कवडसे

Submitted by kedar_j on 6 August, 2014 - 07:20

रुपेरी उन्हाचे
लव्हाळी मनाचे
तुझ्या सावलीशी
निजावे कवडसे II १ II

इथे सांजवेळी
आणि पावसाळी
मनाने मनाचे
भिजावे कवडसे II २ II

निळ्या चांदराती
निळ्या तारकांचे
तुझ्या पापणीशी
सजावे कवडसे II ३ II

जरी लाट जावो
कुठेही निघोनी
उरावा किनारा
उरावे कवडसे II ४ II

अशा या किनारी
तुझे बिंब भेटे
तिथे पावलांचे
रुजावे कवडसे II ५ II

Group content visibility: 
Public - accessible to all site users