मध्यंतरी आमच्या भाचीच डोहाळ- जेवण होत. तेव्हा सगळे म्हणाले ,''मामी तुमच डोहाळे- गीत ऐकवा न , '' मी आमच्या कन्येच्या डोहाळ -जेवणाच्या वेळेला माझ मनोगत व्यक्त केल होत. [काव्यात ] . तिला शुभेच्छा- कार्ड [ग्रिटींग ] म्हनुन ते दिल होत. पण आता ते निट आठवतही नव्हत . पण जुने अलब्म पहात असतांना त्या ग्रीटींगचा फोटो सापडला. त्यावरुन ते गीत ऐकवल सर्वांना. ते येथे देत आहे.. ७-८ वर्षापुर्वीच आहे ते. समस्त मातांच्या भावना त्यातुन व्यक्त होतील. पुन्;प्रत्ययाचा आनंद घेता येइल व कुणाला गरज पडली तर उपयोगहि होइल अस वाटत.
                                ''
                                     आईचा  आशिर्वाद''
                   ''युगानुयुगाचे  संबंध--- ऋणानुबंधाच्या  गाठी
                           निसर्ग  सज्ज  झाला--- बाळाच्या  स्वागता साठी
                     हिरवळीचा   शालु  नेसुन  सजुन  बसली   अवनी
                         दरवळला  परिमल  ---बहरली  रातराणी
                       पक्षी  करतात  किलबिलाट---पक्वांनानी  भरल  ताट
                     आशिर्वादाच्या  पायघड्यानी--- सुशोभित  सारी    पाउलवाट
                     शुभेच्छांना  संगे    घेउन  --- आप्तेष्ट   नि   मैत्रिणी
                         आले  सगेसोयरे   ----  आणि  सार्या   महिला  भगिनी
                      आशिर्वाद   मनोमनी--गातात   स्वागताची     गाणी
                        सुखावली    नख-शिखांत--- आमची  ही  फुलराणी
                  पाना-फुलांनी  सजलेला  झुला--- डोकावुन  पुसतो  राणीला
                     सांग  ना  ग  मला---  केव्हा  बघेन  बाळाला
                संपत  आली   प्रतिक्षा--- समिप  आली  ही  शुभवेळ
               सांगती  बदाम- खारका---  संत्री  मोसंबी  नि  केळ
              यांचा  अस्वाद  घेताच --- होशील  तु  संतुष्ट
              बाळराजाहि  हसतमुख ---नि  होइल  धष्ट-पुष्ट
              उगवला  चंद्रमा  गगनी --- तोहि  कुजबुजतो  चांदण्याच्या  कानी
             कोण  असेल  ग?--- या  स्वागताचा  धनी.
            असेल  का  चक्रपाणी?--- कि  येइल  आमची  राधाराणी
            कोण  असेल?---माताही  चिंतीते  मनी
            प्रार्थिते  ती  जगत-जननी ---  म्हणते   असो  कुणीही----
         असु  दे  आरोग्य-संपन्न--- सुद्रुढ,  नि  सदगुणी
     उजळो  वंशाचा  दिवा--- वाढो  कीर्ति  त्रिभुवनी
     चिमुकल्या  पावलांनी--- सुख  नाचु  दे  अंगणी
      हेच  मागण  परमेश्वरा--- नत-म्स्तक  तव  चरणी
नतमस्तक तव चरणी.
 
आता पुर्ण झाल. त्या
आता पुर्ण झाल. त्या परिस्थितीच , त्या वेळच्या भावना व्यक्त करण्याचा एक प्रयत्न. कस वाटल कळवाल.
फोटोही देणार होते.
फोटोही देणार होते. मिळाल्यास देइन.
छान आहे., आवडली.
छान आहे., आवडली.
धन्यवाद आशिका.
धन्यवाद आशिका.
प्रभा ताई... खुप छान,
प्रभा ताई... खुप छान, भावनान्मक आहे..
छानच आहे.
छानच आहे.
धन्यवाद सायली, कविता.
धन्यवाद सायली, कविता.
धन्यवाद सायली, कविता.
धन्यवाद सायली, कविता.
धन्यवाद सायली, कविता.
धन्यवाद सायली, कविता.
एक प्रश्न आहे, अधिक मासात
एक प्रश्न आहे, अधिक मासात किंवा ८व्या महिन्यात डोहाळजेवण करू शकतो का..
छान आहे. योग्य वेळी वापरेन.
छान आहे. योग्य वेळी वापरेन.