हम हैं मता-ए-कूचा-ओ-बाजार की तरह... या गाण्याचा अर्थ.. आणि रसग्रहण...

Submitted by mansmi18 on 6 August, 2014 - 11:10

नमस्कार,

आताच थोड्या वेळापुर्वी मदनमोहनची आठवण आली आणि
हम हैं मता-ए-कूचा-ओ-बाजार की तरह.. हे दस्तक (१९७०) मधील गाणे आठवले..
http://www.youtube.com/watch?v=8DJxsY8l1FM
मजरुह सुल्तानपुरी यांनी लिहिलेले हे गीत आणि लताचा स्वर आपल्याला वेगळ्याच विश्वात घेउन जातो.

उर्दुतले जाणकार या गाण्याचा अर्थ (बर्‍याच शब्दांचा अर्थ माहित नाही) ..आणि संगीतातले जाणकार या गाण्याच्या स्वरांबद्दल लिहितील तर वाचायला मजा येइल. कृपया लिहाल का?

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

याला एक उपसूचना आहे. खरेतर उर्दू शायरी हा आस्वाद घेण्याचा एक स्वतंत्र विषय आहे. आपणामध्ये कोणी जाणकार असतील तर एखादा धागा सुरू करावा, किवा याच धाग्याचा वापर करावा. Happy

सुंदर गाणे. माझ्या तुटक्या-फुटक्या उर्दु समजुतीप्रमाणे -

मता-ए-कुचा-ओ-बाझार = बाजारातली एखादी वस्तु
कुए-तिस्नगी = तहानेची विहिर ( प्रेमाची तहान)
दौलत्-ए-बेदार = अचानक मिळालेली संपत्ती
राहे-रफ्तगा = जे या मार्गावरून गेलेत
नक्शे-पा = पाऊलखुणा
हुनर्-ए-नाखुन्-ए-जुनून = वेडाची पद्धत्/कौशल्य
लबो-रुखसार = ओठ आणि गाल
एहेल-ए-वफा = प्रेमी

एकदा हे शब्द कळले तर गजल कळायला सोपी आहे. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!

हम है मता-ओ-कूंचा-ओ-बाजार की तरह
उठती है हर निगाह खरीदार की तरह

मी बाजारातील एखाद्या विकाऊ पूंजी किंवा मालमत्तेच्या वस्तूसारखी आहे.
प्रत्येकजण एखाद्या खरेदीदाराप्रमाणे माझ्याकडे बघतो.
======

वो तो है कहीं और मगर दिलके आसपास
फिरती है कोई शय निगाहे-यार की तरहा

तो (प्रियकर) तर कुठेतरी इतरत्र आहे ......पण हृदयाच्या आसपास
एखादी गोष्ट त्याच्या नजरेसारखीच जाणवत राहते
=======

इस कू-ए-तश्नगीमे बहुत है के एक जाम
हाथ आ गया है दौलत-ए-बेदार की तरहा

ह्या तृष्णेच्या गल्लीत खूप आहे की एक प्याला
जागृतावस्थेच्या आनंदाप्रमाणे हातात आला आहे

=======

सीधी है राह-ए-शौक पर यूंही कभी कभी
खम होगयी है गेसू-ए-दिलदार की तरहा

प्रेमाची वाट खरे तर सरळ आहे पण कधी कधी
वाकडी (कुरळी) झालेली आहे प्रेयसीच्या केसांसारखी

======

अब जा के कुछ खुला हुनर-ए-नाखून-ए-जुनून
जख्मे-जिगर हुवे लब-ओ-रुखसार की तरहा

आता कुठे उन्मादाच्या नखांचे कसब समजले
हृदयाच्या जखमा (प्रेयसीच्या) ओठ आणि गालांसारख्या (लालेलाल) झाल्या

(अर्थ - विरहात असलेला प्रेमाचा उन्माद इतका वाढला की स्वतःच्याच हृदयाच्या जखमा खरवडत बसलो आणि त्यामुळे त्यांचा रंग प्रेयसीच्या ओठांप्रमाणे आणि गालांप्रमाणे झाला, तेव्हा समजले की आपल्या उन्मादाचे कसब काय आहे. खरे तर जिगर म्हणजे लिव्हर असे म्हणतात, पण तसे मराठीत म्हणत असल्याचे ऐकीवात नसल्याने हृदय लिहिले)

================

'मजरूह' लिख रहे है वो अहले-वफा का नाम
हमभी खडे हुवे है गुनहगार की तरहा

मजरूह, बघ ती (तिच्या) प्रियकराचं नांव लिहीत आहे (जणू आरोपपत्रावरच नांव लिहीत आहे)
(आणि मीही बघ कसा, जणू प्रेम केलं म्हणजे गुन्हाच केला असावा तसा) मीही गुन्हेगारासारखा उभा राहिलो आहे

==============

- 'मजरूह' सुलतानपूरी

अजनबी कौन हो तुम ? या गीतातल्या पहिल्या कडव्यामधे एक शब्द नक्की काय आहे ?
ऐसा लगता हैं के बरसोंसे शनाक / शमा / शाम आयी हैं ???

धन्यवाद बेफिकीर! Happy

लताबाईंनी गातांना 'हम है मता-ए-कूंचा बाजार की तरह' असं गायलंय. मधला ओ गाळून टाकलाय. काही कारण असावं का?

आ.न.,
-गा.पै.

सुलु... या शब्दार्थांमूळे छानच अर्थ लागतो.
मल नीट आठवत असेल तर चित्रपटात रेहाना, मनाविरुद्ध ( नवर्‍याच्या आणि पाहुण्याच्या आग्रहामूळे ) हे गाणे म्हणते.

चित्रपटाच्या कथानकाच्या पार्श्वभूमीवर या गाण्याचा अर्थ एका वेगळ्याच पातळीवर पोचतो.
हमीद (संजीवकुमार) आणि (सलमा) रेहाना सुलतान या जोडप्याला राहायला जी जागा भाड्याने मिळते तिथे पूर्वी एक तवायफ तिचा कोठा चालवत असे. त्यामुळे या जोडप्याकडेही त्याच प्रकारे पाहिले जाते. (चित्रपटाचे नाव : दस्तक याचसाठी) कोणीही ते विवाहित जोडपे आहेत हे मान्य करायला तयार नसते. त्यांना अनेक प्रकारे हैराण केले जाते. त्यातच सलमाला गाण्याची आवड असल्याने संशयात भर पडते.
एका रात्री एक गिर्‍हाईक गाणे ऐकायला म्हणून येतो. नवर्‍याच्या इच्छेविरुद्ध सलमा गाते आणि आपल्या व्यथा मांडते.
हम हैं मता-ए-कूचा-ओ-बाजार की तरह
उठती है हर निगाह खरीदार की तरह

हलकीफुलकी गाणी लिहिणारे यमकांची टाकसाळ उघडणारे मजरुह या चित्रपटासाठी काही विलक्षण काय लिहून गेले. माई री मैं का से कहूं आणि बैंया ना धरो ओ बलमा या दोन्ही गाण्यांतले काव्यही विलक्षण आहे.

रश्मी.., हो खरंय! फारच बारकाईने ऐकावं लागतं. नुसत्या गाण्यावर ओ ओळखणे अवघड पडावे! धन्यवाद! Happy
आ.न.,
-गा.पै.