अहो जावईबापू .. ए सूनबाई ऽऽ

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 July, 2014 - 15:02

आपल्याकडे अगदी प्राचीन काळापासून प्रत्येक सासू सासरे हे वयाने मोठे असून (आईवडीलांच्याच वयाचे असून) सुद्धा आपल्या जावयाला अहो जाहोच करतात.

पण तेच सासू सासरे आपल्या सुनेला मात्र खुश्शाल अरेतुरे करतात.

भले मग ती सून त्यांच्या जावयापेक्षा वयाने, कर्तुत्वाने वा सर्वच बाबींनी मोठी का असेना?

यामागचे नेमके कारण काय ?

पुरुषप्रधान संस्कृती ?

जावई आपल्या मुलीला नांदवतो म्हणजे आपल्यावर उपकार करतो आणि आपण सूनेला नांदवतो हे तिच्यावर उपकार करतो अशी काहीशी भावना ?

आणखी काही ?

मी स्वताच कनफ्यूज असल्याने तुर्तास स्वताचे मत मांडत नाही.

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages