अहो जावईबापू .. ए सूनबाई ऽऽ

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 July, 2014 - 15:02

आपल्याकडे अगदी प्राचीन काळापासून प्रत्येक सासू सासरे हे वयाने मोठे असून (आईवडीलांच्याच वयाचे असून) सुद्धा आपल्या जावयाला अहो जाहोच करतात.

पण तेच सासू सासरे आपल्या सुनेला मात्र खुश्शाल अरेतुरे करतात.

भले मग ती सून त्यांच्या जावयापेक्षा वयाने, कर्तुत्वाने वा सर्वच बाबींनी मोठी का असेना?

यामागचे नेमके कारण काय ?

पुरुषप्रधान संस्कृती ?

जावई आपल्या मुलीला नांदवतो म्हणजे आपल्यावर उपकार करतो आणि आपण सूनेला नांदवतो हे तिच्यावर उपकार करतो अशी काहीशी भावना ?

आणखी काही ?

मी स्वताच कनफ्यूज असल्याने तुर्तास स्वताचे मत मांडत नाही.

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हल्ली शहरात तरी कुणी जावयाला "अहो-जहो" फारसे करीत नाही. पूर्वी जावई सासर्याला समवयस्क सुद्धा असायचे. तेव्हा "अहो" म्हणायचे.

सीमंतिनी,
शहरात राहणारी लोकसंख्या कमी आहे/असावी गावखेड्यांच्या तुलनेत. तरीही शहरी आणि आपल्या मराठमोळ्या मध्यमवर्गीय समाजाचा विचार करताही बहुतांश ठरवून केलेल्या लग्नात वा प्रेमविवाहातही सासूसासरे आणि जावयांमध्ये जेमतेमच संवाद असेल तर जावयाला अहोजाहोच होते. (माझे अनुभवण्यात तरी असेच आहे) मात्र सूनेचा उल्लेख हमखास शतप्रतिशत एकेरीच असतो. (ज्या घरात लहानग्या मुलांनाही आप बोलायची सवय असते अश्यांना इथे काऊंट नको करूया)

तरी तुम्ही म्हणता त्याचे नेमके टक्केवारीत प्रमाण सांगायचे म्हटले तर अंदाजे काय आकडा घ्याल Happy

आता अहो काका- ए मावशी , अहो आजोबा- ए आजी, अहो साहेब- अरे देवा, नमस्कार हो मॅडम- उदे गं अंबे
असे नानाविध धागे काढता येतील.
Wink

.

ए आई आणि अहो आईवर कोण लिहिणार?
<पूर्वी जावई सासर्‍याला समवयस्क सुद्धा असायचे. तेव्हा "अहो" म्हणायचे.> म्हणजे (नवी)आई मुलामुलींना समवयस्क असणार ना? (कुंकू शिनुमातल्यासारखं) तिला अहो कसं म्हणता येईल; नाही का? पण नणंद-भावजयींचं व्यस्त वय त्यांना 'अहो वन्स, अगं वहिनी' असं म्हणताना आडवं येत नाही ते.
It's complicated.

ऋन्मेऽऽषना त्या तिथे पलीकडे बोलवायचं का साती? की आधीच आहेत ते तिथे? Wink

भरतभाई, प्रश्न वयाच्या आधीही नात्याचा आहे, आणि त्या आधीही तथाकथित स्त्री-पुरुष नातेसंबंधांचा.
हा अलीकडे पलीकडे संयुक्ता काय प्रकार आहे?

साती, नानाविध धागे, मी तरी नाही काढणार, फक्त बरेच दिवस मनात एक प्रश्न खदखदत होता त्याला वाट करून दिली इतकेच Happy

साती, नानाविध धागे, मी तरी नाही काढणार, फक्त बरेच दिवस मनात एक प्रश्न खदखदत होता त्याला वाट करून दिली इतके>>

हेच तर चुकलं तुमचं.
अगोदर एक उत्तर ठरवायचं आणि त्याकडे लीड करणारे संदर्भ देत प्रश्न मांडायचे मग धागा चालतो.
अभ्यास करा अजून.
संयुक्ता /अलीकडे/ पलीकडे म्हणजे काय याचंच उत्तर वर दिलंय.
'माहित नाही.'

