अवांतर

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

स्नो वितळून गेला आहे तेव्हा लोकहो तुम्हाला इथे धुडगूस घालायला, बागडायला काही हरकत नाही. फक्त शेजारी ललिताताई आहेत त्याना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. सर्व मायबोलीकरांचे इथे स्वागत आहे.

American Idol चा आजचा रिझल्ट फारसा अनपेक्षित नव्हता. स्टीव्ही बरी गायची, ती इतक्या लवकर जाईल असं वाटलं नव्हतं. बाकी कॅथरीन, मॅन्डीसा, पॅरिस, लिझा, एस यन्ग, एलियट, ख्रिस ही मंडळी १२ मधे नक्कीच असतील असं वाटतं. दर वेळी बघताना एक गोश्ट जाणवते. क्वचितच कोणी आफ्रिकन अमेरिकन ( ब्लॅक ) ' वाईट' गाताना पहायला मिळतं. खेळ, गाणं आणि नाच हे जणू त्यांच्या रक्तातच असतं. तसेच ते लोक अगदी मनमोकळे, धीट. सहसा बुजरे, awkward पहाण्यात नाही येत. यावेळीही पॅरीस, मॅन्डीसा आणि लिझा उत्तम गाणार्‍यापैकी तिघी आहेत. याबद्दल गप्पा मारायच्या असतील तर ही हक्काची जागा समजा.

आता थोडं राजधानीतून.... Washington Post च्या रविवारच्या Outlook पुरवणीमधे नेहमी काही ना काही वाचनीय असतं. हा पेपर माझ्या हातात पडतो त्यामुळे निवांतपणे वाचता येऊ शकतो. आत्ता त्यातलीच एक लिन्क आशिषने current affairs मधे दिलेली पाहिली. त्याच पुरवणीत FEMA चा माजी चीफ ब्राऊन ची मुलाखतही आहे.

"A conversation with Michael Brown"

तो स्वतः तर दोषी आहेच, पण इथेही कशा प्रकारचं राजकारण होतं त्याची झलक मिळेल. इथली एक म्हण आहे, ”If you need a friend in Washington, get a dog!

आणि बुशसाहेबांच्या लवकरच होणार्‍या भारतभेटी निमित्त हे दोन लेख.
"Bush seeks India's cooperation"

"Scientist's visa denial"

याबद्दल भारतातल्या एम्बसीने ”highly unusual statement of regret” इश्यू केलं म्हणे.

विषय: 
प्रकार: