अविवाहित मुलीला निवर्तलेल्या वडीलांची पेन्शन मिळणे सबंधी कायदा

Submitted by हर्ट on 8 August, 2014 - 15:38

मागिल महिन्यात माझा भाऊ गेला. त्याला पहिल्या पत्नीपासून २४ वर्षाची एक मुलगी आहे आणि दुसर्‍या विवाहाची पत्नी. तो गेल्यानंतर त्याची पेन्शन ह्या दोघींना अर्धी अर्धी मिळावी असे आम्हा सर्वांना वाटत आहे पण आपले कायदे नक्की कसे आहेत हे माहिती नाही. मी एकदा पेन्शनच्या कार्यालयात प्राथमिक चौकशी केली. ते म्हणालेत अविवाहित मुलीला फक्त वय २४ असे पर्यंतच पेन्शन मिळते त्यानंतर मिळत नाही. बायकोला मात्र आयुष्यभर पेन्शन मिळते. मला हा कायदा खूप ईलॉजिकल वाटला. वयाची अट २४सच का कळले नाही. निदान मुलीचे लग्न होईपर्यंत तिला पेन्शन मिळेल इतपत तरी कायदा असायला हवा होता. असो. इथे जर ह्यासबंधात काही मोलाची टिप देता आली तर मी तसे प्रयत्न करेन. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी, ज्या व्यक्तीस पेन्शन होती ती निर्वतल्यावर त्याच्या/तिच्या बायकोला वा नवर्‍याला उदरनिर्वाहासाठी पेन्शन असते. या मागचा तर्क असा की नवरा वा बायको हे त्या व्यक्तीच्या पेन्शनवर उदरनिर्वाहासाठी ती व्यक्ती हयात असतानादेखील अवलंबून होते. त्याच न्यायाने त्या व्यक्तीच्या मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या वयापर्यंत (जसे आई वा वडिल हयात असताना मदत करतील) पेन्शनची सुविधा देत असावेत. एका विशिष्ट वयानंतर जिथे स्वतःच्या पायावर उभे असणे व उदरनिर्वाहाचे साधन स्वतः मिळवलेले असणे अपेक्षित आहे तदनंतर पेन्शन देणे थांबवणे योग्य वाटते आहे.

http://profit.ndtv.com/news/corporates/article-widowed-divorced-daughter...
ही एक केस मिळाली, या बातमीत दिलेल्या विधानातून नीट अर्थबोध झाला नाही पण ही केस शोधून आणखी सर्च केलास तर योग्य माहिती मिळेल असं वाटतंय.
निधनाच्या वेळी २५ वर्षापेक्षा कमी, अपंग असेल तर तहहयात अवलंबून असलेली मुले किंवा घटस्फोट झालेल्या व्यक्तीकडे राहणारी आणि अवलंबून असलेली मुले यांना पेन्शन मिळेल असं वाटतय.

इथे फॅमिली पेन्शनसाठी प्राधान्यक्रम दिला आहे.
त्यानुसार १) जोडीदारा २) १८ वर्षापर्यंतचा मुलगा २) २१ पर्यंतची अविवाहित मुलगी ४) .....

असा क्रम आहे.

दोन बायकांबद्दल In case of more than one wife, the eldest surviving wife of the deceased government servant is to be paid family pension.Here, the term eldest should be construed with reference to the seniority according to the date of marriage with the deceased government servant and not with reference to the age of the widow.

पीएफ बरोबर मिळ्णार्‍या फॅमिली पेन्शन साठी हा रूल आहे. मायनर मुलाला २५ वयापरेन्त फॅमिली पेन्शन मिळते. लाइफ सर्टिफिकेट सबमिट करताना विडोजना नॉट रीमॅरीड हे पण सबमिट करून द्यावे लागते. दोघींना सामंजस्याने अमाउंट शेअर करता येइल. जरी एका आईवर पूर्ण अमाउंट वर्ग झाली तरी. २५ परेन्त मूल मायनर राहात नाही. स्वतः कमवि ते होते अशी धारणा असावे.

पहिली पत्नी ह्यात आहे का? असा उल्लेख वर आढळला नाही. पहिल्या पत्नीशी डिव्होर्स झाला होता का?
नसेल तर दुसर्‍या पत्नीचा पेन्शन संदर्भातील कायदेशीर स्टेटस तपासुन पहायला पाहिजे

+१ मुग्धानंद. पहिली पत्नी हयात आहे का, घटस्फोटित आहे का यावर काही गोष्टी अवलंबून राहतील. पत्नीला फॅमिली पेन्शन तहहयात मिळते, पण मुलगे-मुली यांना १८ आणि २१ वर्षे ही मर्यादा आहे.

बी, भाऊ गेल्याचे ऐकून वाईट वाटले. Sad

दुसर्‍या पत्नीला जर पूर्ण पेन्शन मिळत असेल तर कायद्यानं न जाता सामंजस्यानं मिळून दुसरी पत्नी आणि तुझी पुतणी या दोघांमध्ये अर्धी वाटून घेता येते का तेही बघ.

बी, भाउ नोकरि चालू असताना गेला का पेन्शनर असताना ? नोकरि चालू असताना गेला असेल तर अनुकंपा तत्वावर तुझ्या वहिनी किंवा भाची ला नोकरी मिळायला हवी ना? पुर्वी मिळत असे, ते आता बंद झाले का?

निदान मुलीचे लग्न होईपर्यंत तिला पेन्शन मिळेल इतपत तरी कायदा असायला हवा होता. असो. >> लग्न हे उपजीविकेचे साधन नव्हे. मुलीला उपजीविकेसाठी सक्षम होईपर्यंत पेन्शन मिळाले असते तर बरे झाले असते असा तुमचा म्हणण्याचा हेतू असावा.
नंदिनी म्हणतात त्याप्रमाणे दुसरी आई आणि मुलगी ह्यांना सामंजस्याने प्रश्न सोडवता आला तर बरे. अगदी अर्धे अर्धे नाही झाले तरी आईने मुलीला सक्षम होण्यासाठी (शिक्षण, व्यवसाय इ.) मदत करावी. पूर्वी टीव्हीवर एक "किरण बेदी कि अदालत" असा शो यायचा. वैयक्तिक सम्बन्ध, नैतिक जबाबदारी आणि कायदा यांची सांगड त्या घालायच्या. तसे कुणी जाणकार व्यक्ती सलोख्याने सोडवेल तर सगळे सुखी होतील.