ऋन्मेऽऽष >>>>>>>> तुम्ही जावई आहात ? तुम्हाला सुनबाई आहे.....?

वरील दोन्ही नसल्यास त्यावर चर्चा घडवुन आणण्यास आपण पात्र ठरत नाही... Biggrin

मायबोलीकरांच्यानियमा प्रमाने असे धागे काढण्यासाठी पात्र असने आवश्यक आहे
उदा. वाहतुक नियमावर लिहिण्यासाठी एकतर आपण स्वतः नियम पाळत असले पाहिजे अथवा अजिबात नियम पाळत नसले पाहिजे.... Wink

आता अहो काका- ए मावशी , अहो आजोबा- ए आजी, अहो साहेब- अरे देवा, नमस्कार हो मॅडम- उदे गं अंबे
असे नानाविध धागे काढता येतील.
>>>
साती, आमच्यात ए काका, ए मामा, ए मावशी, ए आजी , ए आत्या , ए मामी असचं असतं Happy

हो पण आत्याचे मिस्टर 'अहो' आणि मामाची बायको अग का असा मुद्दा चालेल

ऋन्मेऽऽष
>>>
अगदीच अवांतर पण तुमची शैली सेम मायबोली वरच्या अंड्या या आयडी सारखी आहे हो Wink
अंड्याच्या मालकाला Light 1
(आय नो यू डोन्ट नीड इट तरीही:) )

आमच्या साबा मला अहो-जाहोच म्हणतात Proud
मागे नाही म्हणत तो भागे वेगळा Wink

प्लीजच नोट, त्या मात्र मुलाला अरे-तुरेच म्हणतात

<<आता अहो काका- ए मावशी , अहो आजोबा- ए आजी, अहो साहेब- अरे देवा, नमस्कार हो मॅडम- उदे गं अंबे
असे नानाविध धागे काढता येतील>> +१.
आधीच बेफिनी ए आई आणि अहो बाबा यावर धागा काढलाच आहे Happy

<आमच्या साबा मला अहो-जाहोच म्हणतात>

म्हणजे त्या तुम्हाला परकं मानतात आणि त्यांना तुमच्याबबात (स्वतःच्या) मनाविरुद्ध वागावं लागतंय.
Light 1

वर्षा,
भारीये, पण याला आदर्श स्थिती म्हणता येईल का हा परत प्रश्न उभा राहिला Wink

मुग्धटली,
ज्याला जे संबोधण योग्य वाटत त्यान ते संबोधाव उगाच धागे काढुन चर्चा कसल्या करत बसताय...
>>>>>
बरेचदा योग्य वाटत नसूनही तसे संबोधावे लागते, किंवा आपल्याला योग्य वाटणार नाही अश्या पद्धतीने आपल्याला संबोधले जाते. तर कित्येकदा इतर लोक एखाद्या नात्यात अमुकतमुक प्रकारेच संबोधतात म्हणून नाईलाजाने आपल्यालाही ते शिष्टाचार असल्यागत पाळावे लागतात. चर्चा तर होणारच Happy

पण याला आदर्श स्थिती म्हणता येईल का हा परत प्रश्न उभा राहिला >> अच्छा म्हणजे असे मुद्दाम वागले जातेय होय. थांब आज सुनवास सुरु करतेच Proud

ऋन्मेष, इथे चर्चा करुन नाईलाजाने पाळावे लागणारे शिष्टाचार बदलता येणारेत का?

मुग्धटली,
पिढी दर पिढी बदल हे घडतच असतात, काही चांगले काही वाईट, तर काही कमीजास्त प्रमाणात.
चर्चा या बदल घडवण्याच्या प्रक्रियेत कॅटालिस्टचे काम करते, तसेच कुठले बदल घडवणे आवश्यक आहे आणि कुठले अनावश्यक हे सुद्धा लोकांपर्यंत पोहोचते.

उदयन,
ऋन्मेऽऽष >>>>>>>> तुम्ही जावई आहात ? तुम्हाला सुनबाई आहे.....?
>>>>>

जावई डेफिनेटली होणारच, पण माझ्या नशीबी सूनबाईंचे सूख आहे की जावयाचा जाच हे तर येणारा काळच ठरवेल..
सू सू जा जा वाह मस्त यमक जुळले Happy

रीया, या प्रकाराला काहीतरी म्हणलं जात असेलच ना. मला तो शब्द माहीत नसल्याने भावना पोचवायला यमक हा शब्द वापरला आणि भावना पोहचवल्या. आता तुमच्यासारखा कोणीतरी दुर्रुस्तही करेलच Happy

तुमच्यासाठी एक अवांतर माझेही - तुमचे नाव ऐकून मला एक मराठी मालिका आठवली. ज्यात त्यातील हिरोचे नाव "राया" आहे Proud
तुमच्या नावावर नाही हसलो हा, मला ते मुलाचे नाव राया बघून हसायला येते Wink गैरसमज नसावा.

राया.. ये भी कोई नाम है यारा ... (राया-यारा .. या अलटीपलटी प्रकाराला काय म्हणावे आता Uhoh )

आणखी एक योगायोग बघा, त्या मालिकेचे नाव सुद्धा "जावई" विकत घेणे आहे .. मज्जाच आहे सगळी Happy

आता पुन्हा विषयावर येऊया, घरजावयालाही अहो जाहो करतात लोकं. काय ती खोलवर रुजलेली पुरुषप्रधान संस्कृती !

सू सू जा जा = हे रुबाईच्या नियमांत बसते.

अर्थ एक - शू लागली आहे तर लवकर जा

अर्थ दोन = काय? हो हो, जा! (गुजराथी लोकांचे नाशिकला स्थलांतर ह्या पार्श्वभूमीवर)

अर्थ तीन = हे सर्दी, कृपया लवकर जा, मला खूप कामे आहेत.

, मला ते मुलाचे नाव राया बघून हसायला येते डोळा मारा गैरसमज नसावा.

राया.. ये भी कोई नाम है यारा ... (राया-यारा .. या अलटीपलटी प्रकाराला काय म्हणावे आता अ ओ, आता काय करायचं )
या रायात एवढं काय वैचित्र्य आहे ते काय कळत नाही..बर्याच जणांना ते खटकतं.
रामराया देवराया हे अगदी वापरातले शब्द होते वडीलधार्यांच्या पिढीत.
बाकी मोल्सवर्थबाबा काय म्हणताहेत बघा..

राया (p. 693) [ rāyā ] m (राय King.) A title of majesty or grandeur, assumed by blades, swells, opium-eaters &c. in speaking pompously.

प्रचारक दोनहजारदोन, खटकले नाही, गंमतीशीर वाटले. अर्थात फॅन्सी नाव ठेवायचा जो सध्या ट्रेंड चालू आहे या मालिकांमध्ये त्यातूनच हे आलेय डोक्यात ..

साती,
भाऊ नाव नसेल हो, टोना असेल.

टोना नाही हो खना.
आमच्याबरोबरच होता त्यामुळे माहित्येय.
एक दादासाहेब पण होता.

राया जुनं नाव आहे. गडकर्‍यांच्या (राम गणेश) राजसंन्यास नाटकात आहे. संभाजीराजांचा ड्युआयडी म्हणून त्याला मुघलांना सापडू देतात.
त्याच्या विरहात त्याची प्रेयसी गाणं म्हणते त्यातही पुन्हा पुन्हा आले आहे - भासे जनात राया......

(इतिहासात त्याआधी) तानाजीच्या मुलाचे नावही रायबा आहे.

