पुण्याजवळ १ दिवसासाठी पिकनिक, नवीन ठिकाण सुचवा...

Submitted by नानुअण्णा on 28 July, 2014 - 02:53

पुण्याजवळ १ दिवसासाठी वर्षाविहारासाठी जाण्यासाठी नवीन ठिकाण सुचवा . फार्म हाऊसेस् , रिसोर्ट सुचवा. आम्ही काही दिवसापूर्वी वेद फार्म्स, केळवडे, भोर, पुणे इथे गेलो होतो. छान आहें. त्यांचेच कमलिनी कुटीर सुद्धा चांगले आहे . सगळ्या वयोगटातील माणसे जावू शकतात .

इथे दुवा पहा … http://www.kamalinikutir.com/vedfarms.html

धन्यवाद ……

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. http://www.sentosaresortspune.com/water-park-amenities.html
२. मंत्र ( गुगळून घ्या. अलका जवळ ऑफीस आहे).
३. लोहगाव ला दोन छान स्पॉट आहेत.

तुम्हाला पिकनिक साठी कसा स्पॉट हवा, पिकनिकची कल्पना काय आहे याबद्दल सांगितलंत तर लोक्स सुचवतील. आवड निवड वेगळी असू शकते

>> आम्ही काही दिवसापूर्वी वेद फार्म्स, केळवडे, भोर, पुणे इथे गेलो होतो. छान आहें. त्यांचेच कमलिनी कुटीर सुद्धा चांगले आहे . सगळ्या वयोगटातील माणसे जावू शकतात .>>

वेद फार्म बद्दल अजुन सविस्तर माहिती द्याल का ?
रूम्स वगैरे कशा आहेत ?
रेट ?
जेवण ?
ई ई

पुण्याजवळ ५० ते ८० किलोमीटर परिघात, रिसोर्ट, सकाळी जावून, संध्याकाळी परत असे ठिकाण ……
समझा , मुळशीला, ताम्हिणीला जायचे असेल तर त्या ठिकाणचे, परिसरातील हॉटेल किंवा छान जेवण मिळेल असे कुणाला माहिती आहे का?
वरती मी वेद फार्म्स ची एक लिंक दिली आहे, त्या प्रमाणे, किंवा कधी कधी धाब्यामध्ये सुद्धा छान जेवण मिळते … जे मायबोलिकर नेहमी फिरतात ते कदाचित सांगू शकतील …

वेद फार्म्ससाठीची माहिती वरती दिलेल्या लिंक वरती आहे. ठिकाण १ दिवस सहली साठी छान आहे. खेड शिवापूर टोलनाक्या पुढे थोड्या अंतर वरती, बुकींग पुण्यात करता येते …
त्यांचेच कमलिनी कुटीर सुद्धा चांगले आहे … धन्यवाद …

मुळशीचे ग्रीन गेट रिसॉर्ट ट्राय करा.... रिझनेबल आहे.... जेवण अप्रतिम आहे.... फक्त व्हेजच मिळते
सगळ्यात महत्वाचे म्हणजे फक्त फॅमिली पब्लिकलाच अलाऊड करतात... मला तरी आवडले Happy

आरामात घरात टिव्ही बघत बसा...... पावसात भिजायचा अनुभव हवा असेल तर घरात शॉवर खाली येउ शकतो.

>>पावसात भिजायचा अनुभव हवा असेल तर घरात शॉवर खाली येउ शकतो.
पण मग बाथरूमच्या भिंती आणि छप्पर काढावे लागेल त्याचे काय ? Lol

भिजण्याशी मतलब ठेवा महेश राव......... आता सोसाट्याचा वारा देखील हवा असेल तर फुल्ल फॅन बाथरुम मधे लावा.. या टेबलफॅन दरवाजापाशी ठेवा..... भन्नाट हवा येईल ..:)

http://www.maayboli.com/node/49777?page=2 इथे सुद्धा खूप माहिती आहे….

एक सांगावेसे वाटते , मुळशी, ताम्हिणी, दिवे घाट ह्या भागात जपून जावे, झिंगलेले पब्लीक रस्ता अडवून ढांगडधिंगा आणि मध्ये पिंगा घालत असते …. वाटमारी …. इत्यादि.....

सुट्टीचे दिवस सोडून हा भाग एकाकी असतो …… कुटुंब सोबत , एकटे दुकटे जाताना काळजी घ्यावी .

माहिती बद्द्ल ध्न्यवाद.

मी आणि माझ्या दोन मैत्रिणी २७ जून संध्याकाळ ते २८ जून दुपार असे पुण्याजवळ जायचे ठरवतो आहोत.
कुणी सुरक्षित आणि स्वछ ठिकाण सुचवू शकेल का? साधारण ४०-४५ मिनिटात पोहचता येईल असे.

पानशेत धरणाजवळ बरीच छोटी रिसॉर्टस आहेत. एम टि डी सी चे आहे. असुरक्षित वाटले नव्हते आणि स्वच्छता ही जेमतेम आहे. पण व्ह्यू अहाहा!
कर्जतजवळ प्रकृती फार्म्स का असं काहीतरी आहे. ते पण मस्त आहे.

सिमन्तिनी, वरसगाव डॅम जवळ आहेत ही रिसॉर्ट्स. बॅकवॉटर ट्रिप आहे म्हणे तिथे. इथले कुणी गेले असतील तर माहिती सान्गतीलच म्हणा.

http://www.suryashibir.in/facilities.html हे बघा.