Submitted by प्रमोद देव on 29 July, 2014 - 10:18
आपले पारंपारिक बालगीत ’ये रे ये रे पावसा’ मी मल्हारच्या अंगाने गाण्याचा प्रयत्न केलाय...ऐकून सांगा, माझा प्रयत्न कितपत सफल/विफल झालाय ते.
https://www.youtube.com/watch?v=-NpcO_YGpn8&feature=youtu.be
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त झालाय... छान वाटतंय
पैसा झाला खोटा मध्ये आर्जव आलंय ते ऐकून 'पाउस आला मोठा' वरच्या सा वर जाईल असं वाटलेलं.
धन्यवाद अमितव! मी रीतसर गाणं
धन्यवाद अमितव!
मी रीतसर गाणं शिकलेलो नसल्यामुळे ठरवून काही गाऊ शकत नाही... तू म्हटलंस तसं माझ्या मनातही आलेलं..पण नंतर सांधा जोडणं जरा कठीण वाटलं..म्हणून त्यातल्या त्यात सोप्या पद्धतीचा वापर केला.
बर्याचदा डोक्यात बरंच काही असतं पण आपला गळाही त्याला साथ देणारा हवा..हे अशावेळी आवर्जून लक्षात येतं.
मस्त जमलंय ! -दिलीप बिरुटे
मस्त जमलंय !
-दिलीप बिरुटे
देव काका, चांगला प्रयत्न
देव काका,
चांगला प्रयत्न आहे.
हे काहीसे बडबडगीत स्वरूपातले गाणे असल्याने मल्हारासारख्या गंभीर रागात कसे वाटेल? असा प्रश्न पडला होता.
पण चांगला प्रयत्न आहे.
सुरुवातीचा षड्ज चांगला लागला होता.
अवांतर- तानपुरा कोणता वापरलाय ह्यात?
सॉफ्टवेअर? की मशीन?
धन्यवाद चैतन्य! मी हा तानपुरा
धन्यवाद चैतन्य!
मी हा तानपुरा जालावरून उतरवून घेतलाय,,तबल्याचेही लूप वापरलंय...तेही जालावरूनच घेतलेलं आहे.
डाऊन लोड केले आहे घरी ऐकतो
डाऊन लोड केले आहे घरी ऐकतो