मयेकर
राया नावाबरोबरच ज्या अभिनेत्याने हे नाव धारण केले आहे त्याच्या लुक्सबद्दलही लोकांना प्रॉब्लम आहे Lol Proud Wink
म्हणून चिडचिड

साती, माझ्या वडिलांना पण आम्ही भाऊ म्हणायचो ( ते त्यांचा टोपण नाव होत ) अगदी माझी आई पण अहो भाऊच म्हणत असे .त्यावरून माझा नवरा हसत असे. बायको नवर्याला भाऊ म्हणते म्हणून. मी म्हणायचे तुझी आई नाही का तुझ्या बाबांना "अहो बाबा" म्हणून हाक मारते मग ते काय तुझ्या आईचे बाबा आहेत का ?

असो जरा विषयांतर झाले नाही का ? Happy

सुजा,
आमच्या बिल्डींगमध्ये असेच एक मुलगा आपल वडीलांना काका अशी हाक मारायचा.
इथे तर त्याच्या वडीलांचे काका असे टोना सुद्धा नव्हते (आठवा राजेश खन्ना).
फक्त एकत्र कुटुंब पद्धतीमुळे त्याची मोठी चुलत भावंडे त्याच्या वडीलांना काका म्हणत असल्याने हा देखील सुरू झाला.

आता प्रश्न असा आहे की हि सवय वेळीच मोडली का जात नाही. किंवा ते विशेष गरजेचे वाटत नाही का ?

साती अगदी अगदी....
तसंच
बर्याच मित्रांचे नाव बाळासाहेब आहे...
लाडाने बायको नवर्याला काय म्हणत असेल असा प्रश्न बर्याचदा पडतो...
आणि जरासा अंत:पूरातला प्रश्न असल्याने त्या बाळ्यालाही विचारता येत नाही..

पुर्वी तर म्हणे सासरकडच्या पाळण्यातल्या लहान मुलाला सुद्धा "अहो अमुक तमुक" असे म्हणावे लागत असे.
एवढेच नव्हे तर कुत्र्याला "अहो कुत्रोजी" वगैरे. Sad

पूर्वी रिया साबण होता. पुछो न किसने जादू किया वो है रिया अशी जाहिरात यायची Wink Happy सबब रिया नाव प्राचीन आहे. कस काय ऐकल नाही? (अजून वेळ गेलेली नाही - कल हो न हो बघा! त्यात पण रिया आहे)

ऋन्मेष : रिया हे नाव पहिल्यांदा ऐकलं की काय तुम्ही?
रच्याकने ते माझं खर नाव नाही

>>>>>>>>>>
काहीतरी गल्लत होतेय. तुम्ही आणि तुमच्या या प्रतिसादांवर प्रतिसाद देणार्‍यांनी पुन्हा एकदा माझा मूळ प्रतिसाद वाचावा. मी असे कुठेही म्हणालो नाहीये की हे नाव मी पहिल्यांदा ऐकलेय. फक्त ते नाव ऐकून मला मालिकेतील राया आठवला, कारण ते नाव आजच्या जमान्यातील मालिकेत मला फन्नी वाटले.

बाकी रीया नाव छानच आहे की, तुमचे खरे नाव असो वा नसो (कदाचित प्रिया वा सुप्रिया असावे), पण तुमच्या या प्रतिसादानंतर हे तुमचे नाव नाही हे मी स्वताच ठामपणे सांगू शकलो असतो.
कारण, तुम्ही आयडीवर रीया लिहिलेय आणि प्रतिसादात रिया. कोणीही आपले नाव लिहिताना स्पेलिंग मिस्टेक वा शुद्धलेखनाच्या चुका करत नाही Happy

सीमंतिनी,
कल हो ना हो आतापर्यंत सतरा-साडेसतरा वेळा बघून झालाय. त्यातील रिया का रीया ठाऊक आहे, साबणाची जाहीरात मात्र आठवत नाही. कदाचित माझे वय तितके प्राचीन नसावे Happy

Pages