मराठी शाळा

Submitted by झिप्रा on 24 July, 2014 - 07:26

नमस्कार,

माझा मुलगा आत्ता २ वर्षांचा आहे. पुढील वर्षी त्याला शाळेत घालायचे आहे. मला कोथरुड, बावधन किंवा चिंचवड परिसरामधील चांगल्या मराठी शाळा सुचवाल का? फक्त अभ्यास केंद्री नसुन सर्वांगीण विकासासाठी परिपुर्ण शाळा आहेत का? द्यान प्रबोधिनी आणि अक्शर नन्दन या दोन शाळा कळल्या आहेत. त्याशिवाय अजुन कुठली शाळा माहित असल्यास कळवावे.

धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मितान, तुमची मुलगी मराठी शाळेत गेली तेव्हा केवढी होती? ती युरोपात असताना शाळेत जात होती का?
तसेच तुम्ही मराठी शाळेत घालायचा निर्णय का व कसा घेतलात? शाळा निवडताना काय निकष होते ह्याबद्दल सविस्तर वाचायला आवडेल.

माझी लेकही मराठी माध्यमाच्या शाळेतच शिकत आहे. हा विचार आमच्या दोघांचाही पक्काच होता त्यामुळे घरात कोणतीच अडचण आली नाही पण नातेवाईकांनी मात्र फार छळलं.... पण त्यांना फाट्यावर मारायच ठरलं असल्याने जास्त लक्ष नाही दिले.
शाळा उत्तम मिळाल्याने लेकीची प्रगती ही छान होतेय... ट्युशन बिशनची भानगड नसल्याने तसच शिकवलेल सगळ लगेच कळत असल्याने तिच्याकडे वेळच वेळ असतो त्यात तिने बरेच छंद जोपासले आहेत. ते पाहून खूप आनंद होतो.
ती पहिलीला जाई पर्यंत वॉटर बॅग व खाऊचा डब्बा इतकच शाळेत घेउन जायची. ही मुलं पहिलीला गेल्यावर अचानक कशी लिहू शकतील ...त्यांना थोड लेखन द्याच असा काही पालकांचा आग्रह झाल्या वर शाळेने मिटींग घेऊन शिक्षणतज्ञ बोलवले पालकांना समजवायला. त्यांनी समजावले नी शाळेने हमी घेतली की प्रत्येक मुल लिहू लागेल तुम्ही चिंता करु नका आणि घरी मुलांना लिहायलाही लावू नका. आणि खरोखरच प्रत्येक मुल पहिल्या चाचणी परिक्षेत उत्तम लिहू लागलेल अगदी शुध्दलेखनाच्याही चुका नव्हत्या...
बालवर्गात असतानाच मुलांसाठी फोनिक्स इंग्लीशचे क्लास सुरु केले त्याचा माझ्या लेकीला खूप फायदा झाला .
मराठीसोबतच तिने इंग्लीश पुस्तक वाचायला सुरु केली..कालच तिने एक ३५० पानी इंग्लीश पुस्तक एका दिवसात वाचून संपवल...कोणत्याही भाषेच वावड तिच्यात नाही आहे हे पाहून खूप समाधान वाटलं.

तिची शाळाही वेळोवेळी मुलांच्या हितासाठी क्रांतीकारी निर्णय घेतच असते...जस ती ह्या वर्षी सहावीला गेल्यावर शाळेने इंग्लीश विषय फस्ट लँगवेज करुन टाकलाय. आता ही मुल मराठीही उच्च लेव्हलच शिकताहेत न इंग्लिशही....गणित विज्ञान तर पाचवी पासूनच इंग्रजीत लिहीताहेत...
हे बदल मुल अगदी सहज पचवताहेत कारण त्यांचा पाया भक्कम आहे...
तसेच शाळेत अ‍ॅडमीशन घेताना त्यांनी एज ग्रुपची लाइन थोडी पुढे ढकलली ...त्यामुळे इतर मुलांच्या तुलनेत माझी लेक एक वर्ष पुढे शिकते आहे. हे ह्यासाठी केल शाळेने कारण पुढे जर कधी मुलांनी ड्रॉप घेतला तर फायदा होइल ह्याचा.पण असं करताना ह्या लहान मुलांचा वर्ग वेगळा ठेवलाय...त्यांना त्यांच्या आकलना नुसार शिकवतात उगीच फरफट नाही.

इतकी मोठी पोष्ट मी ह्याच आनंदात लिहीतेय कारण अजूनही मराठी माध्यमाला पहिला प्रिफ्रन्स देणारे पालक आहेत. अदरवाईज कित्तेक वर्षांपुर्वीच मी ह्या विषयावर बोलणं बंद केल होत.

साधना मितान तुमची मुलं मराठी माध्यमात शिकली..शिकत आहेत हे वाचून अगदी कळप मिळाल्याच फिलींग आल Wink

वेल ,माझी मुलगी मुंबईतच मराठी माध्यमाच्या शाळेत शिकते आहे तरी प्लीज मुंबईत मराठी माध्यमाच्या चांगल्या शाळा नाहीत असं सरसकट विधान नका करु

Pages