांगितले, नम्रपणे पण ठामपणे आपले मत कसे मांडावे याचे शिक्षण दिले तर बरे.
त्यातून जरा बारा तेरा वर्षे झाल्यावर मुला मुलींना स्वतःच्या वेगळेपणाची जाणीव होते, आईबाबांचे मत पटेनासे होते, त्यावेळी आईबाबांनी नीट समजूत घातली नाही तर उद्धटपणा वाढतो.
आपल्याकडे पूर्वी लहानपणापासून अनेक गोष्टींचे पाठांतर करण्याची पद्धत होती. त्या गोष्टी नकळत जरी मनात ठसल्या तरी योग्य वेळी त्यातून मार्गदर्शन होऊ शकते - जसे इंटरनेटवर उदंड माहिती भरून ठेवली आहे, आयत्या वेळी पटकन सापडण्याची सोय आहे. ती भरताना असा विचार केला नाही की का भरतो आहे.

आपला मेंदू तर कुठल्याहि संगणकापेक्षा जास्त हुषार आहे. मेंदूच्या कप्प्यात ठेवलेल्या गोष्टी पटकन सापडवण्याची सोय आहे, या संगणकाचे मेमरी १२८ जीबी पेक्षा अनेक पटीने जास्त व इन्टरनेट वेग कुठल्याहि टी ३ लाईन, सॅटेलाईट पेक्षा जास्त आहे. संगणकापेक्षा शिकणे जास्त सोपे आहे, सुरुवातीला पालकांचे थोडे मार्गदर्शन पाहिजे.

त्यातून जरा बारा तेरा वर्षे झाल्यावर मुला मुलींना स्वतःच्या वेगळेपणाची जाणीव होते, आईबाबांचे मत पटेनासे होते, त्यावेळी आईबाबांनी नीट समजूत घातली नाही तर उद्धटपणा वाढतो.>> अनुमोदन. किंवा त्यांची मते आपल्यापेक्षा वेगळी असल्याने ती आपल्याला उद्धट वाटतात.